अभिनंदन (शतशब्दकथा)

Submitted by मुग्धमानसी on 6 September, 2013 - 07:15

"अभिनंदन... मुलगी झाली!"
अन् ती आली माझ्या हातांत.

हवेत हात हलवत ती बोलावत होती जणू मला... नव्हे... माझ्यातल्या कुणालातरी.

चेहरा हळूवार नेला तिच्या जवळ आणि तिचा पहिला स्पर्श झाला! सर्वांग भारून गेलं! कुरळ्या ओलेत्या जावळात... चुळबुळणार्‍या गुलाबी तळव्यांत... मी शोधू लागलो मलाच.

अचानक पाहिलं तिनं थेट माझ्या डोळ्यांत. आणि खुदकन हसली. त्याक्षणी आमची पहिली ओळख पटली. माझ्यातला बाप अखेर तिनं शोधलाच!

"माझ्याकडे बघू बाळ...." कुणीतरी माझ्या हातून तिला घेऊ लागलं. मी चिडलो. ही माझी... माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही हिला....

पण समोर सासरे उभे होते. बाळ निमुटपणे त्यांच्या सुरकुतल्या हातांत दिलं.

कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख प्रयत्न....................

फार फार कमी शब्दांत किती सामावलय. एका स्त्रीचा नवरा पासून एका स्त्रीचा बाप हे स्थित्यंतर काळोख्या खोलीत लाईट लावल्यासारखं...
बहोत खूब.

धन्यवाद!
पण...
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!>>> या वाक्यातून मला जे पोचवायचं होतं ते पोचलेलं नाही बहूदा.

त्या ऐवजी...
"त्या दिवशी मंडपात हा म्हातारा एवढा का काळवंडलेला... ते समजलंच!" असं केलं तर?

त्या ऐवजी...
"त्या दिवशी मंडपात हा म्हातारा एवढा का काळवंडलेला... ते समजलंच!" असं केलं तर?>> नको नको, आहे तो शेवटही पोहोचतोच आहे आणि ते ही अत्यंत समर्पक शब्दात

कारण त्या वाक्या आधी आपलं छोटुसं बाळ आपल्या हातून देणं जिवावर आलेला नवा बाबा आलाय ना त्यामुळे आहे तो शेवट परफेक्टच आहे Happy हे अर्थात माझं मत

मस्त Happy

सर्वांना धन्यवाद!

इन्द्रधनु>>>> अभिनंदन!!!
बायकोची आई होण्याच्या प्रक्रीयेपेक्षा नवर्‍याचा बाप होण्याची प्रक्रीया जास्त गंमतीशीर असते!!! तुमच्या पतीदेवांचे 'स्पेशल' अभिनंदन! Happy आणि लेकीला माझ्याकडून एक गोड पापा!

Pages