तुम्हाला ट्रेक दरम्यान आलेले मजेदार अनुभव / किस्से : Share करा

Submitted by बंकापुरे on 31 July, 2013 - 07:24

मंडळी,

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेक दरम्यान काही मजेशीर किस्से अनुभवायला मिळाले असतीलचं … जसे कि एखाद्या गावातल्या मामांनी टाकलेली सणसणीत थाप, किंवा एखाद्याचा झालेला पोपट (?), … गावातल्या मामाची जरा जास्तंच झालेली आणि त्यातून त्याने सांगितलेली उलट-सुलट माहिती … किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच …वगैरे वगैरे …
जमल्यास असले अनुभव इथे सगळ्यांना Share करा …अशी विनंती

माझ्याकडून पहिला किस्सा :

खुटेदरा ट्रेक दरम्यान रामपूर गावातल्या तानाजी मामांनी दुर्ग किल्ल्यावर 'सिंह' सुद्धा आहेत असा ठणकावून सांगितलं होतं :

वाटेत जंगली प्राण्यांची चौकशी केल्यावर तानाजीमामांनी गडावरच्या जंगलात वाघ, अस्वल, हरीण, रानडुक्कर आणि 'सिंह' सुद्धा आहेत...!!!! असं सांगितलं ... मजबूत-पाट्या ने 'सिंह' फक्त भारतातल्या 'गिर' अभयारण्यातचं सापडतात असा स्पष्टोल्लेख केला... तरी पण तानाजीमामांनी वर 'सिंह' आहेतचं असं ठणकावुनच सांगितलं ...तत्त्व महत्त्वाची ....

http://www.bankapure.com/2012/12/Khutedhara-Durg-Trigundhara.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच वाचून काढले सर्व किस्से.. एकापेक्षाएक आहेत.. Rofl नंबर १ आहेत सगळेच!!
२०१३ मधे मी हा धागा कसाकाय मिस केला बरं..

२२ ऑक्टोम्बरला सह्याद्री प्रतिष्ठानची दसरयानिमित्त राजमाची मोहीम होती.कर्जत विभागाकडून मोहीम आखण्यात आली होती.दसरा गडावर साजरा करायचा हे मनाशी ठरवून ऑफिसला सुट्टी मारली आणि मालाडवरून सकाळी ५ वाजता निघालो.६ वाजेपर्यंत दादर गाठले.६.२४ कर्जत लोकल रद्द जाली आणि माझ्या अख्ख्या मोहिमेचा बट्याबोळ झाला.कल्याण वरुन कर्जत गाठेपर्यन्त ९ वाजून गेले.तोपर्यंत शिलेदार पुढे निघुन गेले होते.श्रीनाथ पुल कर्जत येथून टमटम पकडून कसाबसा कोंढानेला पोचलो.कोंढाने वरुन वाटेला लागण्यासाठी अजुन वेळ गेला.प्रत्यक्षात १० वाजता एकट्यानेच चढ़ाई चालू केली. अर्ध्या तासाच्या अंतरावर कोंढाने लेण्यांचे दर्शन ज़ाले.अप्रतिम शिल्पकाम पाहून थकक व्ह्ययला होते.गिर्यारोहकांच्या सरावासाठी ईथे क्लायंबींग वॉल सुद्धा आहेत.लेण्यांजवळ चिटपाखरूसुद्धा नहवते.राजमाचीची वाट चुकलो असे वाटले.परत अर्धा रस्ता मागे आलो.तिकडे गुराखीनी सांगितले की लेण्यांच्या खालुनच राजमाचीकडे वाट जाते.परत माघारी फिरलो.लेण्यांजवळ छोटीशी पाटी लावली होती .राजमाचीकडे......एवढीशी पाटी दिसली नाही म्हणून स्वतावरच वैतागलो.अशा रीतीने एकदाचा वाटेला लागलो. सपाट रस्ता संपूण मुख्य चढाला सुरुवात झाली.राजमाचीने आपले अजस्त्र रूप दाखवायला चालू केले.एव्हाना ११ वाजून गेले होते.सूर्यदेव आकाशातुन जोरदार मारा करू लागले होते. बैगमध्ये एक बिसलरी आणि २बिस्कीटचे पुडे एवढेच सामान होते.एक डोंगर पार करतोय तोपर्यत २ डोंगर हजर.आता येईल असे वाटते तर साफ निराशा.घामाने अंघोळ जाली होती.२ मिनिट विश्रांती घ्यायला बसलो की हृदयाची मशीन ठोके देणे चालू.ट्रैक्टरचे इंजिन परवडले ते तरी कमी आवाज करते.

