वड्यांचं सांबारं (झिलमिल)

Submitted by मृण्मयी on 11 August, 2013 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

डाळीचं पीठ
हळद
तिखट
मीठ
हिंगं
सावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा 'काळं' मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसाला
कांदे
सुक्या खोबर्‍याचा कीस
आलं
लसूण
खसखस
तेल
पाणी
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सांबारं (रस्सा) :
-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.
-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी सुटून कांदा शिजायला मदत होईल.
-कांदा परतत असतानाच आता यात परतलेला खोबरंकीस घालावा.
-पाण्याचे शिपके देऊन कांदा-खोबरं व्यवस्थीत परतून घ्यावं. (कांदा गळायला हवा.)

vadyancha-sambara-maayboli-1.jpg

-मिक्सरमधून शक्य तितकं बारीक वाटून घ्यावं.
-कांदा-खोबरं परतताना एकीकडे आलं-लसूण वाटून घ्यावं.
-दोन्ही वाटणं थोडीशी वेगळी काढून ठेवावी. ही वड्यांना वापरायची आहेत.
-तेल गरम करून त्यात हिंग घालावा.
-यावर आलं-लसणाचं वाटण, तसंच कांदा-खोबर्‍याचं वाटण घालून परतावं.
-व्यवस्थीत परतून, सगळ्या वाटणांचा गोळा तेल सोडायला लागला की यात हळद, तिखट, मीठ आणि मसाला घालून परतावं.

vadyancha-sambara-maayboli-7.jpg

-उकळीचं पाणी घालून पातळ रस्सा करावा.

vadyancha-sambara-maayboli-8.jpgवड्या:
-जाड बुडाच्या भांड्यात तेल घालून त्यात वेगळी काढून ठेवलेली वाटणं परतून घ्यावी.
-यात हळद-तिखट-मीठ घालून परतावं.
-डाळीचं पीठ घालून पुन्हा खमंग परतून घ्यावं.
-पाण्याचे शिपके देऊन शिजवावं.
-पाणी घालताना एक गोळा तयार होईल, त्याला दणदणीत वाफ येऊ द्यावी.

vadyancha-sambara-maayboli-3.jpg

-गरम गोळ्याला बोटांनी (जपून) चिमटा काढावा.
-बोटांना चिकटला नाही म्हणजे शिजला असं समजावं.
-हे शिजत असताना एकीकडे ताटात खोबरं, खसखस आणि कोथिंबीर पसरून ठेवावी.

vadyancha-sambara-maayboli-2.jpg

-शिजलेला गोळा यावर घालून, थापून, जाडसर वड्या पाडाव्या.

vadyancha-sambara-maayboli-4.jpgvadyancha-sambara-maayboli-5.jpg

-कापून वेगळ्या ठेवाव्या.

vadyancha-sambara-maayboli-6.jpg

-जेवायला बसताना वाटीत वड्या घेऊन त्यावर रस्सा घालावा.

वाढणी/प्रमाण: 
कराल त्याप्रमाणे
अधिक टिपा: 

-सढळ हातानं तेल आणि तिखट घातल्यावर गडद्-काळपट लाल असा तवंग येतो. खाण्याची तब्बेत नसलेल्यांच्या डोळ्यांसमोर झिलमिल तारे चमकतात. पोटाची औकात नसल्यास आपण पुचाट रस्सा करावा.

-वड्या आणि रस्सा एकत्र उकळवू नये.

-काहीही आंबट घालू नये. अगदीच न राहवल्यास सावजी आणि कोकमं एकाच वाक्यात आल्याबद्दल आश्चर्य न वाटू देता कोकमं घालावी.

-ही पध्दत पारंपारीक 'सावजी स्टाइल' आहे असं कळलं. एरवी वड्यांचं सांबारं वेगळ्या पध्दतीनं होतं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहबहराट प्रकार आहे हा!
आमच्या सख्ख्या शेजारी काकू नागपूर भागातल्या होत्या! त्या ही पाटवडीची भाजी अप्रतिम करायच्या! सोबत गरमा-गरम भात/पोळी+कांदा+लिंबु! पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचो आम्ही त्यांच्याकडे ही भाजी असली की! आई-काकू पोळ्या करतच रहायच्या आम्ही सगळे (त्यांच्या तिन मुली+आम्ही दोघे बहीण-भाऊ+काका+बाबा+कुणीना कुणी अवचित पाहुणे असायचेच!) जेवायला बसलो की!

सगळ्यांना धन्यवाद!

सुनिधी, मला तर ४,५,६ दिस्ताहेत. तुला दिसावे म्हणून काय करायला हवं? कुणी सांगितलं तर उपाय करते.

वड्या-रस्सा एकत्र फोटो काढायचा राहिला. उरलेलं फ्रीझ केलंय. बाहेर काढल्यानंतर टाकते.

>>काय अफाट कॉन्फिडन्स येईल! खाणार्यांना Biggrin
करून बघ आशूडे. अजीबात कठीण नाही. उकडी काढण्याच्या भानगडी नाहीत.

