तुम्हाला ट्रेक दरम्यान आलेले मजेदार अनुभव / किस्से : Share करा

Submitted by बंकापुरे on 31 July, 2013 - 07:24

मंडळी,

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेक दरम्यान काही मजेशीर किस्से अनुभवायला मिळाले असतीलचं … जसे कि एखाद्या गावातल्या मामांनी टाकलेली सणसणीत थाप, किंवा एखाद्याचा झालेला पोपट (?), … गावातल्या मामाची जरा जास्तंच झालेली आणि त्यातून त्याने सांगितलेली उलट-सुलट माहिती … किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच …वगैरे वगैरे …
जमल्यास असले अनुभव इथे सगळ्यांना Share करा …अशी विनंती

माझ्याकडून पहिला किस्सा :

खुटेदरा ट्रेक दरम्यान रामपूर गावातल्या तानाजी मामांनी दुर्ग किल्ल्यावर 'सिंह' सुद्धा आहेत असा ठणकावून सांगितलं होतं :

वाटेत जंगली प्राण्यांची चौकशी केल्यावर तानाजीमामांनी गडावरच्या जंगलात वाघ, अस्वल, हरीण, रानडुक्कर आणि 'सिंह' सुद्धा आहेत...!!!! असं सांगितलं ... मजबूत-पाट्या ने 'सिंह' फक्त भारतातल्या 'गिर' अभयारण्यातचं सापडतात असा स्पष्टोल्लेख केला... तरी पण तानाजीमामांनी वर 'सिंह' आहेतचं असं ठणकावुनच सांगितलं ...तत्त्व महत्त्वाची ....

http://www.bankapure.com/2012/12/Khutedhara-Durg-Trigundhara.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्याच वर्षांपूर्वी आम्ही ट्रेकला गेलेलो वासोट्याला ,धुके फार पडलेले .दोघे तिघे बाटल्या घेऊन हागायला गेले ,धुक्यात ते लगेच गडप झाले कारण धुके दाट होते .तीनचार मिनिटात अचानक धुके हटले ... बघतो तर काय ..सगळेजण अगदी थोड्या अंतरावरच कार्यभाग करत होते Wink .धुक्यामुळे त्यांना वाटले आपण फारच लांब आलो आहोत Proud

मित्रांनो गडावरून ‘परसागड’ वर छानच अनुभव लोकांचे येत आहेत. विषयांतर करण्यासाठी माझा एक अनुभव

