हिंदु धर्म आणि शाप

Submitted by वेडा राघू on 30 July, 2013 - 11:27

हिंदु धर्म आणि शाप

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. Happy शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.

प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?

अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.

१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.

२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.

३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)

४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)

६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)

७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)

८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)

९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )

१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)

११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)

१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.

१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)

१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)

१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.

१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.

१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या )

अँड सो ऑन ............

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्वासानी कुणाकुणाला शाप दिले आहेत?
>>
राजा अंबरीष - ज्यामुळे विष्णूंना १० अवतार घ्यावे लागले.

इंद्र - इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात जाईल असा शाप दिला. परिणामतः समुद्रमंथन करावे लागले.

अजुनही बरेच जण आहे. आठवेल तसे लिहीत जाईन.

>>>>> कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात? <<<<<
शाप देणे हे देखिल एक कर्मच, व शाप न देता नुस्तेच मनाशीच खदखदत रहाणे हे देखिल कर्मच. यातिल कोणतेच कर्म न करता पूर्णतः सन्यस्त वृत्तीने जगू शकणारा मानव विरळा, अन त्याने तसे जगू पाहिलेच तर ज्याचा जमदग्नी होईल. (संदर्भः जमदग्नींची हत्या)
दूसरे असे की तुम्ही केलेल्या कूकर्माबद्दल तुम्हाला अद्दल/शिक्षा घडविण्याचे उत्तरदायित्व परमेश्वरानेच कुणा शाप देणार्‍यावर सोपविले असेल, तर त्याला तुम्ही अन मी काय करू शकणार? Wink
नाठाळाचे माथी हाणा काठी, अन ठकासी महाठक उभा करावा हे संत सान्गुन गेलेतच, तेव्हा तुम्ही शेण खाल्लत तर कुठुनतरी देव येईल अन तुम्हाला शिक्षा करील असे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या थाटात जगण्याचे अपेक्षित नाहीच. गीतेमधे भगवंताने अर्जुनाला त्याच्या अशाच स्वरुपाच्या प्रश्नाला की "स्वकिय शत्रू म्हणून उभे आहेत, मी त्यान्ना मारू कसा/त्यान्चेशी लढू कसा" उत्तर दिले, अशा ज्याप्रश्नानिमित्ताने आख्खी गीता सांगितली गेली, तिथेही याबद्दलचे विवेचन मिळेल.
(होप सो की भर रणांगणात अशी प्रश्न उत्तरे करण्यात, श्लोकात्मक गीता सान्गण्यायेवढा वेळ होता का असा बुप्रा प्रश्न तुम्हाला पडणार नाही Wink )

कर्मविपाका प्रमाणे प्रत्येकास त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचा परतावा मिळतोच मिळतो. भले मग कुणी शाप देवोत वा न देवोत, दिल्लीतल्या त्या घटनेत बाईकर्सवर पोलिस गोळ्या झाडोत वा न झाडोत.... ! सलमानखान वा संजयदत्ता ला कोर्ट शिक्षा देवोत वा न देवोत! Wink
पण मग अशी निर्नायकी, सर्व कर्मे देवाच्या भरवशावर सोडून देण्याकरतादेखिल मानव जन्म मिळालेला नाहीये याचीही जाण धर्म करुन देतोच, मानव जन्म मिळालाय, तो निश्चित अशी नि:ष्काम कर्मे करीत, मानवी जन्मामुळे विचार आचाराच्या ज्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत त्या वापरुन अंती मोक्षपदी जाणे अर्थात जन्ममृत्युच्या फेर्‍यातुन मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याकरता आहेत. यामधे जितक्या अन ज्या ज्या स्वार्थी कर्मांची भर तुम्ही घालत जाल तस तसे त्या त्या प्रत्येक कर्माचे फल या ना त्या स्वरुपात मिळत जाईलच जाईल/संचित म्हणुन साठत जाईल. अन तिथे मात्र दे वाण्या घे प्राण्या असा दिला पैका घेतली वस्तू इतका सरळधोपट हिशेब असणार नाही/असत नाही.
तो हिशेब समजायचा तर तुम्हाला चित्रगुप्ताची अपॉईण्टमेण्ट घ्यावी लागेल, अजुनतरी माझ्या माहितीप्रमाणे चित्रगुप्तच हे कार्य सांभाळतात. त्यान्चेकडून तुमच्या पापपुण्याच्या अकाऊण्टचे लेजर मागवुन घ्या Proud

limbutimbu,

नेहेमीप्रमाणेच तर्कशुद्ध आणी साधार विवेचन. आपण लिहिले कि नंतर काही (त्या मुद्द्याविषयी) लिहिण्याचे बाकी राहातच नाही.

