रॅपर्स्विल सोडल्यानंतर पुढचे ठिकाण होते वडूझ. Vaduz.
याच नावाचे गाव महाराष्ट्रात पण आहे.
तिथे आपण पुढच्या भागात जाणार आहोत. या भागात मात्र केवळ रस्त्याचे फोटो. कधीही संपू नये असे वाटेल
असा हा रस्ता.
अत्यंत आरामदायी बस, सुंदर रस्ता, कुशल चालक.. आणखी काय पाहिजे. प्रत्येक वळणावर सुंदर दृष्य समोर
येत होते.
सध्या फारच कमी शेती होते तिथे. बहुतेक चराऊ कुरणेच आहेत. या काळात बर्फ वितळल्यामूळे गायींना
वर डोंगरात चरायला नेतात आणि खालच्या भागातला चारा कापून ठेवतात. गायींना वर नेणे आणि आणणे
अर्थातच उत्सवी असते.
पण तिथली शेती अशी ३/४ महिन्यांचीच. त्यामूळे शेतकरी शेती न करता, एखाद्या कारखान्यात काम करणे
पसंत करतात. तिथे त्यांना वर्षभर काम असते.
तर चला, सीट बेल्ट बांधा. डुलकी मात्र येऊ देऊ नका.. प्लेन शिफॉनमधली एखादी सुंदर तरूणी दिसूही शकेल.. पुढे काय होतं ते माहीत आहेच.
1
2
3
4
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
27
28
29
30
31
32
वॉव्व.... तुम्हाला "मु.पोस्ट
वॉव्व.... तुम्हाला "मु.पोस्ट ढेबेवाडी" या निमित्ताने प्रकर्षाने आठवला हे विशेष. वर्षा तशी विस्मरणातच गेलेली अभिनेत्री....गुणी असूनही दुर्लक्षित ठरलेली. या चित्रपटाचे दिग्दर्शक माधवराव पाठक यांचेही मागील वर्षीच निधन झाले होते....फार कष्टाळू माणूस होते माधवराव.
मीही स्प्लेंडरवरूनच गेलेली
मीही स्प्लेंडरवरूनच गेलेली आहे त्या रस्त्यावरून
ढेबेवाडी नाव असतं तर माझ्या लक्षात राहिलं असतं नक्की. नवर्याला विचारते आठवतंय का. तेव्हाच्या तेव्हा नोंदी न ठेवण्याचा हाच तोटा.
बाकी शाहूवाडी-मलकापूर-आंबा परिसराबद्दल क्या कहने! एक स्वच्छता वगळल्यास काहीच उणे नाही.
दिनेश, आता चालायचे रस्ते बघायची जाम उत्सुकता आहे!
सई...."....शाहूवाडी-मलकापूर-आ
सई...."....शाहूवाडी-मलकापूर-आंबा......"
~ यातीलही आंबा परिसराबद्दल मला विशेष प्रेम आहे. तिथल्या जंगलात माझ्या मित्राचे लाकूड कटाईचे कंत्राट होते. अर्थात सरकारी....त्यामुळे ज्यावेळी आम्ही तिकडे जात असू त्यावेळी आंबा परिसर अगदी खोलवर मनमोकळेपणाने फिरायला मिळत असे....ती गर्द नवलाई जितकी हवीहवीशी तितकीच काहीवेळी भीतीदायकही वाटत असे....दुसरीकडे विशाळगडाचाही मोह.... शांतता तर कमालीची.....अगदी 'मधुमती' आठवे.
वा! दिनेशदा, फोटोंबद्द्ल काय
वा! दिनेशदा, फोटोंबद्द्ल काय बोलायचे?
Pages