मक्याचा उपमा

Submitted by अनघा कुलकर्णी on 2 September, 2013 - 04:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचा उपमा
साहित्य -मक्याची ४ कणसे, चांगले तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर ई . घालू शकतो . )

क्रमवार पाककृती: 

कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा , व serve करावे कोथिम्बिर घालावि.

वाढणी/प्रमाण: 
४ झणासाठि.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users