खरपूस अनुभव.
९४ साली राजगडावर मी माझा भाऊ व त्याचा एक मित्र असे तिघेच गेलो. दुपारी २ पर्यंत गडावर पोहचलो. दुपारचे घरून आणलेले जेवण उरकले. संध्याकाळी सुवेळा माची पाहून पद्मावती मंदिरात मुक्कामाला पोहाचलो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. भुका लागल्या होत्या. जेवण्यासाठी पटकन तयार होईल म्हणून मॅगीचे २ पुडे नेले होते. दुसºया दिवशी सकाळी पोहे करून घरी परतण्याचा विचार होता. भाऊ मोठा असल्याने त्याने पाणी, जळणासाठी लाकूड याची तजवीज करण्याचा आम्हावर हुकूम सोडला. आम्ही बिचारे (मी) लाकूडफाटा व पाणी घेऊन पद्मावती मंदिरामागील आडोशाला चूल करून बसलो होतो. चूल करण्यासाठी व मॅगी करण्याची मेहनत भावाने उचलली होती. तीन दगडावर पातले ठेऊन त्यात पाणी, कांदा, मसाला टाकून मस्त पैकी मॅगी तयार होत होती. चूलीवरील पदार्थ तयार करण्याचे कसब आमच्यात कोणाचातच नव्हते. मॅगी तयार झाली. अंधारात बॅटरीच्या उजेडात भावाच्या मित्राने टॉर्च दाखविला. मी ताटली घेऊन आदशासारखे पाहत होतो. चुलीवरून भांडे खाली उतरविण्यासाठी भावाने एका पेपरचे दोन थोडे मोठे तुकडे केले. येथपर्यंत चांगले चालले होते. दोन्ही पेपरचे तुकडे घेऊन भावाने पातले धरले व उचलले. काही काळायच्या आत ‘आईच्या गावात...’ असे तो जोरात ओरडला. काय झाले म्हणून अंधारात आम्ही दोघे पाहत होतो. विस्तवासाठी जळाऊ लाकडाची चांगली धग येत होती. झळ हाताला जोरात लागल्याने भावाने तयार झालेले मॅगीचे भांडे हातातून सोडून दिले होते. भांड्यातील तयार झालेली गरम मॅगी खालील विस्तवावरती पडली. अंधार पसरला. दहा पंधरा सेकंद काय करायचे तेच समजेना. टॉर्चमधील प्रकाशात धुराचा लोट पसरला होता. मॅगी मस्त पैकी खरपूस जळत होती. भावाने पटकून झारा घेऊन वरील उरलेली मॅगी उचलून ताटली घेण्याचे आदेश सोडले. पटापटा विस्तावरील खरपूस मॅगी उचलण्यासाठी तिघे धडपडलो. एकमेकांना शिव्याची लाखोली वाहून उरलेली मॅगी खाण्यास आम्ही सुरूवात झाली. वरवरची मॅगी उचलली असली तरी थोडा खरपूस वास सर्वच मॅगीला लागला होता. पण चवीत काही फरक जाणवला नाही. परंतु अपेक्षेपेक्षा अगदीच थोडी मॅगी खायला मिळाली.
xxxx तू चिमटा का नाही आणला?
निघताना मी तो बाहेर बॅगेशेजारील ठेवला होता.
बॅग तर तूच तर भरली की?
अशा एकमेकांवर ढकलाढकल करून कशीबशी मॅगी संपली. त्या रात्री अर्धेपोटीच झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सकाळी चहा पिण्यासाठी आणलेली तेवढी पार्ले जीची बिस्कटे संपवली पण तेवढ्याने तिघांचे काय होणार. दुसºया दिवशी सकाळी नाष्ट्यासाठी ठेवलेले पोहे खायचे का? असा विचार मी बोलून दाखविला. तर उद्या सकाळी काय करायचे असा प्रश्न पडला. दुसºया दिवशी सकाळी उठून रात्रीच्या केलेल्या चुलीवरच पोहे केले. आता मात्र, भावाने विस्तव बाजूला करून नंतर मग ओल्या रूमालाने भांडे उतरवले. सगळ्यांनी इथेच्छ पोहे हादडले.

ता. क. : यानंतरच्या ट्रेकमध्ये आम्ही चुलीऐवजी स्टोव्ह घेऊन जाऊ लागलो. छोट्या बाटलीत अर्धा ते १ लि. रॉकेल घेऊन मुक्कामी पोहचल्यावर स्टोव्ह चालू करायचो. चिमटा मात्र आठवणीने घेऊन जाऊ लागलो.
आजही घरी मॅगी केली की पहिली आठवण राजगडवरील मॅगची येतेच.

पावसाळ्यात मी आणि मित्र असे आम्ही दोघंच सुधागडला गेलो होतो. पुण्याहून संध्याकाळी बाईकवरून निघालो आणि पायथ्याला पाच्छापूरला शाळेत मुक्काम केला. सकाळी प्रचंड गोंगाट ऐकू आल्यानेच जाग आली. बघतो तर तीन बस भरून शंभर - दीडशे लोकांचा ग्रुप घेऊन मुंबईमधली एक संस्था आली होती. त्यातले अनेकजण आयुष्यात पहिल्यांदाच डोंगर बघितल्यासारखे करत होते आणि ग्रुपमधली सत्तर टक्के टाळकी नॉन महाराष्ट्रीयन होती . आम्ही आवरलं आणि त्यातल्याच एकाला ठाकूरवाडीचा रस्ता विचारला. तेव्हा त्याचं आणि माझं संभाषण झालं ते पुढीलप्रमाणे

मी : सुधागडसाठी सरळच जाऊ ना ??