एक सुधारणा - सामर्थ्यवान व्यक्तीने गैरसमजुतीने शाप दिला तरी तो समोरच्याला भोगावा लागतो. उदा: कल्माषपाद राक्षस(पूर्वीचा राजा - वसिष्ठांनी गैरसमजुतीने शाप दिला) ref: शिवलीलामृत (मूळ स्कंदपुराण).

परंतु भक्ताला शाप दिला, तर मात्र उपास्यदेवता विविधप्रकारे भक्ताचे रक्षण करते (अंबरिष राजा).

Heemangi, चांगले लिहिले आहे.

>> 'नअ बहूव्रीहि समास' आहे तो! त्या 'नअ' मधील 'अ' मी चुकीचा लिहिला आहे याचे मला भान आहे.

नञ. कॅपिटल वाय वापरा. (naYa)

च्यायला...मला पण माझ्या boss ला शाप द्यायचा आहे....काही मदत मिळेल का?
का मी ही पोश्टं माहिती हवी आहे या सदरात हलवू?? Happy

{लिंबूजी }आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार

माझ्या मित्रांपाइकी एकाने अतिशय लहान वयात इतरांच्या सांगण्यावरून एका गुरुची दीक्षक्षा घेतली. कालांतराने तो गुरु वामाचारी तांत्रिक (शाक्त)असल्याचे उघडकीस आले. यास्तव त्याने दीक्षक्षा परत करण्याविषयी गुरूला विनंती केली, त्यावरा खूप वादविवाद होवून त्या गुरु / गुरूचे शिशय आणि माझ्या मित्रामध्ये शत्रुतत्व आणि वैमनस्य निर्माण झाले

त्यानंतर त्या गुरुणे दिलेल्या शापाच्या मुले माझ्या मित्राच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या . आशा परिस्थित या ढोंगी गुरु च्या शापा पासून मुक्तता काशी मिळेले याबद्दल मार्गदर्शन करू शकाल का?

का मी ही पोश्टं माहिती हवी आहे या सदरात हलवू?<<< व्यवसाय मार्गदर्शनमध्ये हालवा

नञ. कॅपिटल वाय वापरा. (naYa)<<< धन्यवाद बाई

माझ्या मित्रांपाइकी एकाने अतिशय लहान वयात इतरांच्या सांगण्यावरून<<<

त्याला इतरांना तो शाप ट्रान्स्फर करायला सांगता येईल का?

बेफि...सध्ध्यातरी हे ज्ञान मी केवळ माझ्या साठी वापरणार आहे.....जेंव्हा औद्योगीक पातळीवर करयचं असेल तेंव्हा नक्की तिकडे पोश्टीन... Happy

चर्चा फार छान रंगत आहे , लिंबूजी तुमचे स्पष्टीकरण बरेच समर्पक आहे .

मी उल्लेख केले प्रकार काही वेळा घडयतात , नेहमीच शाप म्हणजे जारणमारन असे मी म्हटले नाही
असो

वाटोळे होईल, तळपट होईल, माती कालवीन असे काही शाप माहीत आहेत.

डोळ्यासमोर येणारी दृष्ये:

वाटोळे होईल - माणूस अंग मुडपून गोल गोल फिरत आहे

तळपट होईल - माणूस फ्राईड फिशसारखा दिसू लागला आहे

माती कालवीन - माणूस पोळीबरोबर माती खात आहे

राघू वेडा का व कधी झाला?

कोणी शाप दिला म्हणून राघू वेडा झाला?

तांत्रिकच्या शापाने राघुचा वेडा मानव झाला?

की राघुच्या शपणे तांत्रिक वेडा झाला?

हाहाहा

वाह वाह ! मस्तच धागा.
यावरून मला माझाच एक शेर आठवला.

