मायबोली गणेशोत्सव २०१३ उपक्रम - भाऊंचा चष्मा !

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 08:06

सकल कलांचा अधिनायक असणार्‍या गणेशाचे स्वागत करायचे तर या कलांच्या माध्यमातूनच. तीच त्याला दिलेली खरी सलामी. मायबोलीवर तर एकाहून एक सरस कलाकार आहेत आणि या गणेशोत्सवात ते या कलांच्या माध्यमातून बाप्पाची सेवा करत आहेत.

तर या धाग्यात आपल्या भेटीला येत आहेत मायबोलीवरचे प्रख्यात व्यंगचित्रकार भाऊ नमस्कर त्यांची खास गणेशोत्सवासाठी काढलेली व्यंगचित्रमालिका घेऊन - भाऊंचा चष्मा !

हा धागा दररोज नव्याने पहायला विसरू नका , इथे दर दिवशी एक नवे व्यंगचित्रं आपल्या भेटीला येणार आहे . अगदी हा आठवडाभर!

a-ganapati7.JPGA-ganapati3.JPGA-ganapati4.JPGA-ganapati5.JPGA-ganapati-1.JPGA-ganapati10.JPGAganapati9_0.JPGganapati(1).jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवनव्या व्यंगचित्रांची कल्पना तर आवडलीच. त्यातून भाऊंसारख्या सिद्धकुंचला चित्रकाराची चित्रे .दर दिवशी नवीन चित्र बघायच्या आधी उत्सुकता शिगेला पोचलेली असते. आतापर्यंतची सर्वच चित्रे छान. त्यातूनही सासूबाईंसाठी मखर आणि घरकामातील सहभाग बेस्ट. कार्यकर्त्याच्या चित्रातली सुखहर्त्याची कोपरखळीही आवडली. धन्यवाद. संयोजकांनाही, इतक्या उत्कृष्ट कल्पनेबद्दल.

Lol

'घरकामातला सहभाग' आणि त्यातल्या काकींच्या चेहेर्‍यावरचे भाव फारच भारी!

भाजी खरेदीसाठी चेकबुक आणि क्रेडिट कार्ड >>>> हे मस्तचे आणि खरंच ती वेळ दूर नाही असही वाटू लागलंय ...

भाऊंनु, लय भारी. Happy
भाजी खरेदीसाठी चेकबुक आणि क्रेडिट कार्ड >>>> हे मस्तचे आणि खरंच ती वेळ दूर नाही असही वाटू लागलंय ...>>>>>>>> +१

प्रतिसादाबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद.
संयोजकांचं अभिनंदन व त्यानाही मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

Pages