तो : मेरेको पता नही (तो त्यांच्यातला सदस्य होता पण लाडक्या लोकांपैकी एक असल्याने ग्रुपचा टी - शर्ट त्याला बहाल करण्यात आल्याने मला तो लीडरच वाटला. तो लीडर नाहीये याचा उलगडा मला किल्ल्यावर पोचल्यावर झाला. ). कहा जा रहे हो ?? (मी मनातल्या मनात डोकं आपटून घेतलं. आता सुधागड म्हणल्यावर माणूस सुधागड शिवाय दुसरीकडं कुठं जाणार …. पण उत्तर देणं भाग होतं. )

मी : सुधागड
तो : अबे सुधागड नाही साधुगड बोलते है उसको. नये आये हो क्या ??
मी : साधुगड ?? नाम कब चेंज हो गया ?? मुझे तो मालूम ही नही.
तो : (च्यायला हा "साधुगड" च्या टकमक टोकावर भेटू दे नाय ना ह्याला खाली ढकलून दिला …. अशा नजरेने माझ्याकडे पाहत ) सातवाहन के जमानेसे यही नाम है डियर !!!!

मी गाडीवरून कोलमडायला आलो होतो !!!

रतनगड चा किस्सा आहे । नव्याची नवी नवलाई होती । वासरात लंगडी गाय मीच होतो । संध्याकाळ झाली रतनवाडी ला पोचता पोचता । अंदाजाने हाक मारली । महादू । जी करत महादू आला पुढे ! बिचारा चांगला खुश झाला । आपल्याला पण कोणीतरी वोळखतय म्हणून । निघालो . अर्ध्या रस्त्यात म्हनजे पहिल्या पधावत थांबलो . किर्र रात्र ……। आम्ही सगळे नवशिखे .torch वगेरे भानगड नाही । त्यात महादूची torch बंध पढली । बोंबला आता । आमचा एक नवीन मित्र प्रशांत ने त्याची जादूची पोतडी उघडली …। अगोदर मेन बत्ती काढली " आपण असा करूया ह्या मेन बत्ती मध्ये at least काही तरी दिसेल । म्हत्नला ok .. घंटा ह्या वार्या पुढे काही उपयोग नाही । "आपण असा करूया हा रबर band " म्हणून त्याने परत त्याच्या पोतडीतून काही तरी काढले प्रयत्न करून झले काही उपयोग नाही…। " आपण असा करूया असा म्हणून त्याने चक्क म्हणजे चक्क सुई दोरा काढला । मला अन sandy ला चक्कर आली । sandy बोलला " vinay अब ये next item definitely solder iron निकालेगा … आयच्या गावात जे हसत सुटलो सगळे tension गुल !! ha ha मजा आया !!

मस्त किस्से अहेत .... Happy

हा किस्सा माझा नाही पण आमच्या गॅग मधे घडला . ...

आम्ही सिहगडा वर जायचे ठरवले.... दर वेळी चढुन च जातो ह्यावेळी मात्र जरा शाईनिन्ग म्ह्णुन स्कुटर वर जायचे ठरवले....एक वेस्पा , एक टी व्ही एस ... पुर्विची ...आताची स्कुटी नाही ...घेउन निघालो...
जाताना चढण आणी आमची वजने ...असे गणित घालता घालता कधी पळत कधी ढकलत एकदाचे वर पोहोचलो......वर मस्त पैकि झुणका भाकर हादडुन परत निघालो ... एकाने शक्कल लढवीली ..".ए अरे
आपण स्कुटर बन्द करुन सरळ खाली जाउ. उतार आहे .....जरा ब्रेक ने स्कुटर कन्ट्रोल करु की झाले.....पेट्रोल ची ब ब बचत.... Proud तसेच मस्त धुम्शान खाली आलो.....रस्त्यात इतके खड्डे की हाड खीळखीळी झाली ...पण .पेट्रोल वाचवल्याचा आनन्द कोण..... नतर वेस्पा सुरु केली आणी निघाले... टी व्ही एस ला किक मारतोय मारतोय मारतोय ...काही केल्या सुरु होयिना .....मग जरा खाली वाकुन पहिले तर ....तर काय .....असे कळाले ...की मधे जो खडखडाट होता त्यात टी व्ही एस चा खुळखुळा झालाय आणी त्यात टी व्ही एस ची पेट्रोल टाकिच पडुन गेलिये.... Uhoh

विचार करा काय देव आठवले असतील ......वेस्पा वर परत मागे जाउन पेट्रोल टाकी शोधुन आणली बसवली आणी मगच परतलो.......

