ब्रेड

Submitted by मेधा on 14 November, 2008 - 21:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

सहा ते सात कप मैदा ( अमेरिकेत असल्यास ब्रेड चे पीठ मिळते ते घ्यावे )
२.५ कप कोमट पाणी १००-११५ डिग्री फॅ
१ टेबलस्पून ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट ( अमेरिकन ग्रोसरी मधे मिळणारं एक पाकीट
१ टेबलस्पून साखर
१ टीस्पून मीठ

२-३ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल.

क्रमवार पाककृती: 

अर्धा कप कोमट पाणी एका मोठ्या बाउलमधे घालून त्यावर साखर शिंपडावी व लगेच यीस्ट शिंपडावे. एखाद्या लाकडी उलथन्याने वा चमच्याने ढवळून पाच्-सात मिनिटे झाकून ठेवावे.
पाच सात मिनिटांनी ते मिश्रण फसफसून येईल - यालाच प्रूफिंग द यीस्ट किंवा यीस्ट स्पॉन्ज असे म्हणतात.
मग यात उरलेले दोन कप कोमट पाणी व साधारण तीन कप पीठ घालून लाकडी उलथन्याने चांगलं एकजीव करावं . हळू हळू त्यात अजून तीन -साडेतीन कप पीठ घालून चांगलं मळून घ्यावं. आता हे उलथन्याने फारसं मिसळता येणार नाही. ओट्यावर थोडे पीठ भुरभुरवून त्यावर पीठाचा गोळा व्यवस्थित मळावा. घड्याळ लावून ८-१० मिनिटे मळावा.

मग एक टे स्पून ऑ ऑ घालून मिनिटभर मळून परत एक चमचा ऑ ऑ अन परत मळणे असे दोन -तीन वेळा करावे.
मग गोळ्याला परत हलक्या हाताने सगळी कडून तेल चोपडून , बाउल ला आतून सगळी कडून तेल लावून त्यात तो गोळा ठेवावा. वरून एका जाडसर टॉवेल ने झाकून बाउल एखाद्या warm and dark जागी ठेवावा. किमान ६५-७० डिग्री फॅ असावे तापमान अन ८० डिग्री फॅ च्या वर असू नये. दीड एक तासात गोळा चांगला फुगून दुप्पट होईल. मग तो थोडे थोडे पीठ लावून चांगला मळून घ्यावा. निदान ७-८ मिनिटे मळायला हवा.

आता पीठाचे दोन भाग करुन प्रत्येक भागाचा हाताने थापून थापून ९ इंच गुणिले १२ इंचाचे rectangles करावे. प्रत्येक rectangle ची तीन पदरी घडी घालावी -such that you have a rectangle of 4 inches X 9 inches. कडा हाताने नीट जोडून घ्यावात.

हे आता आतून तेल लावलेल्या ब्रेड टीन मधे ठेवून ( ९ गुणिले ४ गुणिले ५ ) परत एकदा टीन नीट झाकून उबदार जागी ठेवावे - ५० एक मिनिटे.
मग ओव्हन ३७५ डिग्रीला गरम करुन , त्यात मधल्या रॅकवर दोन्ही पॅन ठेवून साधारण ४० मिनिटे भाजावे. पाहिजे तर शेवटची दहा मिनिटे टीन मधून काढून डायरेक्ट ओव्हन च्या रॅकवर ठेवल्यास सगळी कडून छान खरपूस होतो.

वरतून सोनेरी दिसायला लागतो, knock केल्यावर आवाजाने ही कळू शकते झालाय की नाही ते. लगेच काढून वायर रॅकवर गार करायला ठेवावा - वायर रॅक नसल्यास पोळी भाजायची जाळी, उलटी टाकलेली चाळणी काही चालेल.

वाढणी/प्रमाण: 
दोन लोफ
अधिक टिपा: 

युट्युब वर वा शेफ चे व्हिडीओ आहेत ते छान आहेत. जुलिआ चाइल्ड चा जर कुठे मिळाला तर तो, किंवा जेम्स बेअर्ड चे पण बघण्यासारखे आहेत.

