वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

Submitted by मी-भास्कर on 29 July, 2013 - 07:14

वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

निदान तीन एक महिन्यांपासून वाहिन्यांवर दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांची धाडसी कृत्ये दाखविली जात होती. दिल्ली पोलिस हे कसे काय खपवून घेतात असे प्रश्नही उद्भवत होते. अशा तरुणांची खरी जागा एक कमांडो शिबिरात वा बंदीगृहात असायला हवी असेही पहाणार्‍यांच्या मनात येणे स्वाभाविक!
अशा वेळी दोन दिवसांपूर्वी अचानक
" दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारत एक युवक ठार आणी दुसरा जखमी."

हे वृत्त !
(१) यापुढे दहशतवाद्यांबरोबर चकमकीत नेमबाजी करायला वाव नाही [ दहशतवादी मेला बिला तर तो फेक ठरणार याची खात्रीच! कशाला पडा त्या झंझटात? ] म्हणून या पोरांवर सराव करण्याची हौस भागवताय कि काय?
(२) हा धुडगूस याआधीच पूर्ण थांबवायचे अनेक मार्ग असतांना एकदम चकमक?
हे सर्व इतके दिवस चालले आहे. वाहिन्यांनी त्याचे व्हिडिओ शूतिंग केले आहे तसे तुम्ही करायचे. कि ज्यात त्यांचे चेहरे, बाईक नंबर्स, आणि कसरती असा सगळा पुरावा गोळा होईल. दुसर्‍या दिवसापासून बाईक्स आणि त्यावरील हिरोंना अंदर करायची मोहीम उघडायचि.
(३) एरवी नुसते अडविले तरी घाबरणार्‍यांसमोर शेर होता तसे यांच्यापुढे व्हायचे इतकेच! रस्त्यावर दिसणार्‍या या गाड्याच जप्त केल्या की सर्वजण कसे चालत तुमच्याकडॅ आले असते. तुम्ही आम्हाला नाही का साध्या साध्या कारणावरून अडविता? इथे तर काय सर्वप्रकारे चांदीच झाली असती सरकारची वगैरे. नेहमीचे काम सांभाळता सांभाळता जमले असते हे सर्व.
कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे श्रेय आणि अर्थकारण असे दोन्हीचा सुंदर मिलाफच!
आता आले ना चौकशीचे झंझट?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल संध्याकाळी डीडी न्यूजवर या विषयावरील चर्चेत माजी कमिशनर वेद मारवा यांनी मी मांडलेल्या विचाराशी बरेच मिळते जुळते विचार मांडले

कालच वाचलेली आणखी एक बातमी अस्वस्थ करुन गेली.

फरीदकोटच्या माजी महाराजाची २०,००० कोटींची संपत्ती त्याच्या दोन मुलींना मिळाली. २०,००० कोटी १२२ कोटी भारतीय जनतेमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती कोटी मिळतील??? जिथे कित्येक लोकांना धड जेवायला मिळत नाही अशा देशात एकाच कुटुंबाच्या मालकीची एवढी प्रचंड संपत्ती, ही बाबच मला अस्वस्थ करुन गेली. Sad

