उपवास..

Submitted by दुसरबीडकर on 17 August, 2013 - 05:49

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते तर त्यांच्यासोबत लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय' कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
''अहो..ऊठायचं नाही का आज,?आठ वाजून गेलेत..'' बायकोचा खणखणीत चिल्लर सांडल्यासारखा आवाज आला अन मी दचकून पलंगावर ऊठून बसलो..'मी नाही..मी नाही'' बरळता बरळता बायको म्हणाली,'काहो?स्वप्नात माझ्या लपून कुठले ऊद्योग चालू होते??' तीच्या डोळ्यातला 'चटका'लागल्यावर पूर्ण शुध्दीवर आलो..''अगं ,काही नाही,असचं आपलं..'' अन कसंनुस हसतं उत्तरलो..'अहो,कलेक्टर ने आषाढी ऎकादशी ची सुटी 'डिक्लेर' केली ते नुसत झोपायला का??मी हे विचारत होते की,आज ऎकादशीचा उपवास करणार की,तुमच्यासाठी कुकर लावू?? बायकोला उत्तर देणार इतक्यात रोजच्या वरण भाताच्या दुसर्या तागड्यात मला साबुदाणा पोहे,चिप्स,बटाटे,रताळ्याचा खरपूस तूंप टाकलेला शिरा,राजगुरा,दाण्याचे लाडू ई.ई.भरलेले आढळले,अन साहजिकच फराळी यादीचं पारडं जड झालं..मी मोठ्या भक्तीभावानं म्हणालो,''अगं वेडे..अवघा महाराष्ट्र,अर्धा कर्णाटक अन अर्धा आन्ध्र ज्या विठ्ठलाला भजतो,त्याचे आजच्या दिवशी गुणगाण करतो,त्याच्यासाठी उपवास करतो,त्या 'सावळ्यासाठी' मी एक दिवस उपवास केला तर बिघडलं काय?? बायकोला बहुदा माझ्या तोंडात जमा झालेली 'लाळ' ऎव्हाना कळली होती..'बरं..बरं..'' असं म्हणून ती किचनकडे वळाली..
मी घाईने ऊठलो,बाथरुम मधुन ब्रश व पेस्ट घेऊन 'पाकशाळेत' गेलो..गॅसवर तेल पिऊन कढई बसलेली दिसली,हायसं वाटलं..ब्रशवर पेस्ट घेतो न घेतो तोच झुरळ पाहिल्यासारखं बायको किंचाळली,''ई...शि बाई..तो ब्रश आणि पेस्ट ठेवा आधी..'' मला कळेचना,''अगं..काय झाल?उपवासाच्या दिवशी भटजीबुवांनी दात घासायची बंदी सांगितली का''? ''अहो..मी टिव्ही वर बघितलयं,ब्रशचे केस प्राण्याचे असतात म्हणे,अन पेस्टमध्येही हाडांचा चुरा मिक्स असतो''बायको दमात ऊत्तरली...मला बायकोच्या तर्कशास्त्राचा हेवा वाटला..मी म्हणालो..'वेडे..ते रंगवायचे ब्रश असतात,आणि पेस्टमध्ये काय टाकतात हे बघणारी तू काय,'क्वालिटी कन्ट्रोल मॅनेजर' आहेस का?? 'ते मला,कळतं नाही,तेलाल दंत मंजन आहे,आज त्याने दात घासा'' तीने निर्णय जाहिर केला..'मग यातही विटांचा चुरा असतो म्हणे'' मी खोचक बोललो..''असेना का,विटा शाकाहारी आहे,अन तसही आज 'विटेचाच' मान आहे,घ्या मुकाट्याने''..आज दिवसभर तीला किचनमध्ये त्रास द्यायचा असल्याने मी निमूटपणे हा त्रास सहन करत होतो...
शुचिर्भूत होवून बातम्या घेत असतांना,बायको आली..'अहो,निदान आज तरी थोडा 'हरीपाठ' वाचावा माणसाने,सकाळी सकाळी''..मला झिणझिण्या आल्या,''अगं बाई..मी काल रात्रीपासून काही खाल्लेल नाही,उपासीपोटी कुठलही युद्ध जिंकता येत नाही,अन देवालाही ते आवडतं नाही..जा थोडासा बदामशिरा कर,मोठी प्लेटभरून..बाकी नंतर सांगेन..'' माझा रवैय्या पाहून बायको,हळूच कानात पुटपुटली...''आपलं पोट बघितलं का??त्या कोपर्यावरच्या 'नटमोगरी' सारखं दिसते आहे,अन म्हणे युद्ध,अन उपाशी'' तशी ती तनतनत किचनमध्ये गेली.. म्हणजे एक गोष्ट मला कळाली होती..'नटमोगरी'ला दिवस गेलेत..माझ्या पोटावरून हात फिरवत मी अंदाज बांधला..म्हणजॆ तिसरा महिना..तरिच म्हटलं..अशात जरा नटमोगरी 'बेढब' कशी दिसतेय..;-) ..

क्रमश:...
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users