साधारण दोन वर्षापूर्वी भर पावसात मित्रांसोबत राजमाचीच्या ट्रेकला निघालो होतो.या आधी आमच्यापैकी हा ट्रेक कोणीच केला नव्हता.रात्री ८ वाजता ठाण्यावरून बाईक्सवरून निघालो आणि रात्री ११ वाजेच्या दरम्यान लोणावळ्यात पोहचून बस स्थानकाच्या कैन्टीन मधेच जेवण आटोपले..तिथेच एक ओळखीच्या माणसाकडे बाईक्स ठेवून रात्री १२ च्या दरम्यान पेट्रोल पंपाच्या डावी कडचा रस्ता पकडून चालू लागलो.पुढे एक्सप्रेस हायवेच्या पुलाखालून गेल्यावर तुंगार्ली धरणाच्या बाजूचा रस्ता पकडून राजमाचीला जावे लागते..पण आम्ही चुकून लगूना होटेलच्या रस्त्याला लागलो.बरं वाटेत रस्ता विचारावा असा एक ही स्थानिक माणूस मिळेना..होटेल्सच्या रखवालदारांना विचारून बघितले,पण त्याना राजमाची नावाचा गंध ही नव्हता..या दरम्यान एक्सप्रेस हायवे तब्बल तीन वेळा ओलांडून भरकट्त-भरकटत रात्री २ वाजेच्या सुमारास आम्ही पुन्हा एका लोणावळा मार्केट मध्ये दाखल झालो..तिथेच एका चहाच्या टपरीवाल्याने आम्हांला खंडाळ्याच्या बाजूने जाणारया मार्गाची माहीती दिली..आधीच जवळपास ८ ते १० किमीची वायफळ पायपीट आम्ही केली होती त्यात हा मार्ग १९ किमीचा आहे.अखेर मजल-दरमजल करीत सकाळी ८ वाजेच्या दरम्यान आम्ही राजीमाचीच्या उधेवाडी गावात दाखल झालो..सर्वजण प्रचंड थकलो होतो.

हाहाहाहाहा…. हेम काय वाट लावतोयस रे माझ्या भूकंपगडाची !!!! तू तर भूकंपगडच्या नेक्स्ट व्हर्जनला गेलास डायरेक्ट… आधी भूकंपगड आणि नंतर परसागड Biggrin Biggrin !!!

मलंगगडावर माकडांनी घेतलेली झडती !

मलंगगडावर दर्गा असल्याने, दर्ग्या पर्यन्तच्या वाटेत बरीच खाउची दुकाने आहेत. आम्ही काहीच न घेता नाही. पूढे डावीकडे वळणारी माथ्याची वाट धरली.

५ मिनीटातच चांगला चढ सुरु झाला, एका टेकडी ओलांडली आणि पुढच्या डोगराच्या सोंडेवर २०-२५ मर्कट सेना वाट अडवून उभी होती. सोंडेवर असल्याने दोन्ही बाजूला उतार होता, माकडांनी अगदी मोक्याचे जागा हेरली होती.

आमच्या पुढे एक-दोन ग्रूप गेले होते...आम्ही जरा लांबूनच निरीक्षण करत होतो. माकडांना प्रत्येक बॅगेत भुईमूगाच्या शेंगा, जांभळ, शेवग्याची फूलं (किंवा वडा-पाव्,मिसळ-पाव - शहरी मा़कडं आहेतना) आहे आणि हे सगळ आपल्या डोळ्यादेखत लपवून नेत आहेत या थाटात दिसेल त्या पिशव्या जप्त होत होत्या आणि बॅगांची कसून झडती घेउन सूरु होती.