>>>> युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या <<<< काबूत आणावे लागणे म्हणजे नुस्ते "बाळा रेऽ घरी जाऊन झोप बर आता खूप रात्र झाली" असे सान्गणे इथे अपेक्षित नाहीये, अडवायला गेलेल्या पोलिसान्चे वा अन्य नागरिकांचे अंगावर गाडी घालून वा अन्य कितीतरी प्रकारे जिवित व वित्तास "धोका" निर्माण करणे या बाबी काबुत आणण्यात अपेक्षित आहेत.
तेवढेच जबरदस्त कारण असल्याशिवाय पोलिस उगाचच सर्विस पिस्तुला बाहेर काढून झाडत नाहीत हे नक्की.
तुमचे मताचा आदर करूनही, इतकेच म्हणावेसे वाटते की, दिल्लीबिल्ली मरुद्यात, इथे पिंचिमधे प्राधिकरणार दिवसाढवळ्ञा लहानमोठ्या गल्ल्यातुन शाळाकॉलेजेस भरतासुटतानाच्या गर्दीतून ज्या वेगात व पद्धतीने व कसरती करीत लोकान्ना घाबरवीत व पोरीन्च्या छेडछाडी करीत बाईक्स चालवितात ते बघुन या टोळक्यान्ना दान्डक्याने कुदलावे असेच वाटते. अनुभव घ्यायचा असेल तर माझ्या घरासमोरील गल्ली आहे.
पण शब्दाने/वर्णनाने समजुन न घेता तुम्हास स्वतःसच धडक बसवुन घेणे अपेक्षित असेल तर काळजी घ्या बोवा. या धडका जबरी असतात, अगदी जीव गेला नाही तरी हातपाय मोडून चारपाच महिने अंथरुणाला खिळणे नक्की! वर लाखभर रुपयान्ना चूना लागेल तो वेगळाच.

तेव्हा, दिल्ली पोलिसान्ना गोळीबाराची ती कृती का करावी लागली हे ते सांगतीलच / त्याचे समर्थन ते स्वतःच करतीलच, पण त्यान्चे कृतीतून एक अतिशय योग्य संदेशही गेला आहे/तो सर्वदूर पोहोचला पाहिजे की विनाकारण नै त्या वस्तीतून, गर्दीतुन "सोनसाखळी चोरून पळून जात असल्याप्रमाणे" गाड्या चालविल्यास "अतिरेकी आहात" असे समजुन गोळीबारास सामोरे जावे लागेल. ही अन अशी दहशत बसल्याखेरीज हे लातोंके भूत बातोंसे मानणार नाहीत.

लिंबूटींबु +१....

लातो के भूत बातो से नहि मानते.... मी होतो तिकडे २ वर्ष... चांगलाच अनुभव आहे... पोलीसांनाही न जुमानणारे आहेत तिथे बरेचसे ....

limbutimbu | 30 July, 2013 - 11:04नवीन
विनाकारण नै त्या वस्तीतून, गर्दीतुन "सोनसाखळी चोरून पळून जात असल्याप्रमाणे" गाड्या चालविल्यास "अतिरेकी आहात" असे समजुन गोळीबारास सामोरे जावे लागेल. ही अन अशी दहशत बसल्याखेरीज हे लातोंके भूत बातोंसे मानणार नाहीत. तेवढेच जबरदस्त कारण असल्याशिवाय पोलिस उगाचच सर्विस पिस्तुला बाहेर काढून झाडत नाहीत हे नक्की.
<<
या युवकांच्या लीलांना कायमचा आळा घालायलाच हवा याविषयी दुमत नाहीच. पण यमसदनाला पाठवून कायमचा आळा घालणे असा त्याचा अर्थ नाही.
या युवकांना दीर्घकाळापर्यंत इतके मोकाट कोणी होऊ दिले? मनात आणले तर अशांना वठणीवर आणण्याचे इतके अनंत मार्ग त्यांना उपलब्ध असतांना एकदम गोळीबाराने दहशत बसवण्याचा प्रयत्न करणे हे समर्थनीय कसे काय होऊ शकते?
इतकी टोकाची उपाययोजना अचानक करून पोलिसांनी विनाकारण स्वतःलाच अडचणीत आणले आहे.

हि कारटी सुसाट सुटलेल्या गोळीप्रमाणेच असतात, यांना गोळ्या घातल्याच पाहीजे .नायतर हे जाऊन धडकतात इतरांना.

>>> या युवकांना दीर्घकाळापर्यंत इतके मोकाट कोणी होऊ दिले? <<<< त्यान्च्या आयशीबापसान्नी, त्यान्च्या सगेसोयर्‍यान्नी, त्यान्च्या शेजारपाजार्यान्नी!