>>ह्याच त्या पाटवड्या! (पाटोड्या)! ह्या वड्या नुसत्या सुद्धा मस्त लागतात
पण ही भाजी २५/३० लोक असले तर करावी अन झ ण झ णी त च ती मस्त लागते. बोटभर तरी वर तेलाची तर्री हवी
!
हो हो. म्हणून उन्हाळ्यात झेपत नाही. नुस्त्या वड्या फोडणीत घालून खमंग परतल्या तरी मस्तं लागतात.

रस्सा पातळच असावा. वड्या घातल्या की दाट होतोच.

वॉव! पाटवड्याची आमटी! सही फोटो आहेत!!! भाकरीबरोबर सही लागते!
आईला रेसिपी विचारण्याचे खुप दिवस डोक्यात होते. आता ही बघून करतेच!

जबरदस्त फोटो आहेत. घरात बाकीचे डाळीचं पीठ आणि तळण म्हटलं की नाक मुरड्तात.
एकटीसाठी बराच खटाटोप आहे खरा, हे आयतं कुठं मिळेल Proud

छान रेसीपी. घरी नेहेमी करतो या पध्द्तीने.

@ मधवी <<वॉव! पाटवड्याची आमटी! >>

आमटी??? आमटी नका ना म्हणू प्लीज..

मृण्मयी, फोटो ४,५,६ ईमेल ने पाठवशील का? फोटो पहायची अतोनात इच्छा आहे. Happy किंवा वरचे काढुन पुन्हा टाक (वेळ असेल तरच).

जहबहरीही!!! कसले एकसे एक फोटू आहेत.
कैक दिवस झाले पाटवड्यांचा रस्सा खाऊन. लवकरच करायला हवा. पण भारी खटाटोप आहे.

काय अफाट कॉन्फिडन्स येईल! खाणार्यांना>>> आशूडी Lol

बरोबर मलई बर्फी केली तर मंजे बर्फी आणि झिलमिल. परफेक्ट जोडी जमेल.

रेसिपी मस्त आहे. किती पा रंपा रिक.

बट शेरसली त्यापेक्षा पास्ता १० मिनिटात होतो आणि लेस स्पायसी.

धन्यवाद मंडळी.

४,५, ६ पुन्हा टाकून बघते.

अमा, Biggrin तुलना कळली नाही. पुरणपोळी पारंपारिक आहे, पण पीनटबटर सँडविच पटकन होतं. Happy

जबरी !!
मध्यंतरी विष्णूजी की रसोईमध्ये हे खाल्लं होतं.. भारी प्रकार आहे..

दिनेशनी ह्याची रेसिपी टाकली होती का? त्यांच्या रेसिपीने मागे एकदा हे करून बघितल्याचं आठवतं आहे. पण आत्ता ती रेसिपी आणि आम्ही केलेल्याचा फोटो दोन्ही सापडत नाहीये !

मृ, अगं बर्फी सिनेमात प्रियांका चोप्राचे नाव झिल्मिल आहे आणि हिरोचे नाव बर्फी व ते एकत्र बागडत असतात त्याहून. पीब्सँ बद्दल अनुमोदन.

याला सांबार कोण म्हणतं??? हा तर पाटवडी रस्सा.. अन झिलमिल काय? Lol जहाल पदार्थांना क्युट नावं द्यायची सवय आहे का तुला मृ? (संदर्भ: आठव!) Wink
रेसिपी मस्स्त! "मी स्वत:" करुन पाहिली, ऑसम झाली. सुहाना मटन मसाला वापरला. त्याच्या रंगामुळे घाबरुन तिखट जरा कमीच टाकलं (१ छोटा, मसाल्याच्या डब्यातला चमचा) त्यामुळे रस्सा जरा कमी तिखट झाला. पुढच्या वेळी फुल्ल थ्रॉटल जाण्याचा विचार आहे Wink

नलिनी, भारी फोटो आहे.

सुहानाचे मसाले चांगले असतात का? यंदा भारत वारीत १-२ दुकानदारांनी सजेस्ट केले पण अनुभव/माहिती नसल्याने घेतले नाहीत.

>>प्रियांका चोप्राचे नाव झिल्मिल आहे आणि हिरोचे नाव बर्फी Lol
हे नव्हतं माहिती!

नलिनी, सही आहेत दोन्ही फोटो!

नताशा, Lol टिंब वाचा. महत्त्वाचं आहे.

सुहाने मसाले मलापण चालतील. Happy

जळजळाट.. प्रचंड जळजळाट..

सासूबाईंना माहिती आहे का विचारायला पाहिजे.. पुढच्या वेळेस तिकडे गेल्यावर शेवभाजी बरोबर ह्या रस्श्याची पर्माईश करायला पाहिजे..

फोटो बघून , करून बघावसं वाटतंय. घरात झणझणीत कॅटेगरीतले कोल्हापुरी कांदा लसूण, सी के पी , खत्री , रजवाडी गरम मसाला, दगडू ,संजीव कपूरचा चिकन मसाला,नवाबी मीट असे मसाले आहेत. कुठला मसाला ऑथेंटिकच्या जवळपास जाईल?

Pages