त्यात एका मूलाच्या हातात पिशवी होती..मूलं म्हणजे माकडांसाठी ईजी टर्गेट..मा़काडाने सटकन पळवली पिशवी आणि लांब जाउन एका दगडावर बसलं. त्या मूलाने तार-सप्तकात भोकड पसरलं. दगडावर बसून माकडांने शांत चिंत्ताने पिशवीच डीसेक्शन सुरु केलं, त्यात कसलतरी खेळण होतं. माकडाने ते उलट-सुलट केलं, नंतर चाउन बघितलं आणि याचा काही उपयोग नाही अस दिसल्यावर दिलं खाली फेकून. आपलं नव-कोर खेळणं खाली दरीत पडताना बघुन पोरांन आजूनच सूर चढवला.

आमचं अर्धाएक तास निरीक्षण करुन झालं, पोटभर हसुन झालं पण आता आम्हाला माकडांच्या कस्टम ड्यूटीला सामोरं जायच होतं... आम्ही सगळे खिसे बॅगेत रीकमे केले, खास करुन पाकीट. माकडांना बॅगेची चेन उघडायची अक्कल असल्याने चेन लॉक केली. चेन लॉक करायला चावीची गोल रींग उपयोगात आली. हातात एक काठी घेतली आणि हळूहळू त्याच्याजवळ पोहचलो..एका माकडाने खिसे तपासले पण काही नसल्याने बॅगेवर डोकवायचा प्रयन्त केला पण हाती काही लागली आणि आमची स्वतात सुटका झाली.

आम्ही २००९ साली १५ ऑगस्ट साल्हेरवर साजरा केला होता. "भारताच्या तिरंग्याला महाराष्ट्राच्या सर्वोच्च किल्ल्यावरून मानवंदना द्या" अशी थीम असलेल्या त्या ट्रेकला प्रचंड प्रतिसाद मिळाला
*************************************************************************************************************

छान च !..

मी व माझे दोघे मित्र असे राजमाचीवर पावसाळा संपता संपता गेलो होतो. पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी शेवटच्या लोकलने लोणावळ्याला उतरून पुढील प्रवास (तंगडतोड) सुरू झाली. मागच्या वेळचा फाटक्या सॅकचा अनुभव लक्षात घेता आम्ही चांगलेच सुधारलो होतो. वाटेत पावसाची थोडी भुरभुर सुरू होती. पहाटेचा दीड वाजला अजून बरेच अंतर कापायचे होते. बॅटरीच्या प्रकाशात आमची वाटचाल सुरू होती. चालून चालून कंटाळा आल्याने वाटेत थांबून थोडा नाष्टा व चहा करण्याच्या इराद्याने एका ठिकाणी थांबलो. तीन दगडांची चुल तयार करण्यात पाच दहा मिनिटे गेली. जवळ आणलेले पेपर व रॉकेल होतेच. अशातच मित्राला समोरच्या झाडाच्या शेजारी बांधून ठेवलेली लाकडाची मोळी दिसली. मग काय सर्वच खूष... (फुकटची लाकडे भेटल्याने)
मित्र म्हणाला,‘‘ऐ कोणीतरी मोठ्या मेहनतीने ती आणून ठेवली असणार.’’
मी - अबे एखादे लाकूड काढले तर काय बिघडणार आहे.’’
थोडी आमच्यात वादावादी झाली. शेवटी वाजणाºया थंडीने व गरमागरम चहा लवकरच मिळणार असल्याने लाकडे ढपण्याची कल्पना सर्वमान्य झाली. बर नुसती चहापुरती लाकडे काढली असती तर पुढील प्रसंग टळला असता. शेकटो करून पहाटे ४ वाजता पुढील प्रवास करायचा का? असा विचार मांडल्यावर सर्वांनी त्यास अनुमती दिली. शेकटीसाठी समोरील भाºयामधून भराभरा लाकडे आणून जाळण्याची तयारी सुरू झाली. एव्हाना गरमागरम चहा तयार झाला होता. एका हातात चहा व दुसºया हाताने शेकटोची उब घेत गप्पा मारत बसलो होतो. किर्र अंधार, त्यात आम्ही ‘तीन तिघाड.... काम बिघाड’. आंथरूण पांघरूण काढून निवांत होत आम्ही सर्व जण शेकटो शेजारी बसून झोपणार होतोच. शेकटो करून दहा ते पंधरा मिनिटेच गेली असतील नसतील. तेवढ्यात वरील डोंगरावर कोणीतरी दोघे तिघे (बाई -पुरुष) हाका मारत ओरडत असल्याचा आवाज आला.
तिकडं खाल्या अंगाला हायती....
लाकडं घेतल्याती....
धरा त्यासनी....
एवढे आवाज दोन तीनदा ऐकल्यावर एकूण प्रकरणाची कल्पना आम्हा सर्वांनाच आली. बहुधा रात्री शिकार करण्याच्या इराद्याने आलेल्या कातकºयांची ही लाकडांची मोळी असावी व दुसºया दिवशी मोळी घेऊन जाण्यासाठी ती येथे ठेवली असावी. आपण ती फुकट वापरल्याने आता आपले काही खरे नाही याची कल्पना आली.
पटापटा शेकाटी बंद करण्यात आली. सॅक पाठीवर घेऊन व पांघरूणाची घडी न करता आमची पळता भुई थोडी झाली. एकदम शिवाजीमहाराजांचा पन्हाळागडाचा प्रसंग आठवला. पाठीमागे गनीम लागलेला. पुढे आमची पायदौड सुरू होती. त्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. पहाटेचे ३.३० वाजले असतील बहुद्धा. दहा पंधरा मिनटे बॅटरीच्या प्रकाशात राजमाचीकडे आमची पळापळ सुरू होती. काही अंतरापर्यंत मागून आवाज येतच होता. प्रतिध्वनी चारही बाजूने येत असल्याने अजूनच आमची टराकली. एकमेकांना शिव्या देत पळत होतो. साल्या, तुझ्यामुळे आपण अडकलो... मी तर फक्त चहासाठीच लाकडे घेतली.... तुला कोणी शेकाटो पेटवायला सांगितली... असे एकमेकांना शिव्य्या देत पाठीमागील आवाज कधी थांबला ते कळले नाही. काही अंतर पार करून गेल्यावर बॅटºया बंद करून परिस्थितीचा आढावा घेत आम्ही पुढे चालू लागलो. पळून पळून पायात गोळे आले होते. भर पावसातही चांगलाच घाम आला. न घेताही आमची चांगलीच उतरली होती.
या प्रसंगाला साधारणपणे १५ वर्षे झाली. आजही हा प्रसंग आठवला की हसून हसून आमची वाट लागते.

