मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ५ (प्राजक्ता३०)

Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 02:03

मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ६ वर्षे

Shreeya letter2-001.jpg

पत्रातला पूर्ण मजकूर श्रीयाचा आहे. मराठी अक्षरे कशी काढायची ते सांगण्याची आणि तिने पेन्सिलने लिहीलेले पत्र पेनने ट्रेस करण्याची मदत माझी आहे. पत्र पूर्ण लिहून आणि सजवून झाल्यावर आठवले की गणपतीचा माऊस काय खातो आणि त्याला चीज आवडते का, त्यामुळे असलेल्या थोड्यशा जागेत ताजा कलम लिहीलेला आहे. मी गणपतीला पत्र लिहील्यावर मला त्याचे उत्तर येईल का हा प्रश्ण सध्या सतावतो आहे.

- प्राजक्ता३०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड पत्रं आहे. सजावटही मस्तच.

'सान्विची सर्दी लवकर बरी कर'नंतरच्या चित्रातले थेंब.... Happy

'तुझ्या माउसला चीज आवडते का?' अल्टिमेट क्यूट आहे.

श्रीया,
कित्ती क्युट लिहिलय !!
अक्षर पण खूप सुंदर .. तुझ्या पत्राची सजावट आणि सुंदर अक्षरात लिहिलेली मागणी पाहून बाप्पानी ऑलरेडी सर्दी बरी करायला सुरवात केली असणार सान्वीची :).

सगळ्यांना कौतुकाबद्दल धन्यवाद. श्रीया शाळेतून आल्यावर वाचून दाखवते तिला सगळ्या प्रतिक्रिया.

@मृण्मयी : सान्विची सर्दी लवकर बरी कर'नंतरच्या चित्रातले थेंब>>

ती नैवेद्याची ताटली आहे आणि ताटलीत करंजी, मोदक आणि लाडू आहेत.

सजावट रंगीबेरंगी जास्वंदाच्या फूलांची आहे.

फार प्रेमळ ताई आहे बरं.

बाप्पा, सान्वीची सर्दी लवकर बरी करणार आहे.

भारी गोड दिसतंय हे पत्रं! फुलं, मोदक-करंज्यांच ताट केवळ अप्रतिम. माऊसची किती अगत्यानं विचारपूस! Lol

शाब्बास श्रीया आणि सान्वी! Happy

मस्तच लिहिलंय पत्र! सजावट भारी केलिये. माऊसला चीज आवडते का?>>> हे भारीये. आणि सान्वी ची सर्दी बरी कर हे अगदी प्रेमळ ताईच लिहू शकते! मस्त मस्त! खूप आवडलं पत्र! ......... Happy

Pages