शेवग्याच्या शेंगांची आमटी

Submitted by देवकी on 17 September, 2013 - 10:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेवग्याच्या शेंगांचे ७-८ तुकडे, पाव चमचा धणे, पाव वाटी ओलेखोबरे, अर्धा कांदा,४-५ सुक्या मिरच्या किंवा मिरचीपूड,थोडी चिन्च,छोट्या लिंबाएवढा गूळ,मोहरी,३-४ मेथीदाणे,चिमूट्भर हिंग,हळद ,१ छोटा चमचा तेल.

क्रमवार पाककृती: 

प्रथम उभा कांदा,पाव चमचा धणे, पाव वाटी ओलेखोबरे,४-५ सुक्या मिरच्या किंवा मिरचीपूड,थोडी चिंच ,पाणी घालून एकत्र वाटावे.वाटण गुळगुळीत असावे.
भांड्यात तेल तापवून मोहरी,३-४ मेथीदाणे,चिमूट्भर हिंग,हळद क्रमाक्रमाने घालून त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालावेत.त्यात पाणी घालून शेंगा शिजवाव्या.मीठ घालावे. त्यानंतर त्यात वाटण व गूळ घालावा.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांकरिता
अधिक टिपा: 

आमटी किंचित दाट असावी.(कोकणीत त्याला दुरदुरीत म्हणतात.)
अशीच कैरीची आमटी करतात.फक्त त्यात चिंच नसते.शेवग्याच्या शेंगाऐवजी कैरीचे तुकडे शिजवून घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
माझी आई / पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users