तीन चार पूर्वीचा हा किस्सा
मी अन माझा मित्र पावसाळ्यात लोहगड साठी निघालो होतो. .
सुरवातीला भाजे लेणे पहायचे अन मग तिथूनच पुढे किल्ल्याकडे जाणऱ्या वाटेने (वाट तशी माहिती न्हवतीच )लोहगड कडे वळायचे असे एकमताने आम्ही ठरविले.. . अन निघालो.

भाजे लेणेच्या पुढे अगदीच अर्धा पाऊन तास तरी आम्ही पायपीट केली असेल , मळलेल्या पायवाटेने हळुवार अगदी ,
पण पुढे त्याच पायवाटेने आपलं अस्तिवच मिटून टाकल . तेंव्हा प्रश्न पुढ्यात पडला ,
आता पुढे काय ? कसे? कसे जायचे ?
ह्या प्रश्नाशी विचार मग्न असतानाच एक ग्रुप , साधारण ८-९ जणांचा आमच्या मागून तिथे हजर झाला . मग काय त्यांच्या सोबतच निघालो .विसापूर च्या पोटाशी बिलगत ...झाडी झुडपातून ..
पावसाळा असल्याने सगळीकडे कसं हिरवेशारं होत .

झाडी झुडपे गवतं वाढली होती. चिखल दाटला होता सर्वत्र रानात . घसरडी वाट झाली होती .
विसापूर - लोहगड खिंडीच्या आसपास तरी आम्ही पोहोचलो असणार इतक अंतर तरी आम्ही ,
कसे बसे स्वतःला सावरत पार केल होत.

शिस्तीची अगदी मुंग्यावाणी आमची चाल होती. एका मागो माग ...एक अशी ,
ती तशीच सुरु असतना . सर्वात पुढे असलेल्या नेत्याने मोठ्याने आरोळी दिली.

