स्विस सहल - भाग २/३ हैदीलँड

स्विस सहल - भाग २/३ हैदीलँड, रॅपर्सविल ते वडुझ, एक नयनरम्य रस्ता

Submitted by दिनेश. on 2 September, 2013 - 10:43

रॅपर्स्विल सोडल्यानंतर पुढचे ठिकाण होते वडूझ. Vaduz.
याच नावाचे गाव महाराष्ट्रात पण आहे.
तिथे आपण पुढच्या भागात जाणार आहोत. या भागात मात्र केवळ रस्त्याचे फोटो. कधीही संपू नये असे वाटेल
असा हा रस्ता.

अत्यंत आरामदायी बस, सुंदर रस्ता, कुशल चालक.. आणखी काय पाहिजे. प्रत्येक वळणावर सुंदर दृष्य समोर
येत होते.

सध्या फारच कमी शेती होते तिथे. बहुतेक चराऊ कुरणेच आहेत. या काळात बर्फ वितळल्यामूळे गायींना
वर डोंगरात चरायला नेतात आणि खालच्या भागातला चारा कापून ठेवतात. गायींना वर नेणे आणि आणणे
अर्थातच उत्सवी असते.

Subscribe to RSS - स्विस सहल - भाग २/३ हैदीलँड