Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:10
म्हणे....धबधबा, निसर्ग, पाउस ..तिला कुणीच खुणावत नाही
डेक्कन हल्ली खंडाळ्याच्या घाटामध्ये थांबत नाही
लाजायाचे असेल तर मग लाज तुझ्या त्या कृत्यांवरती
काढ कापडे ....घे तू डुबकी ....इथे कुणीही पाहत नाही
व्यथा स्वतःच्या आयुष्याची स्मरते गहिवरतात माणसे
कधीच मित्रा अश्रू कोणी दुसर्यासाठी ढाळत नाही
सेकंदासेकंदाला टक लावत बघून झाल्यावरती
एक सत्य कळते आहे की काळ मुळीही धावत नाही
तुझ्या स्मृतींच्या बागेमध्ये बसतो पण लाभत नाही सुख
दु:ख हेच की तुझ्याप्रमाणे तुझे दु:ख कवटाळत नाही
****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ok ok आहे. पहिल्या शेरात
Ok ok आहे. पहिल्या शेरात मात्रा जास्त होताहेत का? च काढून म्हणले तर येते आहे बरोबर.
****मला....'"कोणत्या गावाचा
****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही
खयाल भारी, पहिली ओळ अजून घट्ट करता यावी.
धन्यवाद विचार चालू ...लेखन
धन्यवाद
विचार चालू ...लेखन बंद !!!
नक्की कुठे थांबायला हवीये
नक्की कुठे थांबायला हवीये डेक्कन?
तुझ्या स्मृतींच्या बागेमध्ये
तुझ्या स्मृतींच्या बागेमध्ये बसतो पण लाभत नाही सुख
दु:ख हेच की तुझ्याप्रमाणे तुझे दु:ख कवटाळत नाही
****मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही<<< आवडले
धन्स शिबा धन्स बेफीजी
धन्स शिबा धन्स बेफीजी
काही शेर खूप आवडले, शेवट
काही शेर खूप आवडले, शेवट गहिरा.
धन्यवाद भारतीताई
धन्यवाद भारतीताई
***मला....'"कोणत्या गावाचा तू
***मला....'"कोणत्या गावाचा तू " ..ह्या प्रश्नावर तू आठवशी
'सुचेल त्या' गावाचा म्हणतो..मी "पंढरपुर" सांगत नाही
भिडला !
धन्यवाद विक्रांतजी
धन्यवाद विक्रांतजी