डेक्कन हल्ली खंडाळ्याच्या घाटामध्ये थांबत नाही

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:10

म्हणे....धबधबा, निसर्ग, पाउस ..तिला कुणीच खुणावत नाही
डेक्कन हल्ली खंडाळ्याच्या घाटामध्ये थांबत नाही

लाजायाचे असेल तर मग लाज तुझ्या त्या कृत्यांवरती
काढ कापडे ....घे तू डुबकी ....इथे कुणीही पाहत नाही

व्यथा स्वतःच्या आयुष्याची स्मरते गहिवरतात माणसे
कधीच मित्रा अश्रू कोणी दुसर्‍यासाठी ढाळत नाही

सेकंदासेकंदाला टक लावत बघून झाल्यावरती
एक सत्य कळते आहे की काळ मुळीही धावत नाही

तुझ्या स्मृतींच्या बागेमध्ये बसतो पण लाभत नाही सुख
दु:ख हेच की तुझ्याप्रमाणे तुझे दु:ख कवटाळत नाही

****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok ok आहे. पहिल्या शेरात मात्रा जास्त होताहेत का? च काढून म्हणले तर येते आहे बरोबर.

****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही

खयाल भारी, पहिली ओळ अजून घट्ट करता यावी.

तुझ्या स्मृतींच्या बागेमध्ये बसतो पण लाभत नाही सुख
दु:ख हेच की तुझ्याप्रमाणे तुझे दु:ख कवटाळत नाही

****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही<<< आवडले

***मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही

भिडला !