भास्करराव, तुम्ही बाईक जास्तीत जास्त किती वेगात चालवली आहे? पन्नास? साठ? सत्तर? की ऐन्शी-नव्वद?
ऐन्शीनव्वद व त्या पुढे स्पीडने जाणार्‍या बाईकर्सना पाठलाग करुन अडविण्याची कोणती सुविधा पोलिसांकडे आहे?
रात्रीच्या अंधारात त्यान्ची फोटोग्राफीकरुन मग त्याचे विश्लेषण करुन मग लाखोची लोकसंख्या असलेल्या दिल्ली व परिसरातून त्यांना अटक करण्याकरता लागणारी किती साधनसामुग्री/वेळ/मनुष्यबळ पोलिसांकडे आहे?
बाईकर्सचा पाठलाग त्यान्चेपेक्षा जास्त वेगात करण्याकरता आवश्यक मनुष्यबळ व जीवाची रिस्क घेऊ इच्छीणारी मनुष्यभरती कुठून होईल?
व हे करण्या ऐवजी, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे गेले दीडदोन महिने जर मिडीया हा प्रश्न चघळते/उगाळते आहे तर पोरान्च्या आयशीबापुससगेसोयर्‍यान्पर्यन्त पोचलाच नाही असे मानावे का? त्यान्ची काहीच जबाबदारी नाही? मी तर म्हणेन की असे टोळके सापडले की त्यान्ना गाड्या पुरविणार्‍यान्ना देखिल फटके दिले पाहिजेत.

अन तुम्ही गृहित धरताय की पोलिसान्नी त्यान्चा "वेग आवरावा" म्हणून गोळ्या घातल्यात. असे होणे शक्य नाही. त्या पोरान्चा काहीनाकाही "नियमित" अगोचरपणा असाही असू शकेल की तिथल्या तिथे गोळ्या घालून ठार मारणे भाग पडले असावे ही शक्यताच तुम्ही मनात आणत नाहीत हे कसे काय?

माझ्यासारख्या सामान्य "पादचारी जातीतील Proud " माणसास मात्र अशा प्रकारे लोकान्च्या जीवास धोका होऊ शकणारे बाईकिन्ग करणार्‍यास गोळ्या घातल्या तेच बरे केले असेच वाटू शकेल, कारण ते मेले नाहीत, तर रस्त्यावरील कोणीही मरु शकते, व सलमान खान ते कालपरवा पर्यंत अशी उदाहरणे शेकड्यान्नी आहेत, तर सलमानला वीसेक वर्शानन्तर अजुनही फक्त खटल्यात गुन्हा निश्चित झालाय. बाकी केसेस मधे देखिल असेच होत असल्याने रस्त्यावरुन कशाही बेबन्द पद्धतीने गाड्याचालवुन इतरान्चे जीवास धोका उत्पन्न करणार्‍यास कडक शिक्षाच हवी, होय, अगदी गोळ्या घातल्या तरी चालतील.
अन तसे नसेल, तर तुम्हीच जरा तपशीलात उपाय सूचवा की अशा नाठाळान्ना नेमक्या कोणत्या उपायाने काबूत आणता येईल. अशांना वठणीवर आणण्याचे इतके अनंत मार्ग त्यांना उपलब्ध असतांना अशी नुस्ती मोघम भाषा नको. सु:स्पष्ट रणनिती/अ‍ॅक्शन प्लॅन / मार्ग सान्गा.
माफ करा, पण विषय जळफळता असल्याने अशी पोस्ट लिहीली असे, वैयक्तिक काहीही नाही.

अँटीमॅटर | 30 July, 2013 - 11:35नवीन
हि कारटी सुसाट सुटलेल्या गोळीप्रमाणेच असतात, यांना गोळ्या घातल्याच पाहीजे .नायतर हे जाऊन धडकतात इतरांना.
<<
ही मुले इतरांचे जीवीतही धोक्यात घालतात त्यामुळे तुमचा राग मी समजू शकतो.
त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी.
अहो पण जेथे दहशतवाद्यांना दिलेले प्रत्युत्तर देखील पोलिसांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करते, तेथे या मुलांवर गोळीबार करण्याने त्यांच्यावर दहशत बसवणे राहिले दूर पण चौकशीला सामोरे जाण्याचीच वेळ आली ना पोलिसांवरच? आता तो दोषी ठरला तर यापुढे कोण जाणार आहे या अविचारी पोरांच्या वाट्याला?

