हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:46

मन तुझे दुखवले ; असेच नाही मित्रा
माझेही रडले तुझेच नाही मित्रा

तू हास हवे तर माझ्यावरती नंतर
पण असे भांडणामधेच नाही मित्रा

गेलास सोडुनी तसेच आहे अजुनी
मी जग अपुले बदललेच नाही मित्रा

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा

मी तुझ्या वरातीमधे नाचलो असतो
पण आज मनाला बरेच नाही मित्रा

हा विठ्ठल घे अन पहा खेळुनी तूही
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शेर द्यायला विसरलो

तू हास हवे तर माझ्यावरती नंतर
पण असे भांडणामधेच नाही मित्रा

संपादित करत आहे
धन्यवाद

पुलस्तीजी व बेफीजी धन्स

हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा ,,,ह्या दोन ओळी माझ्याच एका कवितेच्या आहेत Happy

त्यातून एक शेर होवू शकतो असे वाटल्याने ही गझल करायला घेतली
एका मित्राला(माबोबाह्य) माझ्याकरवी खूप खोलवर दुखावले गेले काही दिवसापूर्वी त्याच्या आठवणीत केली ही Happy

गेलास सोडुनी तसेच आहे अजुनी
मी जग अपुले बदललेच नाही मित्रा
>>>> Sad

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा
>>> मस्त

मी तुझ्या वरातीमधे नाचलो असतो
पण आज मनाला बरेच नाही मित्रा
>> ह्म्म्म Happy

तिसरा आणि पाचवा सर्वात विशेष.

शेवटचा शेर ही गझल प्रकाशित होण्याआधी वाचल्यासारखा वाटतो.
(कदाचित वैवकुंनी एखाद्या प्रतिसादात उद्धृत केला असावा.)

मी तुझ्या वरातीमधे नाचलो असतो
पण आज मनाला बरेच नाही मित्रा

हा विठ्ठल घे अन पहा खेळुनी तूही
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा>>छान आहे ...मजा आयी

ती लिंकमध्ये दिलेली कविता पण आवडली..े

एकंदरीत सुंदर गझल…

थोडे विस्तृत लिहितो….

मतला छान…

'तू हास हवे तर माझ्यावरती नंतर
पण असे भांडणामधेच नाही मित्रा'
सुरेख शेर…

'मी जग अपुले बदललेच नाही मित्रा' ==> या मिसऱ्यात अडखळायला होते आहे.

'बदल' शब्द 'ललल' किंवा 'लगा' असाच व्यवस्थित उच्चारला जाऊ शकेल…
तुम्ही त्याला बद…. ल अशी 'गाल ' फोड केल्याने असे होत आहे.

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा

हा हि शेर आवडला…

'मी तुझ्या वरातीमधे नाचलो असतो
पण आज मनाला बरेच नाही मित्रा'

सानी मिसरा खूपच सुंदर आहे….

एक शंका आहे, जर हा शेर प्रेयसी ला उद्देशून आहे तर रदीफ निभावली गेली नाहीये.

जर मित्रासाठी असेल तर रदीफ निभावली जाईल पण शेर तितकी उंची कदाचित गाठू शकणार नाही. ( असे माझे वैयक्तिक मत आहे, तुमचे मत ऐकायला आवडेल )

हा विठ्ठल घे अन पहा खेळुनी तूही
हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा
टू गुड शेर….

एकूण गझल आवडली

पुढील गझलेस शुभेच्छा.

भारतीताई , उकाका , साळसूद्या , गकु, खुरसाले , व फाटक साहेब खूप खूप आभार

फाटक साहेब आपण काढला तो प्रेयसीचा संदर्भ मनात नव्हता असता तर मी ही रदीफ तिथे लावली नसती हो ! Happy
तरी अपण म्हणताहात त्यावर नजर फिरवली ...मित्र ह्या पुल्लिंगी संस्कृत शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मित्रा असेच होते बहुधा ...वेदातील एक देवता मित्र ह्याच्या पत्नीचे नाव मित्रा असेच आहे त्यानुसार ह्या शेरातील मित्रा मैत्रिणीसाठी योग्यच बसते

पण क्षमस्व ... शेरात तसे म्हणायचेच नव्हते

शेरात महत्त्वाचा भाग मनाला बरे वाटत नाही आहे असे म्हणणे हा आहे ह्या संवेदनेभोवती शेर गुंफला आहे

मित्र लग्न करतो आहे म्हटल्यावर किती आनंद असतो ! बेगानी शादीमे अब्दुल्ला सुद्धा दीवाना होवून नाचतो इथेतर माझ्या मित्राचे लग्न आहे ...पण आमचे मित्रप्रेम जरा स्वार्थीयै हो ...लग्न झाले म्हणजे मित्र आपला कमी बायकोचा जास्त होणार ही वेदना मनाला खाते आहे आमच्या तरीपण थेट सांगायचे कसे त्याला... त्याचा आनंद कमी व्हायला नको कि नै ....म्हणून म्हटले की आज मनाला बरेच नाही .....
-
आज मला बरे नाही ह्या कारणावर आपण किती कामे टाळत असतो ...इथेतर मनालाच बरे नाही !!!! मग काय वेळ नेता येते किनै मारून Happy

शायद इसको जदीद कहतें हैं फाटक साहाब ...(नाविन्य) Happy

असो मित्राच्या लग्नावरून आठवले ....@ आपण व गायत्रीजी ...नवदसंपत्यास वैवाहिक आयुष्य आतोनात सुखाचे भरभराटीचे जावो ही विठ्ठलचरणी प्रार्थना ..खूप खूप शुभेच्छा !!! (गायत्रीच नाव आहे ना Uhoh ऐकीव माहिती !..चुकल्यास क्षमस्व )

सदैव कृपाभिलाषी
वैवकु