कधीही सुचे हा मला शाप आहे
जगी शेर माझे म्हणे ताप आहे

वाटोळे होईल, तळपट होईल, माती कालवीन
>> Rofl

"वाटोळे होईल" ची माझी कल्पना एकदम पुरी सारखा फुगुन ट्म्म होईल. Happy

बाकी राखरांगोळी होईल, मातेरे होईल यांचे काय? Biggrin

स्वामी विश्वरूपानंद | 31 July, 2013 - 21:23.........
मी उल्लेख केले प्रकार काही वेळा घडयतात , नेहमीच शाप म्हणजे जारणमारन असे मी म्हटले नाही
स्वामी विश्वरूपानंद | 31 July, 2013 - 08:15 शाप म्हणजे काय ते प्रथम पाहू............... त्याच्या बरोबर उलट शाप कार्य करतो .म्हणजे काही वाट चुकलेले साधू आणि भोंदू लबाड वामाचारी तांत्रिक हे स्वता:कडील दुष्टात्मे आणि सिदधींच्या सहाय्याने भक्ष्याच्या /विरोधकाच्या मेंदूचा ताबा घेवून मारण /उच्चाटन / वशीकरण यासारखे तंत्रप्रयोग करतात. त्यालाच शाप असे गोंडस नाव दिले की झाले .>>>>>>>

स्वामीजी तुमचे अगाध ज्ञान मी नेहमी वाचत असतो.

Omkar Deshmukh | 31 July, 2013 - 08:41
.....महाराज आपले लेखन अभ्यासपूर्ण व मार्मिक असते . परंतु सध्याच्या काळात खरेच असे प्रकार अस्तीत्वात आहेत का? असल्यास कुठे ? काही डिटेल्स देवू शकाल का?
Omkar Deshmukh | 31 July, 2013 - 21:12 माझ्या मित्रांपाइकी एकाने अतिशय लहान वयात इतरांच्या सांगण्यावरून एका गुरुची दीक्षक्षा घेतली............... माझ्या मित्रामध्ये शत्रुतत्व आणि वैमनस्य निर्माण झाले...>>>>>>>>>>>

Omkarजी तुम्हालाच जर डिटेल्स द्यायचे होते तर स्वामीजींना या मोहमायेच्या संसारात कशाला नाहक ओढलेत.

आपल्या वरील पोस्टमध्ये मला एक-दोन शंका आहेत कृपया निरसन व्हावे.

१.आपण म्हणता की ---‘‘माझ्या मित्रांपाइकी एकाने अतिशय लहान वयात इतरांच्या सांगण्यावरून एका गुरुची दीक्षा घेतली.’’
अगदी लहान वय म्हणजे किती?
२. त्या गुरुणे दिलेल्या शापाच्या मुले माझ्या मित्राच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.>>>>>>>>>>>>
गुरूने जर त्या निरागस बालकाला ‘तुझे वाईट्ट होवो’ म्हणून खरच शाप दिलेला असेल तर शापसंहितेनुसार त्या गुरुचेच वाटोळे होणार याबद्दल तुम्ही निश्र्चींत असावे. त्यामुळे तुम्ही त्यासंदर्भात तुमच्या मित्राची चिंता करण्याचे तसेच त्या तथाकथित गुरूचे अनिष्टचिंतन करण्याचे अनावश्यक कर्म करू नये अशी माझी एक विनंती आहे. कारण कर्मसिद्धांतानुसार त्या (चिंता व अनिष्टचिंतन) कर्माचा लय होण्यासाठी नियतीला परत काहीतरी योजना करावी लागते.
तुमच्या मित्राला माझ्या शुभेच्छा सांगा.

å1. अविनाश१ |स्वामीजींचे ज्ञान अगाध आहे असा साक्षात्कार तुम्हाला कधी झाला?

2. गुरूने जर त्या निरागस बालकाला ‘तुझे वाईट्ट होवो’ म्हणून खरच शाप दिलेला असेल तर शापसंहितेनुसार त्या गुरुचेच वाटोळे होणार याबद्दल तुम्ही निश्र्चींत असावे. त्यामुळे तुम्ही त्यासंदर्भात तुमच्या मित्राची चिंता करण्याचे तसेच त्या तथाकथित गुरूचे अनिष्टचिंतन करण्याचे अनावश्यक कर्म करू नये अशी माझी एक विनंती आहे. कारण कर्मसिद्धांतानुसार त्या (चिंता व अनिष्टचिंतन) कर्माचा लय होण्यासाठी नियतीला परत काहीतरी योजना करावी लागते.
तुम्ही असे सल्ला देताय की तुम्ही स्वता: कोणी मोठे धर्मपंडित / धर्माचारी आहात म्हणून ?
तुम्ही स्वता: काय करता ? व्र्देवणी प्रकाशन वाले अविनाश देशपांडे तुम्हीच आहात काय?