या धाग्या वर किंवा अशाच सेम टायटलच्या धाग्यावर काल एक प्रतिसाद लिहिलेला होता.
तो धागा उडवलया वाटते अ‍ॅडमिन यांनी.

बातमीनुसार पोलिसांनी गाडीचे टायर पंक्चर करण्यासाठी गोळी मारली. डायरेक्ट त्या मुलांनाच मारली असे बातमीत तरी नव्हते.

या अशा गाड्या उडवण्याला मात्र खरच लगाम घातला पाहिजे ( गोळ्या घालुन नसला तरी इतर मार्गाने ) आमच्याच सोसायटीत सध्या एक मोठा प्रॉब्लेम आहे. दहा बारा वर्षाची पोरं टू व्हिलर घेऊन फिरवत बसतात. त्याच जागी अगदी लहान मुलं खेळत धावत असतात. सोसायटीचे प्रिमायसेस असल्याने लहान मुलांचे पालक मुलांना मोकळे खेळायला सोडतात पण या नव्या बाल-टू-व्हिलर-चालक त्रासामुळे भिती वाटते. सोसायटी प्रिमायसेस मधे फक्त १०किमी/तास स्पीड्ने गाडी चालवायला परवानगी आहे. पण मुलं ऐकत नाहीत. शिवाय इतक्या लहान मुलांना त्या गाडीचा बॅलन्स येत नसतो, पाय नीट पुरत नाहीत इ. मात्र पालकांना तक्रार केली तरी पालक काहीच करत नाहीत. मुळात तेच गाडीची चावी मुलांच्या हातात देतात. Sad अजुन थोडे मोठे होऊन हिच मुलं रस्त्यावर गाड्या उडवायला लागतील यात शंका नाही.

दिल्ली पोलिसांचं अभिनंदन. असल्या रोड-रोमिओंना जन्माची अद्दल घडवली पाहीजे. पोरं पैदा करायची आणि मोठ्ठी झाली की गावावर ओवाळून सोडायची. मग ती एम एम एस बनवत, बघत, छेड काढत, प्रेमभंग करून घेत, एसिड टाकत, छोट्या-मोठ्या चोर्‍या करत हिंडतात.

शंभस सीसीपेक्षा जास्त ताकदीच्या बाइक्स बनवण्यावरच मर्यादा आणली पाहीजे आणि ज्यांना अश्या पावर बाइक्स घ्यायच्यात त्यांना वेगळे लायसन्स इश्यु करायला हवे.

१. ही मुले (ज्यातला एक वाचला तो) दारू पिऊन होती.
२. त्यांनी दगड विटांनी पोलिसांवर हल्ला केला.
३. मदतीसाठी अधिक पोलिसफोर्स मागवला होता, पण त्याला वेळ लगाणारच होता.
४. पोलिसांनी २ गोळ्या हवेत चालवल्या, तरी हे बाईकर्स थांबले नाही. नाईलाजाने तिसरी गोळी बाईकच्या टायरवर चालवली. (इथे नेमबाजीचा प्रश्न नाही पण ती ४०-५० बाईकपैकी एकाला जरी लागली असती तरी २-४ लोकं सापडलेच असते.)
५. गोळीबार केला नसता, तर पोलिस मेले असते, हे लक्षात का घेत नाही? (३ पोलिस जखमी आहेत)
६. आता ही बाई म्हणते की तिचा मुलगा घरिच होता, पण रात्री कधी बाहेर गेला महिती नाही, तर दुसरा (जखमी) रात्री कोण्या कामासाठी जातो असं सांगुन गेला होता.