''अरे , पुढे पायवाट नाही... खोल दरी आहे .... मागे फिरा''

अस म्हणताच सर्वांच्या माना एकाच लयात धडा सहित मागे फिरले .
आता मागे फिरायचे म्हणजे पुन्हा वेळ वाया . अशी मनाची मनाशीच कुजबुज सुरु होती.
त्यातच काही पाउल पुढे टाकली अन तोच पुन्हा एकदा आवाज कानी घुमला . ते हि खळखळाट हास्य मुद्रे सह ..
अरे पुन्हा मागे फिरा रे सगळे ..., वाट इथूनच आहे.
मागे फिरलो , तेंव्हा त्या खळखळाट हास्याचे कारण समजले. अन आम्हाला हि हसू फुटले.

''अरे , पुढे पायवाट नाही... खोल दरी आहे .... मागे फिरा'' अस म्हणणारा हि हसू लागला.

कारण ती 'दरी' म्हणजे साधारण दीड दोन फुट खोल अन किंचित तितकीच रुंद अशी झाडाझुडपानी अन गवतांनी झाकोळलेली एक छोटीशी पण त्याला वाटलेली खोल अशी दरी होती. Wink Wink

"सर,ये सब तो ठीक है…लेकिन ये नाना फर्नांडीस कौन था ??? "

अजूनही नाना माझ्या स्वप्नात येउन मला त्याच्या धर्मांतराबद्दल छळत असतो !!!!
Rofl
Rofl

९ फेब्रुवारी २०१३, स्थळ : भटक्यांची आवडतं AMK अलंग , मदन, कुलंग

आंबेवाडी मधून प्रथम अलंग आणि मदन च्या बेचक्यामध्ये येउन आधी मदन करावा दुपारी परत फिरून अलंग चा अवघड टप्पा पार करून वरच्या गुहेमध्ये रात्रीचा मुक्काम मग पुढचा मुक्काम पोस्ट 'कुलंग' इतका सरळ सोपा बेत होता.

माझ्या सोबत इतरहि काही मंडळी होती, अपेक्षेनुसार हि सुरवात करून थोडा उशीर झालाच, मदन किल्ला चढून उतरून वापस अलंग गाठताना दुपारचे ४ वाजले होते, आणि येणाऱ्या संकटची चाहूल लागली - 'अंधार पडायच्या आत गुहा गाठणे'. आवश्यक ती तयारी आणि सेट-अप झाल्यावर एक एक मावळा अलंग च्या कातळाशी भिडला. तरी पण अंधार पडला होता.last man असल्याने मी तर एका हातामध्ये विजेरी घेऊन चढलो होतो.

गुहेमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर पुढील कामे उरकून एकीकडे जेवण आणि दुसरी कडे गप्पांचा फड रंगला होता. गावकरी 'लखन' आम्हाला त्याचा ठेवणीतील किस्से सांगून आणखी रंगत आणत होता , मधूनच त्याने सांगितला कि आज 'अमुशा हाय'.

आता येणार प्रत्येक शनिवार आणि रविवार हा कॉंक्रीट च्या जंगलातून, गोंधळ ,गोंगाटा मधून बाहेर पडून सह्याद्रीचा मुक्त आस्वाद घेण्याकरता चा बनला आहे हि आमची भाबडी समजूत. त्यात अमावस्या कि पौर्णिमा हा भेदाभेद आम्ही करत नाही. येणाऱ्या प्रत्येक वीक एंड ला सह्याद्री ची नवनवीन रूपं पहावीत अस आमचा मानस …….

एकाने हळूच शंका उपस्थित केली खरच अमावस्या आहे का ? त्याला म्हणालो आकाशीचं सुंदर चांदण बघ, चंद्र रोजचाच आहे. जेवण करून इतर साफसफाई करता करता ११ वाजले होते. स्लीपिंग ब्याग टाकून झोपेच्या अधीन होण्यास उत्सुक होता. दिवसभर केलेली चढाई उतराई आणि नीरव शांतता तर त्यात अधिकच भर टाकत होती. सगळे झोपले आहेत ह्याची खात्री झाल्यावर आम्ही पण आपपल्या जागेवर येऊन झोपलो.

