वड्यांचं सांबारं (झिलमिल)

Submitted by मृण्मयी on 11 August, 2013 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

डाळीचं पीठ
हळद
तिखट
मीठ
हिंगं
सावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा 'काळं' मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसाला
कांदे
सुक्या खोबर्‍याचा कीस
आलं
लसूण
खसखस
तेल
पाणी
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सांबारं (रस्सा) :
-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.
-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी सुटून कांदा शिजायला मदत होईल.
-कांदा परतत असतानाच आता यात परतलेला खोबरंकीस घालावा.
-पाण्याचे शिपके देऊन कांदा-खोबरं व्यवस्थीत परतून घ्यावं. (कांदा गळायला हवा.)

vadyancha-sambara-maayboli-1.jpg

-मिक्सरमधून शक्य तितकं बारीक वाटून घ्यावं.
-कांदा-खोबरं परतताना एकीकडे आलं-लसूण वाटून घ्यावं.
-दोन्ही वाटणं थोडीशी वेगळी काढून ठेवावी. ही वड्यांना वापरायची आहेत.
-तेल गरम करून त्यात हिंग घालावा.
-यावर आलं-लसणाचं वाटण, तसंच कांदा-खोबर्‍याचं वाटण घालून परतावं.
-व्यवस्थीत परतून, सगळ्या वाटणांचा गोळा तेल सोडायला लागला की यात हळद, तिखट, मीठ आणि मसाला घालून परतावं.

vadyancha-sambara-maayboli-7.jpg

-उकळीचं पाणी घालून पातळ रस्सा करावा.

vadyancha-sambara-maayboli-8.jpgवड्या:
-जाड बुडाच्या भांड्यात तेल घालून त्यात वेगळी काढून ठेवलेली वाटणं परतून घ्यावी.
-यात हळद-तिखट-मीठ घालून परतावं.
-डाळीचं पीठ घालून पुन्हा खमंग परतून घ्यावं.
-पाण्याचे शिपके देऊन शिजवावं.
-पाणी घालताना एक गोळा तयार होईल, त्याला दणदणीत वाफ येऊ द्यावी.

vadyancha-sambara-maayboli-3.jpg

-गरम गोळ्याला बोटांनी (जपून) चिमटा काढावा.
-बोटांना चिकटला नाही म्हणजे शिजला असं समजावं.
-हे शिजत असताना एकीकडे ताटात खोबरं, खसखस आणि कोथिंबीर पसरून ठेवावी.

vadyancha-sambara-maayboli-2.jpg

-शिजलेला गोळा यावर घालून, थापून, जाडसर वड्या पाडाव्या.

vadyancha-sambara-maayboli-4.jpgvadyancha-sambara-maayboli-5.jpg

-कापून वेगळ्या ठेवाव्या.

vadyancha-sambara-maayboli-6.jpg

-जेवायला बसताना वाटीत वड्या घेऊन त्यावर रस्सा घालावा.

वाढणी/प्रमाण: 
कराल त्याप्रमाणे
अधिक टिपा: 

-सढळ हातानं तेल आणि तिखट घातल्यावर गडद्-काळपट लाल असा तवंग येतो. खाण्याची तब्बेत नसलेल्यांच्या डोळ्यांसमोर झिलमिल तारे चमकतात. पोटाची औकात नसल्यास आपण पुचाट रस्सा करावा.

-वड्या आणि रस्सा एकत्र उकळवू नये.

-काहीही आंबट घालू नये. अगदीच न राहवल्यास सावजी आणि कोकमं एकाच वाक्यात आल्याबद्दल आश्चर्य न वाटू देता कोकमं घालावी.

-ही पध्दत पारंपारीक 'सावजी स्टाइल' आहे असं कळलं. एरवी वड्यांचं सांबारं वेगळ्या पध्दतीनं होतं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिलमिल केलं , खाल्ल. डा.पिठ थोडस करपल्याने, वड्यांचा रंग खास नाही आला. बाकी मजा आली.
धन्यवाद मृण्मयी Happy

rassa.JPG

मृण्मयी, मस्तच रेसिपी. फोटो तोंपासु. Happy
नलिनी, आरती तुमच्या दोघींचे फोटोसुद्धा सही आहेत.
मला बनवण शक्य नाही, हे सुद्धा तुमच्याकडून खाण्याच्या लिस्ट मध्ये. Wink
पहिल पुडाच्या वड्या लक्षात आहेत न. Lol

वा एकदम तोंपासु. यात वड्याऐवजी गोळे केले तर गोळ्याचे सांबारं होईल. Happy जबरी आहे एकुणच.

माझेही झिलमिल. मला आवडते म्हणुन पाटोड्यामध्ये कोथिंबीर घातलीय. खाताना वाटले की जिभेला चटका बसवणरे तिखट केले असते तर अजुन मस्त लागले असते. पण आमच्याकडे पुचाट खायची पद्दत आहे.

जेवायलाच या आता...

वाह.. काय स्लर्पी रेस्पीये..
आवडत्या दहात टाकून ठेवलीये.. म्हंजे साधना कडे जाऊन काय काय खायचेय त्या दहात Wink

पण मला पुचाट रस्सा अज्जिब्बात चालणार नै हाँ.. साध>>ना.. सुन रही है ना तू ..!!! Proud Lol

आरती आणि साधना, फोटो अप्रतिम आलेत.

आरती, करीचा रंग भारी आहे.

साधना, शेवटल्या वाढलेल्या पानाच्या फोटोकडे बघून रस्सा पुचाट वाटत नाही. Happy वड्या मस्तं खुटखुटीत झाल्या आहेत.

आवर्जून करून बघणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या सगळ्यंना धन्यवाद!

अगं आपल्या शेवया असताना ना हाथी ब्रंडवाल्या. त्या आहेत. गॅस बंद करुन नंतर गुळ घातला तरी खीर जराशी फाटली. त्यामुळे ओळ्खता येत नसावी

या रेसिपीनं सांबारं केलं पहिल्यांदाच. इतर काही पदार्थ होते आणि शेवटी कंटाळा आला म्हणून पाटवड्या न करता जाडसर तिखट शेव दिली रश्यासोबत. फारच आवडला हा प्रकार सगळ्यांना.

Pages