चार बाईकर्सशी एक पोलिस नुस्त्या लाठिने लढू शकत नाही तर १००-१५० (पोलिसरिपोर्ट) बाईकर्सशी १०-१२ (?) पोलिस कसे लढू शकतील?

limbutimbu | 30 July, 2013 - 11:48नवीन
तुमच्याच म्हणण्याप्रमाणे गेले दीडदोन महिने जर मिडीया हा प्रश्न चघळते/उगाळते आहे तर पोरान्च्या आयशीबापुससगेसोयर्‍यान्पर्यन्त पोचलाच नाही असे मानावे का? त्यान्ची काहीच जबाबदारी नाही? मी तर म्हणेन की असे टोळके सापडले की त्यान्ना गाड्या पुरविणार्‍यान्ना देखिल फटके दिले पाहिजेत.<<
आईबाप सगेसोयरे माहीत असूनदेखील देखील कानाडॉळा करीत असतील तर २००% दोषी आहेतच.
या पोरांच्या गाड्या/लायसेंस जप्त करून सुरुवात करणे पोलिसांना कठीन आहे काय? तसेच अनेक कलमे लाऊन त्यांना आणि त्यांच्या पालकांना कोर्ट्कचेरीच्या चक्रात अडकविणे पोलिसांना सहज शक्य असते.

>>अन तुम्ही गृहित धरताय की पोलिसान्नी त्यान्चा "वेग आवरावा" म्हणून गोळ्या घातल्यात.
<< गाडीचे टायर पंक्चर करण्यासाठी गोळी झाडल्याचे वाहिनीवर सांगितले जात होते. <<
पोलिसांना स्थीर टार्गेटला तरी अचुक टिपता येण्याइतका सराव असेल असे वाटत नाही. या ठिकाणी तर भरधाव वाहनाच्या टायरला नेमकी गोळी लागण्याची शक्यता कितपत होती?

>> त्या पोरान्चा काहीनाकाही "नियमित" अगोचरपणा असाही असू शकेल की तिथल्या तिथे गोळ्या घालून ठार मारणे भाग पडले असावे <<
इतका सिरियस अगोचरपणा पोलिसांनी नियमितपणे सहन करण्याची काय आवश्यकता होती? त्यात कांही अर्थकारण असेल अशी कोणी शंका घेतली तर?

>>माझ्यासारख्या सामान्य "पादचारी जातीतील " माणसास मात्र अशा प्रकारे लोकान्च्या जीवास धोका होऊ शकणारे बाईकिन्ग करणार्‍यास गोळ्या घातल्या तेच बरे केले असेच वाटू शकेल, कारण ते मेले नाहीत, तर रस्त्यावरील कोणीही मरु शकते, व सलमान खान ते कालपरवा पर्यंत अशी उदाहरणे शेकड्यान्नी आहेत, <<

या पोरांचे वागणे इतके बेताल असते कि असे वाटणे स्वाभाविक आहे.
पण पोलिसच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात हे ठीकठिकाणी दिसून येते. गर्दीच्या चौकात ते कोणाला पकडतात आणी कोणाकडे दुर्लक्ष करतात हे पाहिलंत तर ध्यानात येईल.
सलमानला त्या घटनेनंतर कसे वाचवता येईल त्याचीच मगजमारी करण्यातच पोलिस यंत्रणा गुंतल्याने कारवाईला खूप विलंब झाला असे आरोप त्यावेळी झाले होते याची मी आठवण करून देतो. त्याचे माणसे मारूनही आजवर कांहीही बिघडले नाही आणि येथे माणूस मरण्याच्या शक्यतेवरून एकदम गोळीबार असा विरोधाभास नाही का?

गाडीचे टायर पंक्चर करण्यासाठी गोळी झाडल्याचे वाहिनीवर सांगितले जात होते. <<
पोलिसांना स्थीर टार्गेटला तरी अचुक टिपता येण्याइतका सराव असेल असे वाटत नाही. या ठिकाणी तर भरधाव वाहनाच्या टायरला नेमकी गोळी लागण्याची शक्यता कितपत होती?

पोलिसांचा नेम असो वा नसो, ते गोळी टायरच्या दिशेनेच झाडणार. कुणी वाकला, मध्ये आला, तर गोळी लागून मरु शकतो. यात पोलिसांची चूक नसते.

