मावत नसते मुठीत वादळ

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 August, 2013 - 05:53

दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ

आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ

उठता-बसता तिन्ही-त्रिकाळी
तृषा तुझी अन तुझेच मृगजळ

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ

आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ<<<

उत्तम खयाल निभावणी! लहान वृत्त असूनही अर्थपूर्ण, इमेजरीयुक्त, साधेसुधेही शेर! वा वा! अभिनंदन!

-'बेफिकीर'!

>>
गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ
<<
मस्त! Happy

अरे वा ! चक्क चक्क स्वातीताई ? Happy
प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे मनापासून आभार.
बेफिजी विशेष .
-सुप्रिया .

दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ

हे सगळेच शेर आवडले. गझल अत्यंत सुरेख.

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

वा..! काय शेर आहे. सुरेख !!

व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

अप्रतिम.

अरविंद चौधरीजी,
ज्ञानेशजी,.... विशेष Happy
वैशाली,
माशा,
मुक्तेश्वर कुलकर्णीजी,
पुरंदरे शशांकजी,
UlhasBhideजी,
भारती,
शाम,
विदिपा,
गामा_पैलवान Happy

आभार सगळ्याचे Happy

-सुप्रिया.

पानगळीचा शेर आवडला. वाचून शान्ताबाईंनी अनुवादित केलेला एक हायकू आठवली.

हिवाळी वार्‍याने जेव्हा विखुरल्या
पिओनीच्या फुलांच्या पाकळ्या
....काही जोडीने तरंगत खाली उतरल्या!

तुमचा शेरही एक हायकूच वाटला.

Pages