दुसर्या भागात आपण हैदीलँडला जाणार आहोत पण वाटेत रॅपर्सविल या गावी थांबणार आहोत. हा भाग गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे.
तिथे एक राजवाडा आहे. तो भाग झुरिक लेकला लागूनच आहे. त्यामूळे तलावाचे सुंदर दृष्य राजवाड्याच्या
अंगणातून दिसते. राजवाडा तसा लहानच आहे.
पण माझे लक्ष तिथल्या गुलाबांच्या बागेकडेच होते. राजवाडा मी आधी बघितला होता, त्यामूळे तिथे जास्त वेळ न काढता मी त्या बागेकडे धावलो. एक नव्हे तर दोन बागा आहेत तिथे.
ऑकलंड आणि नैरोबी मधले गुलाब बघितल्यानंतर यात काही विशेष नाही असे कुणाला वाटायची शक्यता आहे. पण त्या कुणाला म्हणजे मला नाही 
मला तर प्रत्येक गुलाब सुंदरच दिसतो. त्यामूळे गुलाबांच्या फोटोंचा मारा. तोही दोन भागात 
खरे तर गुलाबात रंग तीनच पांढरा, लाल आणि पिवळा. पण यांचे वेगवेगळे मिश्रण आणि आकार यांची
विविधता काय वर्णावी ? हे खरे तर जोपासलेले गुलाब. आल्प्समधे जंगली गुलाबही ( अल्पाईन रोझेस ) दिसतात. ते मात्र या ३ रंगातच असतात.
नैरोबीप्रमाणेच, इथल्या गुलाबांना सुगंध नव्हता, काही मोजक्याच फुलांना सुगंध होता.
तसे हे गावही अगदी निवांत आहे आणि हेरीटेज म्हणून जपलेही आहे. पण जो मोजका वेळ होता तो मी
या बागेतच घालवला. ( वेळेचे बंधन होते म्हणून बरे नाहीतर मी तिथे हरवलोच असतो. ) कधी नव्हे ते अगदी प्रखर प्रकाश होता त्यामूळे काही फोटो जरा जास्तच ब्राईट दिसतील. तसेच प्रदर्शनात असतात तसे हे गुलाब काही खास डिस्प्ले ला ठेवलेले नव्हते त्यामूळे कळ्यांचा "अडसर" आहे, काही फोटोत.
या सहलीत मला मूळचे पुण्याचे पण आता स्कॉटलंडमधे स्थायिक झालेले प्रा. आफळे भेटले. त्यांच्या सौभाग्यवती मायबोलीच्या वाचक आहेत आणि प्राध्यापकांची आणि माझी भेट झाली, याचा त्यांना
आनंद झाला असे प्राध्यापकांनी आवर्जून कळवले.
आणखी एक खास म्हणजे. पुर्वी मी स्विसला गेलो कि नाजूक भरतकाम केलेले रुमाल आणत असे. तसे यावेळेस कुठेच दिसले नाहीत. कुणाला विचारायच्या आधीच त्याचे कारण कळले.
स्विसमधे बंद पडलेल्या कापडगिरण्या बर्याच दिसत राहतात. अर्थात कापड्गिरणी म्हंटल्यावर आपल्या नजरेसमोर येते तसे ते दृष्य नसते. ( म्हणजे त्रिकोणी छप्परे आणि चिमणी ) या इमारती साध्याच पण सुबक आहेत. गेल्या शतकातच तिथे कापड उद्योग भरभराटीला आला होता. त्या गिरण्या पाण्याची वाहत्या पाण्याची शक्ती वापरून चालवल्या जात असत. पण आता कामगारांचे वेतन परवडत नसल्याने, सर्वच गिरण्या बंद पडल्या आहेत. तिथे मिळणारे बहुतेक कपडे भारतातून किंवा चीनमधून आलेले असतात. आणि हे
ते गाईड अगदी प्रामाणिकपणे सांगतात. त्यामूळे यावेळेस भाचेनातीसाठी मोजे सोडल्यास, तशी खरेदी झालीच नाही.
नाही म्हणायला एक उद्योग मात्र स्विसकडे अजून आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे.
बहुतेक विमानातली सीट कव्हर्स अजूनही स्विस मेड असतात कारण अग्निविरोधी कापडाचे एकाधिकार
अजून त्यांच्याकडे आहेत.
एक वेगळे फुल
1
2
3
4
राजवाड्याचा दर्शनी भाग
तिथे सावलीसाठी ( बहुतेक ) असा उलटा डोम आहे.
राजवाड्याचा सज्जा / जिना
राजवाड्यातला गालिचा
डोमची सावली
नको विसरू संकेत मिलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा... हे गाणे म्हणायची जागा 
तिथून दिसणारे लेक झुरिक
बागेचे पहिले दर्शन
६
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19 अशी भाऊगर्दी असल्यावर एकच कसे निवडायचे ?
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31





अरे वा!! मस्तच प्रचि. अगदी
अरे वा!! मस्तच प्रचि. अगदी वॉलपेपर म्हणून संगणकाला लावावेत असे आहेत.
पण काही प्रचि जरा जास्तच ब्राईट आलेत, बहुतेक ऊन खूप प्रखर असावे.
हो गमभन, ते लिहायचे राहिलेच
हो गमभन, ते लिहायचे राहिलेच होते. आता वाक्य टाकलेय ते.
अवश्य वापरा.
आणि सर्व फोटो प्रताधिकार मुक्त आहेत
सुंदर फुलं आणि राजवाडा!
सुंदर फुलं आणि राजवाडा!

केवळ अप्रतिम!!!
केवळ अप्रतिम!!!
सुंदरच सर्व फोटो, राजवाडापण
सुंदरच सर्व फोटो, राजवाडापण खूपच आवडला, फुलेही छान.
अतिशय सुंदर फोटो.
अतिशय सुंदर फोटो.
दिनेशदा सगळेच फोटो खासच!!!
दिनेशदा सगळेच फोटो खासच!!!
मस्तय !
मस्तय !
छान... गुलाब तर खासच.
छान...
गुलाब तर खासच.
अप्रतिम!
अप्रतिम!
व्वा सुंदर! काय मस्त रंग आहेत
व्वा सुंदर! काय मस्त रंग आहेत गुलबांचे.

दिनेशदा, ते गुलाब इथे आणून, लावून बघायला पाहिजेत. इथे जगतात का ते?
दिनेशदा... अप्रतिम प्रचि
दिनेशदा... अप्रतिम प्रचि
फारच सुंदर फोटो, दिनेशदा.
फारच सुंदर फोटो, दिनेशदा.
आह्हा!!!!!!!!!! किती सुर्रेख
आह्हा!!!!!!!!!! किती सुर्रेख प्रचि
मस्त फोटो फुलांची रेलचेलच
मस्त फोटो
फुलांची रेलचेलच आहे 
दिनेशदा, सुंदर फुलं आणि फोटो
दिनेशदा, सुंदर फुलं आणि फोटो पण.
सुंदर फोटो. फुले तर छानच आहे
सुंदर फोटो. फुले तर छानच आहे पण राजवाडाही खुप आवडला.