"चहा घ्या, चहा " ( बदलून, जास्त स्पष्ट फोटो )

Submitted by अवल on 31 July, 2013 - 23:17

क्रोशाने विणलेली दो-याची कपबशी
Cup_3 copy.jpg1375296479726.jpg

अन हे आई सोबत बाळही Wink

Cup_1 copy.jpg
अजून ५ बाळं करायचीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मी पण फेसबुकवरच पाहिलं, अन प्रेमात पडले त्याच्या. एका ब्राझिलियन बाईंनी केलेलं. मग बसवले डिझाईन.वेगळे टेक्निक वगैरे नाही, क्रोशाच आहे साधं:)

शिरसाष्टांग ........
क्रोशातून तू काहीही निर्माण करु शकशील गं ......

बागेश्री, शशांक, अंजली, धन्यवाद Happy
शशांक, नाही रे तुझ्यासारख्या बालकविता नाही जमत त्यातून Wink

ओके.
मला वाटले स्टिफनेस साठी काहीतरी करतात की काय. तो कप किती छान उभा आहे,

, नाही रे तुझ्यासारख्या बालकविता नाही जमत त्यातून Happy

हो, साधना तू म्हणतेस ते खरय. स्टिफनेस साठी त्याला स्टार्च करतात. पण मी अजून केला नाहीये. दो-याचा स्टिफनेस सध्यातरी पुरलाय. पावसाळा संपला की करेन स्टार्च Happy

सह्ही!!!!!
काय झक्कास जमलिये कप बशी Happy
नायलॉनचे दोरे वापरले तर स्टीफनेस येइल ना?
माझी आई, मावशी नायलॉनचे दोरे वापरून पर्सेस, टीकोझी बगैरे बनवायच्या...

सुंदर, छान,मस्त, झकास, सुबक आणि अप्रतिम. Happy
______________/\_______________. Happy

काय कला आहे ग तुझ्या हातात. >>>>>>>>>>>>>>तुम्हारे ये हात मुझे दे दे अवल. Proud

तुम्हारे ये हात मुझे दे दे अवल

कला हातांआधी डोक्यात येते आणि मग ती हातात उतरते...... उधार की जिंदगी मागुन किती आणि काय काय मिळणार??? Happy Happy

सोबत पेशन्स आणि सुरू केलेले काम पुर्ण होईतो खाली न ठेवणे हे दोन गुणही आवश्यक आहेत. माझ्यात नेमका ह्या दोन गुणांचा अभाव आहे, नाहीतर....... Wink

वा! आवडली बुवा कप-बशी!!

दोर्‍याची कप-बशी, उभी परी कशी, पूर्ण तोर्‍यात ।
कमालीची रंगसंगती, मोहकही अती, कला बहरात ॥

मस्तं!
क्रोशाच्या बालकवित करता येतील हो मॅडम.
एक क्रोशाचा 'चॉकलेटचा'बंगला विणून पहा.

किंवा त्या लाजो केक्सचे परीकथेतले चित्रं करतात तसे करा.

Pages