भास्करमामा, समजा गाडीवरुन भरधाव कुणी जात आहे, त्याचा फोटो काड्।अला.. तर फोटोमधील स्थीर चित्रावरुन तो वेगात होता की नाही हे कसे समजणार? फोटो वरुन वेग समजतो का?

जागोजागी कॅमेरे, जमलच तर सगळ्या पोलिस व्हॅनवर कॅमेरे आणि पोलिसांच्या टोप्यांवरही कॅमेरे... यापेक्षा अधिक काही करता येइल असं वाटत नाही.

शिक्षणावर खर्च करत नाही, केलेला कामात पडत नाही, संस्कार शाळेत शिकवून येत नाही, मग काय... असेच रक्त सांडणार... दुर्दैव.

बाकी मानवी हक्कवाल्यांना इकडे नरेगाचे पैसे मिळाले नाही म्हणुन आत्महत्या करणारे दिसत नाही, खड्ड्यांत मरणारे दिसत नाहीत.... त्यांची बंदुक नेहमीच पोलिसांविरुद्धच !

या पोरांच्या गाड्या/लायसेंस जप्त करून सुरुवात करणे पोलिसांना कठीन आहे काय? तसेच अनेक कलमे लाऊन त्यांना आणि त्यांच्या पालकांना कोर्ट्कचेरीच्या चक्रात अडकविणे पोलिसांना सहज शक्य असते.
<<<< आपण दिल्लीतल्या मुलांबद्दल बोलत आहोत. ही मुलं बर्‍याचदा ब्युरोक्रॅट्स अथवा राजकारणी लोकांची असतात. "हमारे पैचान ऊपरतक है" या एका कारणामुळे वेळ आली तर पोलिसांनाच थोबडवतात. अशा मुलांविरूद्ध कारवाई केल्यास कित्येक पोलिसांना ट्रान्स्फर अथवा निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी गाड्या लायसेन्स जप्त करणे यामुळे काही हासिल होण्यासारखे नाही. कोर्टकचेरी कोळून प्यायलेली लोक असतात. जिचा मुलगा गेला त्या बाईने ऑलरेडी "माझ्या मुलाला बाईक चालवता येतच नव्हती, तो घराबाहेरच गेला नव्हता. पोलिसांनी उगाच त्याला मारले" वगैरे बोलायला सुरूवात केली आहे. मुलगा गेल्याच्या बारा तासाच्या आत हे असे प्रेससमोर बोलायला काय अचाट धाडस लागते त्याची आपण कल्पना करू शकतो.

या मुलांनी पोलिसांवर हल्ला केला होता आणि म्हणून पोलिसानी स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली. त्यामधे काही कोलॅटरल डॅमेज झाल्यास पोलिस जबाबदार नाहीत. आपण आपल्या मुलांना रात्री बाहेर कुणाबरोबर कुणाच्या संगतीत सोडावे हा प्रत्येक पालकाचा वैयक्तिक प्रश्न.

दिल्लिची 'टगेगिरी' मि स्वतः नेहेमिच अनुभवली आहे. तिथे 'निओ रिच' पिढीच्या बेगुमानतेचा चांगलाच अनुभव आहे. तिथे सायंकाळी सात नंतर आया बहिणी घराबाहेर पडत नाही ह्यातच सर्व आले.
कायदा हा त्यांच्या खिशात असतो कारण जवळपास सगळ्यांचे लागेबांधे 'वरती' असतात.'अबे क्या करेगा तु?' असे एक नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पोराने धडधाकट 'हरयाणवी' पोलिसाला विचारलेले मि ऐकलेले (पाहिलेले) आहे. इंटरनँशनल फ्लाइट्ने आल्यास दिल्ली एअरपोर्ट वर टेकल्या टेकल्या फटाफट आपापले फोन काढून बोलण्याची घाई करण्यार्‍या दिल्लीकरांशी बरेच जणांची गांठ पडली असेल! ते 'कळवळून' सांगण्यार्‍या होस्टेस ला भिक सुद्धा घालत नाहीत.एकंदरीत दिली म्हण्जे 'बेमुर्वतपणा, उद्दामपणा' हे मि तरी अनुभवले आहे व मलाही त्यांच्याच टोन मध्ये बोलल्यासच तेथिल टँक्सीवाल्यांकडून 'बरी' सेवा मिळू शकते,गोड बोलल्याने नाहिच.
अपवाद आहेत पण खूप विरळा!

