टोमॅटो सूप

Submitted by सुज्ञसमन्जस on 5 August, 2013 - 05:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :-
१ किलो टोमॅटो
३ केशरी गाजरे
१/४ बीट
२ कांदे
२ बटाटे
थोडा लाल भोपळा
चवीसाठी टोमॅटो केचप
चवीप्रमाणे मीठ, साखर, काळे मिरे पूड व तिखट
बटर

क्रमवार पाककृती: 

कृती :-
टोमॅटो, गाजर, बिट, कांदा, बटाटा व लाल भोपळा चिरून घ्यावे व त्यात ते बुडतील इतपत पाणी घालून कुकर अथवा मायक्रोवेव मध्ये शिजवून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्यावे. वाटताना जास्त पाणी घालू नये. आवश्यक तेवढेच पाणी घालावे. नंतर हे सर्व मिश्रण चाळणीवर गाळून घ्यावे. असे गाळून घेतल्याने बिया, तूस अथवा चोथा निघून जाईल.
नंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे टोमॅटो केचप, मीठ, साखर, काळे मिरे पूड, तिखट व बटर घालावे आणि उकळी येऊ द्यावी. सर्व्ह करायच्या वेळी वरून थोडे क्रीम आणि ब्रेड क्रम्स घालू शकतो.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ७ ते ८ जन
अधिक टिपा: 

टीप :- सुपास कांद्यामुळे तिखटपणा, बटाटा व लाल भोपल्यामुळे दाटपणा व गाजर आणि बिटमुळे लाल रंग येतो.

माहितीचा स्रोत: 
अनुभव
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिरे लसून हे साधारणतः सार करताना घालतात. हे सूप करताना मी शक्यतो लहान बाळापासून आजारी व्यक्तीपर्यंत चालेल आणि पौष्टिक राहील असा विचार केला आहे.