तसे असल्यास खलील प्रश्नाची उत्तर द्या

1, विविक्षित व्यक्तिला एखादी दीक्षा घेतल्यावर त्रास झाला / टी दीक्षा वामचरि तांत्रिक संप्रदायाची असल्याचे सिद्ध झाले तर झालेल्या नुकसनाची भरपाई कोण देणार /.?

2. गुरुणे स्वता:च स्वार्थ आणि अट्टहास यातून त्या व्यक्तिला जाणूनबुजून त्रास दिलेला आहे, तर त व्यक्तीचे 5 कोटी रुपयाचे नुकसान भरून कोण देणार ?

लिंबूटींबू +१
काल "द सिक्रेट" वाचत होतो. त्यात आपल्यावर येणारी संकटे आणि आपलं भविष्य आपण स्वतःच आपल्या विचारांनी ओढवुन घेतो असं म्हटलय. पण दुसर्‍यांच्या विचारांचा आपल्यावर परीणाम तेव्हाच होऊ शकतो, जर आपण तेच विचार मनात आणले तर.... आपले विचार सात्विक असतील तर शापाचा परीणाम होईल असं वाटत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असं काहीसं.

बाय द वे लिंबूटींबू, चित्रगुप्त पीडीएफ पाठवू शकतात का हो Happy

>>> एक सुधारणा - सामर्थ्यवान व्यक्तीने गैरसमजुतीने शाप दिला तरी तो समोरच्याला भोगावा लागतो. <<<< बरोबर आहे हे.
मात्र जर हे बरोबर असेल, तर माझ्या आधीच्या कुठच्या तरी पोस्ट मधे मी शाप उलटण्याचे उदाहरण दिले आहे, त्याची तर्कसंगती कशी लावावी? तर तुम्ही वापरलेला "सामर्थ्यवान" हा शब्द महत्वाचा ठरतो. सामर्थ्यवान व्यक्ति एकतर उठसूठ शिव्याशाप सदृष तळतळाटी भाषा वापरत नाही, सामान्य माणसाने तसे केले तर मात्र ते उलटू शकते.
म्हणूनच तर जुनी माणसे सान्गत असावित का की नेहेमी शुभ बोलावे, आशिर्वचनपर बोलावे ?

विजय देशमुख | 1 August, 2013 - 06:44
>>>>त्यात आपल्यावर येणारी संकटे आणि आपलं भविष्य आपण स्वतःच आपल्या विचारांनी ओढवुन घेतो असं म्हटलय. पण दुसर्‍यांच्या विचारांचा आपल्यावर परीणाम तेव्हाच होऊ शकतो, जर आपण तेच विचार मनात आणले तर.... आपले विचार सात्विक असतील तर शापाचा परीणाम होईल असं वाटत नाही. >>>>>>
देशमुखसाहेब !!! १००% अनुमोदन
रचक्याने स्वामी विश्वरूपानंदजी, रमेश भिडेसाहेब, Omkarराव Deshmukh, वेडा राघूसाो आणि .....आपले यासंदर्भात काय मत आहे हे जाणून घ्यायला नक्‍कीच आवडेल.

शाप वै माहिती नाही.पण मिपावर एक लेखमाला वाचत होतो.
उत्तम लेखन करणारा एकजण एका नाथपंथीय गुरुला भेटला.
त्याने त्याची दिक्षा घेतली.
बरेच अनुभव त्याने लिहिले आहेत.
आणि नंतर त्याने आत्महत्या केली. Sad
अवघ्या वयाच्या २६ वीत..

ते तान्त्रिक वै भितीच वाटते राव..

तो यकु. यश्वंत एकनाथ कुलक्र्णी. त्याने आत्महत्या केली.