सुमारे अर्धा तासाची झोप झाल्यावर एक आर्त किंकाळी आमची झोप उडवून गेली, कोणीतरी बाहेर पळत गेला. काळजात धस्स झालं, गुहेमध्ये जंगली जनावर घुसलं कि जणू एखादा च्या घात झाला काही कळत नव्हतं, विजेरी च्या प्रकाशात जो तो काय झालं ह्याचा अंदाज घेत होता. जंगली श्वापद पायाला धरून ओढत आहे अश्या भयाने ती किंकाळी फुटली होती.

जरा वेळात संपूर्ण उलगडा झाला कि , गाढ झोपलेल्या एक मुलाच्या अंगावर उंदीर पडला होता, अतिशय घाबरलेल्या परिस्थिती मध्ये त्याच्या हात शेजारी झोपलेल्या मुलाच्या छातीवर पडला, आधीच अमावस्येचा किडा त्याचा डोक्यात वळवळ करत होता त्यात छातीवर हात पडला …झाला 'हडळ किवा चेटकीण' अशी समजूत झालेला तो मुलगा बोंब मारत उठला आणि गुहेबाहेर पाळला होता. आता सर्व जन शांत होऊन त्या मुलाच्या शोधत बाहेर निघाले होते. आधीच अंधार आणि बाहेरचा परिसर पाहून तो मुलगा खूपच घाबरला होता त्याला समजून परत आणला आणि झोपवला. थरथरतच तो झोपी गेलाआणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मनावरचा ताण हळूहळू निवळत होता.

आज पण तो प्रसंग आठवला कि हसू येतं , सकाळी तो मुलगा इतका ओशाळला होता कि 'डब्बा टाकायला' जातो म्हणून गेला तो एकदम उतरायची तयारी सुरु झाल्यावरच आला. शेवटी सगळ्यांनी समजावून सांगून त्याला शांत केला आणि आम्ही 'हर फिक्र को धुये मे उडाता चला गया ………. ' करत कुलंग कडे मार्गस्थ झ;झालो .

मागे एकदा आम्ही काहीजण तुंग वर गेलो होतो.

तिकडे मावळतीकडच्या बुरुजाकडे जाताना मी लोटांगण घातले होते. त्यामुळे माझी हनुवटी आणि खांदे फुटले होते. डोक्याला सुद्धा मुका मार लागल्यामुळे डोके दुखत होते. म्हणून आम्ही तुंग च्या उत्तुंग टोकावर जाऊन पोटोबा करण्याचा विचार सोडला. आणि वरच्या माचीवर जाऊन जेवायचे ठरवले. वरती गेल्यावर उजवीकडे कड्याच्या कडे कडेने एक पायवाट जाते. तिकडे पाण्याचे टाके आहे. ते पाणी घ्यायला आम्ही तिकडे गेलो. आणि टाक्याच्या समोरच दगडांवर जेवायला बसलो. सौ. नि मेथीचे पराठे करून बरोबर घेतले होते. ते खाऊन झाल्यावर सगळे थोडी विश्रांती घेत होते आणि मी समोरच्या दगडावर असलेल्या एका सरड्याचे फोटो काढत होतो.
तितक्यात आमच्या सौ. च्या मागे मला पानांची हालचाल जाणवली म्हणून मी तिकडे पाहिलं तर एक साप तिच्या अगदी मागे फुटभर अंतरावर येऊन थांबला होता.

त्या नंतरचे आमचे संभाषण जसे च्या तसे.

मी : अर्जिता उठ पटकन.
सौ : कशाला ? आत्ताच बसलेय ना मी.
मी : अर्जिता उठ....
सौ : मी नाही उठणार जा.....
मी : अर्जिता तुझ्या मागे साप आहे.

या वाक्याबरोब्बर तिने बसलेल्या दगडावरून दुसरीकडे उडी मारली. आणि वाट बघत बसलेले सर्प महाशय जणू हुश्श्श . . . . . . . रस्ता मोकळा झाला अश्या अविर्भावात समोरच्या झाडावर चढले.

श्रीमंत..... शेवटचा संवाद वाचून हहपुवा..... Lol नजरेसमोर चित्र उभे राहिले !
पण भारी अवघड प्रसंग बोवा...

Pages