मावत नसते मुठीत वादळ

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 August, 2013 - 05:53

दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ

आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ

उठता-बसता तिन्ही-त्रिकाळी
तृषा तुझी अन तुझेच मृगजळ

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ

कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ

उठता-बसता तिन्ही-त्रिकाळी
तृषा तुझी अन तुझेच मृगजळ

>>>> खत्तरनाक शेर !! सॉल्लिड मजा आला!! व्वाह!

अत्यंत अत्यंत अत्यंत सुंदर!

उठता-बसता तिन्ही-त्रिकाळी
तृषा तुझी अन तुझेच मृगजळ>>> क्या ब्बात है! माझ्या नि. १०त

मावत नसते मुठीत वादळ....व्वा! काय गझल आहे! मस्त!

खूप आवडली......

अवांतर:

तुमच्या सगळ्याच कविता, गझला दर्जेदार असतात! Happy

Pages