माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - १२ पासेस, ९ लेक्स अर्थात लेह-लडाख.

Submitted by केदार on 31 July, 2013 - 09:35

गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !

२०१२ च्या सिझन मध्ये मला जायचे होते पण माझ्या येणार्‍या सर्व मित्रांनी टांग मारली व नेहमीप्रमाणे मी एकटाच उरलो. मग जावे की नाही? ह्यात नाहीचा जय झाला आणि २०१२ असेच गेले. २०१३ च्या सुरूवातीलाच मी कैलास मानसरोवर यात्रेसाठी नाव नोंदनी केली आणि योगायोगाने माझे सिलेक्शन बॅच नं ७ साठी झाले. मग तेंव्हा (एप्रिल मध्ये) असे ठरविले की ह्या वर्षी परत लेहला सुट्टी किंवा अगदीच सप्टे मध्ये मला १० दिवस वेळ आहे तेंव्हा. कैलासाच्या नादात लेह बाजूला पडले, पण ह्या वेळी कैलास होणे नव्हते कारण उत्तराखंडाचा महापूर! त्यात बॅच २ ते १० रद्द झाल्या. तो महिना होता जून. आणि मी जुलै मध्ये कैलाससाठी जाणार होतो. रद्द झाल्यामुळे परत एकदा 'लेह'च्या आशा पुनर्जीवित झाल्या आणि मी परत एकदा मित्रांना विचारायला सुरू केले. परत तेच, कोणीही यायला तयार नव्हते. पण ह्यावेळी मी हारणार नव्हतो. एकटा तर एकटा. नाहीतरी मी अनेक ट्रेक गेले वर्षभरात "सोलो" केले आहेत, त्यामुळे सोलो साठी मी तयार होतो. पण पूर आणि इतर अनेक कारणांमुळे घरचे मात्र मला जाऊ द्यायला तयार नव्हते. अनेक भांडणे झाल्यावर बायको यायला तयार झाली. ( कारण माझ्या पत्नीला रोडवरील प्रवास अजिबात आवडत नाही शिवाय सतत गोल गोल नागमोडी रस्त्यांचा तिला तिटकारा आहे) मग मुलांचे काय करणार? तर त्यांनाही घेऊ या अशी पुस्ती मी जोडली. मग परत घरच्यांच्या शिव्या, पुराची परिस्थिती असूनही मुलांना इतक्या दुर ते ही जवळपास ६५०० किमी होती आणि ते पण माउंटेन्स मध्ये अशी ट्रीप मी आखू देखील कशी शकतो ह्यावर चर्चा / वाद असे होत होत शेवटी मी ज्या दिवशी कैलासला जाणार होतो ( ४ जुलै ) त्याच दिवशी लेहला पण निघायचे असे ठरले. पण आदल्या दिवशी परत गोंधळ झाला कारण माझ्या लहान भावाला अशी ट्रिप ( सोलो किंवा फॅमिलीसहीत) करणे म्हणजे येडेपणा वाटत होता. मग परत चर्चा/ विचार विनिमय आणि माझे आश्वासन की काहीही होणार नाही ! आणि सरतेशेवटी ऑल वॉज गुड !

सगळ्यात महत्त्वाची होती गाडीची तयारी !

लेहला जाणार म्हणून काही गोष्टी ज्या अत्यावश्यक होत्या त्या मी घेतल्या त्या अशा.
स्पेअर डिझेल टँक
पंक्चर रिपेअर किट ( ट्युबलेसचा मिळतो)
सिगारेट लायटर मधून चालणारे एअर कॉंप्रेसर.
२ लिटर कुलंट
१ लिटर ब्रेक ऑईल.
सिगारेट लायटर मोबाईल चार्जर
गाडीचे पूर्ण सर्व्हिसिंग आणि सगळ्या लेव्हल्सचे टॉपप.
बाकी गाडी तशी नवीनच असल्यामुळे टायर्सला काही प्रॉब्लेम नव्हता.
ऑक्झिलरी लॅम्प बसवावेत अशी माझी इच्छा होती. (ज्यामुळे प्रकाश कमी पण गाडीला स्पोर्टी लुक येईल हा अंतस्थ हेतू होता) पण माउंटेन्स मध्ये मध्ये रात्री गाडी चालवायची नाही असा एक रुल मीच बनविल्यामुळे ऑक्झिलरी बसवले नाही. पण तत्पूर्वी चांगल्या थ्रो साठी मी तसेही HID ६०००के चे बसवून घेतले आहेत त्यामुळे "लाईट" चा प्रॉब्लेम सॉल्व झाला.