माहितीचा स्रोत: 
जुलिया चाइल्ड, जेम्स बेअर्ड यांची पुस्तके; शिवाय अनेक वेळा ट्रायल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, आज करून बघितला हा ब्रेड. खुप दिवसापासून करून पहायच होता पण मैदा कधी घरात नसतो म्हणून मग करणे झाले नव्हते. रेसिपीसाठी अनेकानेक धन्यवाद!!!
मी केलेले बदल -
२.५ कप पाण्याऐवजी २ कप पाणी घेतले कारण ६-७ कप मैदा जरा मळायला कठीण जाईल की काय अशी भिती वाटली.
२ कप पाण्यासाठी ३ कप मैदा आणि १ कप पिल्सबरीची कणीक असे मिक्स करून वापरले.
वर तू लिहिले आहेस त्याप्रमाणे १० मिनीटे घड्याळ लावून मळले. पुन्हा ३ वेळा १-१ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून १-१ मि. मळले
२ टेबलस्पून सनड्राईड टोमॅटो, २ टेबलस्पून लसूण बारीक चिरून, २ टेबलस्पून ड्राईड रोझमेरी, १ टेबलस्पून ड्राईड बेझील असे वापरले.
पहिल्या राईझिंगनंतर हे सगळे मिसळून परत १० मिनीटे घड्याळ लावून मळले. मग अर्ध्या पिठाचा फ्रेंच स्टाईल लोफ आणि अर्ध्या पिठाचा वेणी स्टाईल ब्रेड असे केले.
पण माझ्या ४ कप पिठासाठीपण १ टीस्पून मीठ खुपच कमी झाले. पुढीलवेळी ते पण वाढवेन.
माझा ओव्हन खुप जस्त गरम होतो बहुदा म्हणून ३७५ फॅ. आणि मधला रॅक असूनही खालून थोडा जास्त भाजला गेला. बहुदा मी पुढल्यावेळी ३५० फॅ. तापमानावरच करेन.

ते ब्रेड असे दिसत होते -
Loaf Bread for baking

Braided Bread ready for baking

Bread Closeup

Bread Wreath

Loaf Bread

फ्रेशली बेक्ड ब्रेड चा वास काय मस्त असतो. >>> खरंच. कधी एकदा खातोय असं होतं.

मेधा, मस्त पाकृ. मिनोती, सहीच फोटो.

मी यात कधी कधी लो फॅट दूध घालते पाण्या एवजी . अन १ ते दीड कप होल व्हीट फ्लावर टाकते. किंग आर्थर कंपनीची पीठं मस्त असतात,

खूप वेळा ब्रेडच्या कृती टीव्हीवर बघितल्या आहेत, वाचल्या आहेत पण बिघडेल की काय या भितीने अजून एकदाही ब्रेड केला नाहीए.
कालच इटालियन मैत्रीणीकडून घरी पिझ्झा करायला शिकले. त्यातल्या आणि यातल्या पहिल्या काही पायर्‍या सारख्याच आहेत त्यामुळे थोडी हिंमत आलीयं की हे पण जमेल.

मिनोतीने केलेला ब्रेड किलिंग आहे. मिनोतीच्या गावात नोकरी आणि तिच्या शेजारात घर मिळेल काय ? Wink

फ्रेशली बेक्ड ब्रेड चा वास काय मस्त असतो >>> अगदी. आमच्या शेजारच्या आजी घरी ब्रेड करतात. त्यांच्या घराकडून नेहमी इतके मस्त वास येतात Happy

रच्याकने, शोनु कृतीत एवढं इंग्रजीत का लिहिलं आहेस ?

छान रेसिपी
मी ३-४ वेळा प्रयत्न करुन पाहिला, ब्रेड ठिक होतो पण एकदम soft होत नाही. I am trying to blame it on the oven. Planning to get OTG.

Any suggestions?
दीपा

हायला, ब्रेड अशी करतात मेधा तै. तुमच्यामुळे समजले तरी.
ही पाकृ वाचायला जबरी आहे. सुगरण लेवल एकदम. (मला कधी जमेलसं वाटत नाई).

मिनोती- खतरनाक फोटु. Happy

ऑ ऑ म्हणजे काय? मलाही ही ब्रेड करुन पहायची आहे.

मेधा, पावभाजीला लागणार्‍या ब्रेडची कृती अशीचं असते का?

ऑ ऑ म्हणजे ऑलिव्ह ऑइल. नसल्यास कनोला , दाण्याचं तेल चाललेल. मोहरी , खोबरेल, तिळाचे तेल इत्यादी बहुतेक चालणार नाहीत. प्रयत्न केल्यास निकाल इथे कळव तू.

संजय थुम्मा ( वाह रे वाह शेफ ) च्या व्हिडीओत साधारण याच प्रमाणाने पाव भाजी, वडापावचे पाव केलेले दाखवलेत . मी कधी केले नाहीत, मला असं वाटतं की मुंबैततरी जे पाव मिळतात त्याची कृती थोडी वेगळी असणार.

मेधा, मी तुझ्या कृतीनुसार आत्ताच ब्रेड केला. छान झाला. वरती फक्त जीरे भाजुन लावले. पुढच्यावेळी ईतर व्हेरीयेशन्स करीन. हा फोटो!!!IMG_new_0086.jpg

ह्या कृतीत जर all purpose flour वापरायचं असेल तर बेकिंग सोडा किंवा पावडर किती घालायची? तसेच आपली नेहेमीची कणीक वापरू शकतो का काही प्रमाणात? म्हणजे १.५ कप मैदा आणि १.५ कप कणीक एका लोफ साठी असं करता येइल का?

