"चहा घ्या, चहा " ( बदलून, जास्त स्पष्ट फोटो )

Submitted by अवल on 31 July, 2013 - 23:17

क्रोशाने विणलेली दो-याची कपबशी
Cup_3 copy.jpg1375296479726.jpg

अन हे आई सोबत बाळही Wink

Cup_1 copy.jpg
अजून ५ बाळं करायचीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

खरच अव्वल!
बाळी कपबशी आणि तिची तोर्‍यात उभी मॉमी, मस्त आहेत. ५ विणून झाल्यावर नक्की टाका फोटो. लेकूरवाळी कपबशी मस्त दिसेल. Happy

बाळ आणि आई एकदम मस्त !
कपाच्या बेसला बांगडी वगैरे किंवा दुसरं काही वापरलंय का ?

धन्यवाद सर्वांना Happy
भानिप्रिया, " माते" चा अधिकार इथे श्रद्धाला आहे Wink
माशा, नाही बांगडी नाही वापरलेली. क्रोशामध्ये बिस्किट वीण नावाचा एक प्रकार आहे. त्याचे टेक्निक वापरलेय इथे.

अवल, काय मस्त झाली आहे कपबशी. खरंच, तुझ्या बोटात कला आहे. तु नुसतं बघुन काहीही करु शकतेस. तुला काही लिंक पाठवल्या तर तुला आवडतील का?

अवल, ही घे लिंक..http://pinterest.com/pin/294985844313734353/
http://www.favecrafts.com/Crochet/14-Free-Crochet-Patterns-Summer
तु इथे क्रोशाची फुले टाकलेलीस तशीच अजुन काही फुले..http://www.favecrafts.com/Crochet-Flowers/14-Free-Crochet-Flower-Patterns
कदाचीत तुला ही माहीत असेलही.

शशांक, मी जरा आळशी आहे रे Happy कँमेरा, काढा, मग त्यावरचे फोटो कॉम्पवर टाका, मग पुन्हा कँमेरा ठेवा....पेक्षा मोबाईलचा कँमेरा सोपा वाटतो Wink
पण लक्षात ठेवेन पुढे Happy
विद्याक, रंगासेठ, मानुषी थँक्यु

अवल, अजुन काही लिंक मला आवडलेल्या आणि तु, जयवी अशा क्रोशावर्क करणार्‍यांना पण आवडतील अशा लिंक.......
http://www.mypicot.com
http://pinterest.com/aliciacastromsv/crochet/
http://potholderswap.blogspot.com/

आईग्गं... शब्दच नाहीत. अगदी ठुमकेदार झालीयेत कप अन बशी.
अवल, खरच पुढल्याखेपी तुझे पाय धरणारय.
(रच्याकने... अवल हे अवलियाचं संक्शिप्तं रूप असण्यावर माझं ठाम का काय ते मत्तं होत चाललं आहे... विलक्षण कला आहे तुझ्या हृदयात. बुद्धी अन हात त्याला जे सक्षी रूप देतायत... दृष्टं लागेल अस्सं)

Pages