बाकी तयारी.
१. अनेकदा वाद घातले. ज्यामुळेच ही ट्रीप माझी न होता "आमची" झाली. त्यामुळे मी आनंदी आहे.
२. काका हलवाईवर धाड मारून जायच्या आदल्या दिवशी ( ३ जुलै) भरपूर खायचे सामान भरून घेतले.
३. गाडीचे सीट फ्लॅट करता येतात त्यामुळे अंथरुन आणि पांघरून व उश्या Happy
४. बायकोला नवीन गाणे आवडतात त्यामुळे नवीन दोन तीन सिड्या.
५. आणि दुपारी २ नंतर जाऊनही BSNL चे पोस्ट पेड कार्ड - जे अत्यावश्यक आहे. लेह मध्ये एअरसेल, एअरटेल आणि BSNL ( सर्व पोस्ट पेड) चालतात. तर लेहच्या आजूबाजूला फक्त BSNL चालते. माझे एअरटेल असल्यामुळे मी तसा बिनधास्त होतो पण दुपारी मित्राचा फोन आला ( जो सहकुटूंब विमानाने लेहवरून आदल्यादिवशीच २ जुलैला वापस आला होता) त्याने सांगीतले की अरे BSNL इज मस्ट. मग काय गेलो सर्व कागदपत्र घेऊन आणि आणले कार्ड. जे खरच कामाला आले.
६. छोटे ऑक्सिजन सिलेंडर मी खूप शोधले पण मला मिळाले नाही. पुढे श्रीनगर मध्ये घेऊ असा विचार करून निघालो.
AMS साठी डायमॉक्स आणि इतर नेहमीची सर्दी, डोके, अंगदुखी, ताप ह्यावरी औषधे.
८ आणि मुलांसाठी आयपॅड वर अनेक नवीन गेम्स डाउनलोड केले. ( हे सर्व ३ जुलैला म्हणजे आदल्या दिवशी! )

होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.

संपूर्ण वृत्तांत येत आहे. तो पर्यंत हे टिझर्स. ( आय नो की फोटो त्यातल्या त्यात माझे, विल नॉट डू जस्टिस. )

द जुले लॅण्ड -

DSC_013139.jpg

माय चीता - काईन्डा होम !

DSC_0358.jpgTso_Moriri_road.jpg

दे से - देअर आर रोडस अ‍ॅण्ड देअर आर रोडस. काही ठिकाणी अत्यंत सुंदर टार रोड आणि काही ठिकाणी केवळ टायर ट्रॅक्स दिसतात म्हणून रोड आहे असे म्हणायचे. To see that wild, raw, untouched nature you need to burn lot of diesel and need to have lot of will power and patience खूप ठिकाणी " स्लो अ‍ॅन्ड स्टेडी विन्स द रेस" त्यामुळेच लिहिले आहे.

DSC_0111.jpgRoads_7.jpgFotula_roads2.jpgDSC_0351.jpgTso_Moriri_3.jpgTso_Moriri_9.jpg

क्रमशः

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ
भाग नऊ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना काखोटी मारून या ट्रिपा करणं शूर आई-बाप असल्याचं लक्षण आहे! >>> + १००००० Happy

भारी !! पुढच्या भागाची वाट पाहतेय.

जबरीच! पुढल्या भागांच्या प्रतिक्षेत! Happy

परदेशात अश्या टूर्स केल्या जातात असं ऐकून आहे. पण आपल्या देशात मात्र अजून हे दुर्मिळ आहे.

शिवाय मुलांची वयं पाहता बर्‍यापैकी धाडसाचंच आहे!
सततच्या ड्रायव्हिंगला मुलं कंटाळली नाहीत हे विशेष!

मुलांची वयं बघता खूपच कमाल... त्यात मुले कंटाळली नाहीत?

रोजचे सकाळचे कॉल्स आठवले की मुलं असल्या प्रवासाला नाही म्हणतात..(मला ह्याचीच चिंता असते प्रवासात... बाथरूमचे काय?). Proud

केदार आता अशीच सिक्किम - भूतान ट्रिप प्लान कर.>>
आणी आमच्या सारख्या मित्रांनाही विचार. यु नेव्हर नो. आम्ही कदाचीत हो सुध्दा म्हणु. Happy

लोल दिप्या. Happy

नाही मुलं पहिले आठ नऊ दिवस अजिबात कंटाळली नाहीत. उलट आदित्य (हा कार लव्हर आहे आणि बहुदा त्याच्या बाबासारखा बिनधास्त) तर बाबा, माउंटेन्स कधी येणार आहेत आणि आपण लॅन्डस्लाईड मध्ये कधी अडकणार? असे सारखे विचारत होता. Happy पटनीटॉप च्या गडद धुक्यात रात्री १२ वाजता तो एजाँय करत होता. एकदम बिन्धास्त मुलगा आहे हा!

तर यामिनी (माझी मुलगी) हे हानले मधील मिल्की वे पाहायला खूप उत्सूक होती. आणि प्रज्ञाला मी प्रॉमिस केले की श्रीनगर आणि लेहला रिसॉर्ट मध्येच राहू. प्रज्ञा आणि माझ्या व्हेकेशनच्या कन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. तिला रिलॅक्स राहायला आवडते तर माझ्या टाईपच्या व्हेकेशन नंतर लोकांना आणखी एक व्हेकेशन घ्यावे लागते. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस, ट्रेक, जे जे होईल त्याला आनंदाने सामोरे जाणे, काही मिळाले तर खाणे-पिणे अन्यथा पुढचा स्टॉप अश्या टाईपचे असते.