जंगलात खेकड्यांची सुरसुर चालूच होती.जंगलात साग आयन,नाण्या ,हेळा यांचे प्रमाण जास्त आहे.इथल्या स्थानीकानी झाडाना हात लावला नाही याचे कौतुक वाटले नाहीतर आमच्या कोकणात राजरोस जंगलेच्या जंगले ओसाड होतात.कसाबसा राजमाची गावात पोचलो.३००० फुटावर हा गांव वसलेला आहे.एवढी चढाई केली ती यांच्यापुढे शून्य ठरली. यांचे रोजचे व्यवहार एवढ्या उंचीवरून होतात.खरेदसाठी यांना एवढी पायपिट करून कोंढाने गावात यावे लागते.आडवळणावरला महाराष्ट्र म्हणजे नेमके काय ?हे या खेड्यात उमजु शकेल.गडावर जाण्यासाठी पक्की पायवाट बांधण्यात आली आहे.इथून पुढे २० मिनिटे पायपीट केल्यावर कालभैरव मंदिरात पोचलो.ईथे राजमाचीचा नकाशा लावला आहे.देवाच्या पाया पडुन सोने वहिले.शिलेदार यथासांग पूजा करुनच गडावर गेले होते.मंदिराच्या बाजूला २ तोफा ठेवलेल्या आहेत.कालभैरव मंदिरपर्यंत पोचायला मला १.३० वाजला होता.इथून गडाची अर्ध्या तासाची चढ़ाई बाकी होती.सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळयानी बुरुजावर लावलेले भगवे निशान दिसत होते.वेळ कमी असल्यामुळे माघार घेणे क्रमप्राप्त होते.मंदिराजवळून भगव्याला आणि राजमाचीला मनोभावे वंदन केले आणि परतीची वाट चालू लागलो.कोंढणे गांव गांठेपर्यन्त ५ वाजून गेले .तिथून रिक्षा नसल्यामुळे परत कोंदिवटे गावापर्यंत ७-८ किमी पायपिट करावी लागली.इकडे नविनच संकट उभे ठाकले होते.कर्जतला जायला एकही रिक्षा नहवती.अर्ध्या तासाच्या नंतर नशीबाने रिक्षा भेटली.कर्जत गाठेपर्यन्त ६ वाजले होते.इथून पुढे कर्जत ते दादर व् दादर ते मालाड करत एकदाचा घरी पोचलो. तेव्हा १०.३० वाजले होते.

अतीरिक्त :
राजमाची मात्र अजेय राहिली.श्रीवर्धन आणि मनरंजन बुरुज कसे आहेत याची उत्सुकता आहेच.राजमाची आता थंडीच्या दिवसात हाती घेईन.

कोंढाणे लेणी आणि राजमाची परिसर प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या,बिस्कीटचे रिकामी पुडे,जेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट यांनी भरून गेला आहे.पाण्याची रिकामी बाटली सुद्धा आपण बैगेतुन परत न आणता सहजपणे फेकून देतो.या प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी कितेक हजार वर्ष लागतात हे आपल्या ध्यानीमनी नसते. जोपर्यंत खालेल्या चॉकलेटचा कागद खिशामध्ये न जाता जमिनीवर पडत राहील तोपर्यंत हे असेच चालायचे!

या परिसराला प्लास्टिकच्या विळख्यातुन सोडविण्यासाठी सह्याद्रीच्या सर्व मावळ्याना विनंती करत आहे की या परीसरात एक संवर्धन मोहीम होणे गरजेचे आहे.यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये आम्ही मोहीम राबविणार आहोत.

Pages