लिंबू, तुमचे विवेचन पटते. पण तरीही, कुणीतरी शाप द्यावा म्ग त्याला शिक्षा होणार, अशी सिस्टिम असेल तर ती फॉल्टी वाटते. हे म्हणजे मग शाप देणारा माणूस म्हणजे फौजदार आणि देव म्हणजे जज अशी कंडीशन होईल. जज फक्त पोलिसानी अमूक एक चार्ज / कलम लावले, तरच त्यानुसार शिक्षा देतो. पोलिसच कोड लावायला विसरला तर जज अपराध्याला निर्दोष सोडतो.

अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.) ...... आजच्या काळात असे झाले तर काय होईल? बारगर्लचा धंदा बंद करणार्‍या पोलिसाला / जजला ती शाप देऊ शकेल का? की तू नपुंसक होशील .... ( अर्थात, पोलिस , न्याय हे लोकशाहीत तसेही नपुंसकच असतात, पुन्हा शापाची गरज काय, हा एक वेगळा मुद्दा होईल. )

नमस्कार ,

शाप हे आधीच्या काळात शाप लागणार्‍याच्या उद्धारासाठी दिले जात असत. आणी काही विशीष्ट काळासाठीच असत.

स्वतःच्या ईच्छेप्रमाणे दुसर्‍याने न वागल्यामुळे ज्या रागाने, क्रोधाने वा त्वेषाने शाप दिले गेले ते सर्व शाप देणार्‍याचे कर्म म्हणुन त्यास लागु झाले, अर्थात त्यांचे शापही भोवावे तर लागलेच, परंतु ते भोगणे हे भोगणार्‍याचे कर्म फळ आहे.
कृतयुग ( सत्ययुग ), त्रेतायुग, द्वापर युग, ह्या तिन्ही युगांत वर आणी शाप देण्याचे सामर्थ्य प्राप्त करुन घेत असत, तसे सामर्थ्य काही जन्मजात मिळाले नाही कुणालाच.
परंतु काही एतिहास असेही आहेत कि भक्तांच्या आराधना वा उपासना पराकोटीला पोहोचुन जेव्हा देवता प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगत तेव्हा स्वार्थामुळे दुष्परिणाम कारक वर मागुन घेतले काही जणांनी, उदा. भस्मासुर. . . . पण भोळ्या महादेवा ला प्रसन्न करुन त्याचे कडुन त्याचेच अनिष्ट करण्याच्या वाईट हेतुच्या कर्मामुळे त्यास स्वतःच भस्मसात व्हावे लागले, हे त्याच्या वाईट हेतुने केलेल्या कर्माचे फळ.
रामाने लपुन बाण मारला आणी त्यामुळे वालीचे प्राण गेले, परंतु वालीने अथवा ताराने कोणताही शाप रामाला दिला नव्हता, रामाने स्वतःच विदित केले होते कि माझ्या ह्या कर्माचे फळ मला मिळेल पण ते फळ तुझ्या हातुनच मिळेल, परंतु तुझ्या ह्या जन्माच्या कर्म फळानुसार तुला पुढे व्याधाचा जन्म मिळेल आणी तू ही लपुनच माझ्यावर बाण सोडशील.
भगवान श्रीकृष्णाला खूप आवडते म्हणुन देव की मातेने त्याच्या साठी एकदा पायस ( खीर ) बनविले. ते त्याला ईतके आवडले कि त्याने ते सर्व आपल्या अंगावर ओतुन घेतले, मातेने प्रसन्न होऊन त्यास वरदान दिले कि जिथे जिथे खीरीने तुझे शरीर भिजले आहे, ह्या चराचरातले कुठलेही अस्त्र, शस्त्र तिथे तुला अपाय करु शकणार नाही, तळपायाला खीर लागली नव्हती, व्याधाचा बाण तळपायात लागला होता,
व्याधाला त्यानंतर मोक्ष मिळाला होता, कारण तो भगवंताच्या निजधाम गमनाचे निमित्त बनला होता.
आणी भगवान वैकुंठ धामास निघुन गेले.
कर्म फळ.

वेड्याच्या इस्पितळात आल्यासारखे वाटतेय. नाहीतरी धागाकर्त्याने स्वतःस 'वेडा' म्हणवून घेतलेच आहे Proud

तळपायाला खीर लागली नव्हती, व्याधाचा बाण तळपायात लागला होता,

दुर्योधन, अ‍ॅकिलस ( ग्रीक पुराण) यांचीही अशेच कथा आहे.

छान

Pages