Submitted by सुप्रिया जाधव. on 2 August, 2013 - 05:53
दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ
गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ
व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ
खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ
कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ
आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ
उठता-बसता तिन्ही-त्रिकाळी
तृषा तुझी अन तुझेच मृगजळ
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गळतानाही गिरकी घेते लोभसवाणी
गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ
व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ
खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ
कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ
आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ<<<
उत्तम खयाल निभावणी! लहान वृत्त असूनही अर्थपूर्ण, इमेजरीयुक्त, साधेसुधेही शेर! वा वा! अभिनंदन!
-'बेफिकीर'!
पानगळ आवडला.....
पानगळ आवडला.....
व्वा. गझल आवडली. पानगळ सुंदर.
व्वा. गझल आवडली.
पानगळ सुंदर.
सुंदर, आवडली गझल.
सुंदर, आवडली गझल.
सुरेख! सगळीच छान आहे पण पानगळ
सुरेख! सगळीच छान आहे पण पानगळ मस्त.
वा वा! काय गझल आहे
वा वा! काय गझल आहे सुप्रियाताई!
सगळे शेर आवडले.
बेफीजी म्हणाले तेच पानगळ
बेफीजी म्हणाले तेच
पानगळ हासिले गझल
मोहळ मृगजळही छान
दिल खुश केलेत एकदम जियो ताई
पानगळ खूप छान!!!
पानगळ खूप छान!!!
>> गळतानाही गिरकी
>>
गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ
<<
मस्त!
अरे वा ! चक्क चक्क स्वातीताई
अरे वा ! चक्क चक्क स्वातीताई ?
प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे मनापासून आभार.
बेफिजी विशेष .
-सुप्रिया .
छानच... आवडली गझल.
छानच...
आवडली गझल.
दुथडी भरून वाहे ओंजळ कसे
दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ
गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ
व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ
खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ
कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ
हे सगळेच शेर आवडले. गझल अत्यंत सुरेख.
खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ
वा..! काय शेर आहे. सुरेख !!
सुरेख! सगळीच छान आहे
सुरेख! सगळीच छान आहे
सगळीच छान आहे. >> कसे थोपवू
सगळीच छान आहे.
>> कसे थोपवू विचार त्याचे
मावत नसते मुठीत वादळ >> हे आणि पानगळ जास्त आवडले.
मस्त गझल !
मस्त गझल !
अप्रतिम गजल.. व्यथे जरासे
अप्रतिम गजल..
व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ >>> विशेष आवडला
पानगळ आणि वादळ हे दोन सर्वात
पानगळ आणि वादळ हे दोन सर्वात विशेष वाटले. पानगळ खासच.
व्यथे जरासे फिरून येवू
व्यथे जरासे फिरून येवू
घुसमटल्याने येते भोवळ
खडा लागतो आभासांचा
आठवणींचे उठते मोहळ
अप्रतिम.
सुंदर गझल..!! पु.ले.शु!
सुंदर गझल..!!
पु.ले.शु!
सुप्रिया जाधव., परत एकदा साधी
सुप्रिया जाधव.,
परत एकदा साधी निरीक्षणे आणि पल्लेदार भाष्ये! गझल आवडली.
आ.न.,
-गा.पै.
गझल आवडली पानगळ आणि मोहळ हे
गझल आवडली
पानगळ आणि मोहळ हे शेर फार आवडले.
शुभेच्छा!
अरविंद
अरविंद चौधरीजी,
ज्ञानेशजी,.... विशेष
वैशाली,
माशा,
मुक्तेश्वर कुलकर्णीजी,
पुरंदरे शशांकजी,
UlhasBhideजी,
भारती,
शाम,
विदिपा,
गामा_पैलवान
आभार सगळ्याचे
-सुप्रिया.
आवडली.
आवडली.
पानगळीचा शेर आवडला. वाचून
पानगळीचा शेर आवडला. वाचून शान्ताबाईंनी अनुवादित केलेला एक हायकू आठवली.
हिवाळी वार्याने जेव्हा विखुरल्या
पिओनीच्या फुलांच्या पाकळ्या
....काही जोडीने तरंगत खाली उतरल्या!
तुमचा शेरही एक हायकूच वाटला.
चांगली गझल
चांगली गझल
चांगली गझल
चांगली गझल
खूप सुंदर कविता !!! सगळ्याच
खूप सुंदर कविता !!!
सगळ्याच ओळी मनास भिडणार्या !
सह्हीच
सह्हीच
छान आहे.
छान आहे.
पानगळ आणि मोहळ
पानगळ आणि मोहळ आवडले.
धन्यवाद!
Pages