या पोरांच्या गाड्या/लायसेंस जप्त करून सुरुवात करणे पोलिसांना कठीन आहे काय?>>> ही मुले लायसेंस सारख्या गोष्टी जुमानत असतील काय? रीतसर लायसेंस काढून गाड्या फक्त आपल्यासारखे लोक चालवतात असले नाही.

मला तर पोलिसांची खरंच कीव येते. दिवस-रात्र काम करुनही, सणावाराला देखील रजा मिळत नाही.
गुन्हेगारांना पकडले की हाय्-प्रोफाइल असला की "वरुन" दबाव.
लो-प्रोफाईल असला की जेलात जागा नाही, पुरावे गोळा करुन केस उभी राहीपर्यंत पोसा.

चकमकीत मेला तर मिडीयाची बोंब. त्यात जर राजकीय फायदा असेल (इशरत), तर मग विचारुच नका. Sad

नंदिनी | 30 July, 2013 - 12:57
आपण दिल्लीतल्या मुलांबद्दल बोलत आहोत. ही मुलं बर्‍याचदा ब्युरोक्रॅट्स अथवा राजकारणी लोकांची असतात. "हमारे पैचान ऊपरतक है" या एका कारणामुळे वेळ आली तर पोलिसांनाच थोबडवतात. अशा मुलांविरूद्ध कारवाई केल्यास कित्येक पोलिसांना ट्रान्स्फर अथवा निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.
<<

वाहिन्यांवर गेले कित्येक आठवडे बाईकर्स्च्या या कसरती दाखविण्यात आल्या आहेत. त्त्यात अशी पोरे मोठ्या संख्येने दिसतात आणि त्यांना चिअर करणारी गर्दी तर त्याहून मोठ्या संख्येने दिसते. अशा उद्दाम गर्दीवर काबू करायला मोठ्या फौजफाट्यासह व्यवस्थित प्लॅन आखून पोलिस गेले होते असे दिसत नाही.
आपण वर्णन केलेल्या परिस्थितीची दिल्ली पोलिसांना कल्पना असेलच. तरीही त्यांनी पुरेशा तयारीशिवाय एखाद्या अधिकार्‍यावर ही जबाबदारी सोपवली असावी आणि त्याला आपलाच जीव वाचवण्याची वेळ आली असावी. आता त्याला सस्पेन्शन इ अग्निदिव्यातून जावे लागणार आणि मग हे बाईकर्स असाच धुडगूस घालणार.
मस्तवाल श्रीमंत, अधिकारी आणि , नेतेमंडळी आपापल्या सग्यासोयर्‍यांना आवरत नाहीत तोवर आपल्याला जीव मुठीत धरूनच रस्त्यांवरून वावरावे लागणार असा निष्कर्ष येथील अनेकांच्या प्रतिसादाव्ररून काढावा लागेल.
पण आता घडलेली घटना पुन्हा पुन्हा होणे कठीण आहे. कोणता शहाणा पोलीस यांना काबूत आणण्याचा प्रयत्न करून जीव आणि नोकरी धोक्यात घालील?

अँटीमॅटर | 30 July, 2013 - 12:11
शंभस सीसीपेक्षा जास्त ताकदीच्या बाइक्स बनवण्यावरच मर्यादा आणली पाहीजे आणि ज्यांना अश्या पावर बाइक्स घ्यायच्यात त्यांना वेगळे लायसन्स इश्यु करायला हवे.
<<
जास्त वेगाने धावू शकणार नाहीत अशाच बाईक्स तयार करणे हा उपाय किती जणांना मान्य होईल?
ज्यांना कुठल्याच कायद्याचे भय नाही त्यांच्या हाती पॉवर बाइक आली की ती लायसेंसची कि बिगरलायसेंसची याची ते पर्वा कर्तील? आणि पोलिस जर त्यांना हातच लावू शकत नसतील तर वेगळा लायसेंस दिला काय नि न दिला काय. सगले सारखेच!