सततच्या ८-१० दिवसांच्या ड्राईव्हिंग नंतर मात्र आदित्यला घराची आठवण खूप जास्त येऊ लागली, त्यानंतर आमचा प्लान आणखी बदलला. तो कसा? हे मी पुढे लिहिलच. Happy

हो मुलांसोबत ही ट्रीप करणे खूप अवघड आहे. इथे मी पोस्ट लिहितोय पण प्रत्यक्षात अवघडच आहे. म्हणून लेहला मुलं जी येतात ती विमानाने. पण एकदा प्रज्ञा येणार असे ठरल्यावर यामिनी म्हणाली की मी ही येणारच, मग आदित्यला का सोडा? Wink यामिनीसाठी ही ट्रीप कदाचित माझ्यापेक्षाही महत्त्वाची होती कारण तिचे पूर्ण जीवन अमेरिकेत गेले. सेक्युअर्ड वातावरणात. पण वन्स यू हिट द रोड, खरा भारत तुमच्यासमोर उलगडतो. आय अ‍ॅम शुअर ती खूप शिकली असेल फक्त तिला लगेच व्यक्त करता येणार नाही. ही ट्रीप नक्कीच तिच्या पुढच्या आयुष्यभर एक अनुभव म्हणून झिरपत राहिल.

केदार आता अशीच सिक्किम - भूतान ट्रिप प्लान कर.>>
आणी आमच्या सारख्या मित्रांनाही विचार. यु नेव्हर नो. आम्ही कदाचीत हो सुध्दा म्हणु. >>

केप्या डेट सांगा. मी तय्यार आहे. एनीटाईम एनीवेअर विथ माय व्हाईट चीता. Happy मग एक दिवसाची आउटिंग असो वा २० दिवसांची. Happy

झंपी हो नकाशे होते सोबत. पण ते कधीही उघडले नाहीत कारण ते मनात इतके पक्के बसले आहेत की बास. दोन वेळेला लेह मध्ये मी अत्यंत प्रोफेशनल अशा "टॉप गिअर" च्या टीमला गाईड केले ह्यावरून काय ते समजा.

अफाट सुंदर!
मुलांना घेउन जाण्याचा धाडसी निर्णय घेतलात! Happy
पाऊस नव्हताच का?
वृत्तांताच्या प्रतिक्षेत! Happy

_/\_ मह्हान आहे तू अन वहीनीपण.
केदार, झाला हौसींग सोसायटीचे एक जीटीजी ठेवायचं का? Wink Proud

आर्या,
पाऊस महाराष्ट, गुजराथ आणि उदयपूर पर्यंतचा राजस्थान इथे जाताना व येताना (अगदी मुसळधार) होता.

दिप्या ठेव की. पण लोकांना जपान वरून इथे यावे लागेल. Happy

जबरी, केदार! अजून टाक जमेल तसे. ही नंतरची पोस्टही आवडली.

माझ्या टाईपच्या व्हेकेशन नंतर लोकांना आणखी एक व्हेकेशन घ्यावे लागते.>>> Lol

एकदम झक्कास Happy
खरोखर हेवा वाटला.

आणी आमच्या सारख्या मित्रांनाही विचार. यु नेव्हर नो. आम्ही कदाचीत हो सुध्दा म्हणु. >> कदाचित नाही नक्किच हो म्हणेन आणि ड्रायव्हिंगचा लोड पण कमी करेन Wink

(केदारच्या घरी गटगला पॉवर पॉइंटवर लेह लडाख फोटो विथ चहा भजी इमॅजिन करणारा निवांत)

आता घाइट आहे. ही फक्त पोचपावती.
सविस्तर वाचणे आणि फॉटो नीट बघणे बाकी आहे..
त्यामुळे परत प्रतिसाद देइनच.
क्रमशः जास्त ताणू नको एवढीच विनंती. Happy

बा द वे, यु आर क्रेझी Happy

तिचे पूर्ण जीवन अमेरिकेत गेले. सेक्युअर्ड वातावरणात. पण वन्स यू हिट द रोड, खरा भारत तुमच्यासमोर उलगडतो.

याबद्दलही वाचाय्ला आवडेल. एकट्याने केलेल्या प्रवासात काय काय घडू शकते, काय काळजी घ्यावी इ.इ.

केदार, वरच्या पोस्ट पण आवडल्या. तुम्ही दोघंही धन्य आई-बाप आहात. त्यामुळे मुलं देखील. पुढले भाग लवकर येऊ देत.

भारीच एकदम.
मुलांची वये पाहता महाधाडसी.
इतका वेळ ड्राईविंग करायला खरंच पेशंस हवा.
नाईट ड्राईविंग केलं नाहीस हे बरं केलंस.
लवकरात लवकर आम्हाला हा प्रवास इथे माबोवर घडव.

Pages