ऑल पर्पज वापरणार असाल तर इतर बदल काही नाहीत. मी कणीक कधी वापरली नाहीये. किंग आर्थरचे होल व्हीट पीठ १ ते दीड कप वापरते. तसं करताना पण इतर घटकात काही बदल नाही.
जनरली मला ६ ते सव्वा सहा कप पीठ लागतं.

मिनोती अन अमया दोघींचे फोटू लय भारी.

परवा केली ब्रेड. सगळ्या जिन्नसाचं अर्धं प्रमाण घेउन. माझा ब्रेड टिन लहान होता म्हणून मी अर्धा प्रमाणाचे दोन लोफ केलेत. यीस्ट आणि पाणी मिश्रण फस्फसून येते म्हणजे नेमके काय होते? माझं असं सोडा फसफसतो तसं काही झालं नाही. तसंच मी एकदा एकच लोफ बेक केला. त्यात फायदाच झाला. लोफ बेक केल्यावर चव घेतली तेव्हा थोडी कडवट चव लागत होती. म्हणून दुसरा लोफ मी दुसर्या दिवशी केला. कडवट पणा गेला तर जावा म्हणून. उर्लेल्या अर्ध्या गोळ्याची ब्रेड आणि अर्ध्याचे सरळ चीझ पफ केलेत. चीझ पफ छान झालेत अगदि, क्रिस्पि आणि स्पाँजी पण ब्रेड लोफ मात्र फारसा फुगला नाही.
कडवट खुप नाही पण एक चव जाणवतेच शेवटी शेवटी.

मी घेतलेलं प्रमाण असं:

2.75 कप all purpose flour
साधारणतः ३/४ कप साधी कणीक (ह्याच्यामुळे कडवट चव आली असं होऊ शकतं का? पण मी ती मोस्टली पीठाचा गोळा मळताना वापरली. all purpose flour संपलं म्हणून)
1.25 कप कोमट पाणी
1/2 टेबलस्पून ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट
1/2 टेबलस्पून साखर
1/2 टीस्पून मीठ

4 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल.

काय चुकलं असेल ह्यात? बाकी ब्रेड छान फुगली माझी.

पीठावर बारीक बुडबुडे दिस्तात. यीस्टचा वास सुटतो घरभर,

यीस्ट प्रूफिंग गूगल केलं तर बरीच चित्रं सापडतात. इथे आहे त्यासारखे दिसते साधारण.

कडू का लागला असावा याबद्दल मात्र काही सांगता येत नाही. ऑलिव्ह ऑइल जुने होते का ? एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल कधी कधी फार लवकर रॅंसिड होते.

http://faithfulprovisions.com/2010/09/30/how-to-proof-yeast/

असेल कदाचित. ऑलिव्ह ऑईल जुने झाले असेल..यीस्ट असं दिसत तर नव्हतं अगदी पण वास खूप होता घरभर.
मला एक्दा वाटलं कणीक मुळे सुद्धा असं होऊ शकतं. पुढच्या वेळी करताना फक्त ऑल परपज फ्लोर वापरुन करुन बघेन मग कळेल कदाचित काय होतं ते.
थँक यू मेधा!!

मी तर फक्त whole wheat flour वापरुन केला होता. अजिबात कडवटपणा जाणवला नाही.

झेलम, कुठले होल व्हीट पीठ वापरले होते ? रंग काळपट वाटला का? रेसिपी मधे इतर काही बदल केलेले का ? मी जर जास्त होल व्हीट घातले तर नीट फुगून येत नाही. वरच्या मापात १ ते दीड कप होल व्हीट पीठ घालते मी फार फार तर.

मी एकच लोफ केला आणि प्रमाण सगळच अंदाजपंचे गं.
रंग फारसा कळपट वगैरे नाही आला. बाजारात जसा WW ब्रेड मिळतो तसाच.

गोळा फुगण्यासाठी oven थोडासा गरम करुन बंद केला आणि मळलेलं पीठ त्यात ठेवलं

गोळा फुगण्यासाठी oven थोडासा गरम करुन बंद केला आणि मळलेलं पीठ त्यात ठेवलं >> यामुळे तसे झाले असावे. मी एकदा केलाय हा प्रयोग. ब्रेडचे वाट्टोळे झालेले Sad

ओव्हन गरम करण्या ऐवजी एखाद्या भांड्यात दोन कप पाणी चांगले उकळून घ्यायचे अन ते भांडे ओव्हन मधे ठेवायचे. थोडी ह्युमिडिटी पण वाढते अन टेम्परेचर थोडेसेच वाढते. ७०-८- डि फॅ असावे असं म्हणतात बरेच बेकर्स.

गरम पाण्याचे भांडे इडली / डोश्याच्या पीठाबरोबर पण ठेवता येते. मस्त फुगून येते पीठ .