विजय देशमुख | 30 July, 2013 - 12:13
चार बाईकर्सशी एक पोलिस नुस्त्या लाठिने लढू शकत नाही तर १००-१५० (पोलिसरिपोर्ट) बाईकर्सशी १०-१२ (?) पोलिस कसे लढू शकतील?
<<
बाईकर्स/ चिअर करणारे यांचा मॉब किति मोठा असतो आणि कसा असतो हे पोलिसांना माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. अशा तुटपुंजा तयारीने गेल्यावर जिवावर बेतले नाही तरच नवल!

सावली | 30 July, 2013 - 11:57
आमच्याच सोसायटीत सध्या एक मोठा प्रॉब्लेम आहे. दहा बारा वर्षाची पोरं टू व्हिलर घेऊन फिरवत बसतात. ....... मात्र पालकांना तक्रार केली तरी पालक काहीच करत नाहीत. मुळात तेच गाडीची चावी मुलांच्या हातात देतात. अजुन थोडे मोठे होऊन हिच मुलं रस्त्यावर गाड्या उडवायला लागतील यात शंका नाही.
<<
हा सार्वत्रिक अनुभव आहे.
हे पालक भांडखोर, उद्दाम किंवा गुंड असतात. त्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याचे लोक टाळतात. एखाद्याने धैर्य दाखवलेच तर तो बहुदा एकटा पडतो.
आपल्या पोस्टशी पूर्ण सहमत.

>>>> कोणता शहाणा पोलीस यांना काबूत आणण्याचा प्रयत्न करून जीव आणि नोकरी धोक्यात घालील? <<<<<
या ऐवजी, "कोणता शहाणा बाईकर रस्त्यात कुठेही कशीही वेगात गाडी चालवुन पोलिसांच्या गोळीला/नागरीकान्च्या लाठीला बळी पडेल?" अशी स्थिती का सूचत नाही? Wink
मला तरी सूचते बोवा.

limbutimbu | 30 July, 2013 - 16:04नवीन
.... या ऐवजी, "कोणता शहाणा बाईकर रस्त्यात कुठेही कशीही वेगात गाडी चालवुन पोलिसांच्या गोळीला/नागरीकान्च्या लाठीला बळी पडेल?" अशी स्थिती का सूचत नाही?
<<
सुचत नाही असे नाही पण प्रतिसाद देणार्‍यांनी दिल्लीतील ज्या स्थितीचे वर्णन स्वानुभवावरून केले आहे ते पाहाता अशी स्थिती हे स्वप्नरंजनच म्हणावे लागेल.
तरीही अशी स्थिती येवो ही शुभेच्छा!

दिल्लीतील ज्या स्थितीचे वर्णन स्वानुभवावरून केले आहे ते पाहाता अशी स्थिती हे स्वप्नरंजनच म्हणावे लागेल.<<<

पूर्ण सहमत!

दिल्ली लुटेरोंका शहर है!

हर चीज सिर्फ छीनकरही मिलती है!

दिल्लीत काहीही करावे आणि राजकीय हवाला द्यावा!

दिल्ली भयानक आहे. स्वानुभवावरून! Happy

http://www.youtube.com/watch?v=9aPmT13SQ2I

हे आणि अजुनही व्हीडीओ आहेत...बहुतेक मुसलमान बाईकर्स आहेत. भिती का नाही हे सगळ्यांना माहीती आहे.

बाकी धर्म कोणताही असो, इतरांच्या जिवाशी खेळायचा अधिकार कोणालाही नाही.. या अन अशा - सोसायटीत लहान पोरांनी स्कुटर फिरवणार्‍या - पोरांना अन लोकांना जरब बसेल असं काहीतरी व्हायलाच हवं.

पोलिसांनी गोळ्या चालवल्या ते अयोग्य नव्हतंच. व्हिडीओ पहा समजेल.

Pages