वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

Submitted by मी-भास्कर on 29 July, 2013 - 07:14

वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

निदान तीन एक महिन्यांपासून वाहिन्यांवर दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांची धाडसी कृत्ये दाखविली जात होती. दिल्ली पोलिस हे कसे काय खपवून घेतात असे प्रश्नही उद्भवत होते. अशा तरुणांची खरी जागा एक कमांडो शिबिरात वा बंदीगृहात असायला हवी असेही पहाणार्‍यांच्या मनात येणे स्वाभाविक!
अशा वेळी दोन दिवसांपूर्वी अचानक
" दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारत एक युवक ठार आणी दुसरा जखमी."

हे वृत्त !
(१) यापुढे दहशतवाद्यांबरोबर चकमकीत नेमबाजी करायला वाव नाही [ दहशतवादी मेला बिला तर तो फेक ठरणार याची खात्रीच! कशाला पडा त्या झंझटात? ] म्हणून या पोरांवर सराव करण्याची हौस भागवताय कि काय?
(२) हा धुडगूस याआधीच पूर्ण थांबवायचे अनेक मार्ग असतांना एकदम चकमक?
हे सर्व इतके दिवस चालले आहे. वाहिन्यांनी त्याचे व्हिडिओ शूतिंग केले आहे तसे तुम्ही करायचे. कि ज्यात त्यांचे चेहरे, बाईक नंबर्स, आणि कसरती असा सगळा पुरावा गोळा होईल. दुसर्‍या दिवसापासून बाईक्स आणि त्यावरील हिरोंना अंदर करायची मोहीम उघडायचि.
(३) एरवी नुसते अडविले तरी घाबरणार्‍यांसमोर शेर होता तसे यांच्यापुढे व्हायचे इतकेच! रस्त्यावर दिसणार्‍या या गाड्याच जप्त केल्या की सर्वजण कसे चालत तुमच्याकडॅ आले असते. तुम्ही आम्हाला नाही का साध्या साध्या कारणावरून अडविता? इथे तर काय सर्वप्रकारे चांदीच झाली असती सरकारची वगैरे. नेहमीचे काम सांभाळता सांभाळता जमले असते हे सर्व.
कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे श्रेय आणि अर्थकारण असे दोन्हीचा सुंदर मिलाफच!
आता आले ना चौकशीचे झंझट?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म... २-३ दिवस बातम्यात ही घटना दाखवत होते तेव्हा गोळ्या चालवण्याची वेळ का आली असेल असेच वाटत होते.
एकंदर हा प्रकार भयंकररित्या चालु आहे दिल्लीत असे वरील प्रतिसादातुन जाणवते आहे. अशा प्रकाराला आळा निदान आतातरी बसायलाच हवा.
मागील वर्षीच अझरुद्दीन चा मुलगा व त्याचा नातेवाईक, वेगात चालवताना अपघात होउन दोघे गेले होते ना?

@बेफिकिर
"कोणता शहाणा बाईकर रस्त्यात कुठेही कशीही वेगात गाडी चालवुन पोलिसांच्या गोळीला/नागरीकान्च्या लाठीला बळी पडेल?" अशी स्थिती का सूचत नाही?
<<
अशी स्थिती हे स्वप्नरंजनच म्हणावे लागेल.
जिथे दहशत्वाद्यांनादेखील यापुढे पोलिसांच्या गोळीला बळी पडण्ञाची भीती बालगायची जरूरी नाही तेथे या बाइकर्सना भीती बाळगायचे काय कारण आहे? म्हणूनच अशा स्थितीची अपेक्षा म्हणजे स्वप्नरंजनच की.

शिल्पा बडवे | 30 July, 2013 - 21:54
हे आणि अजुनही व्हीडीओ आहेत...बहुतेक मुसलमान बाईकर्स आहेत. भिती का नाही हे सगळ्यांना माहीती आहे. <<

अहो हा धुमाकूळ वाहिन्यांवर दोन तीन महिन्यांपूर्वीच दाखविण्यात आला होता.

>>बाकी धर्म कोणताही असो, इतरांच्या जिवाशी खेळायचा अधिकार कोणालाही नाही.. या अन अशा - सोसायटीत लहान पोरांनी स्कुटर फिरवणार्‍या - पोरांना अन लोकांना जरब बसेल असं काहीतरी व्हायलाच हवं.<<
सहमत.

सुनिधी | 30 July, 2013 - 22:16
मागील वर्षीच अझरुद्दीन चा मुलगा व त्याचा नातेवाईक, वेगात चालवताना अपघात होउन दोघे गेले होते ना?
<<
त्या दोघांच्या नातेवाईकांना केंद्र व राज्यसरकारकडून मानवतेच्या भूमिकेतून भरपाई जाहीर झाली काहो?

तरीच! अशांचे सगेसोयरेच जर दिल्लितिल कसरतीत असतील तर बिचारे पोलिस तरी काय करणार म्हणा! स्वताचा जीव वाचवणार पण नोकरी गम्मवणार.

बेफ़िकीर | 31 July, 2013 - 07:38नवीन
मी भास्कर, मी तुमच्याशीच सहमत आहे, तुम्हाला असे वाटले का की मी असहमत आहे?
<<
मी फक्त 'ती स्थिती स्वप्नरंजन' का वाटते त्याला आणखी एक सबळ कारण देण्याचा प्रयत्न केला.
आपण सहमत आहात हाच अर्थबोध मला झाला. कृपया गैरसमज नसावा.

भ्रमर | 30 July, 2013 - 10:58
कालच वाचलेली आणखी एक बातमी अस्वस्थ करुन गेली.
फरीदकोटच्या माजी महाराजाची २०,००० कोटींची संपत्ती त्याच्या दोन मुलींना मिळाली. २०,००० कोटी १२२ कोटी भारतीय जनतेमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती कोटी मिळतील??? जिथे कित्येक लोकांना धड जेवायला मिळत नाही अशा देशात एकाच कुटुंबाच्या मालकीची एवढी प्रचंड संपत्ती, ही बाबच मला अस्वस्थ करुन गेली.
<<
स्वाभाविक आहे.
तुम्ही त्यांचे जावई नाही ना?

१२२ कोटी....

त्यापेक्षा २०० कोटीने भागा. भागाकार सोपा जाईल . २०० कोटी भा - पा - बां -- अखंड भारताची लोकसंख्या. Proud

१६३ रुपये मिळाले तर हरखून हातातील नोटांकडे बघत बसणारे लोक भारतात आहेत विजय देशमुख स्मित>>>>>>>> Sad खरं आहे बेफिकिर

अशिच अजुन एक बातमी काल पसुन टी व्ही वर येतिये ... जवहरलाल नेहरु युनीव्हरसीटीत भर दिवसा मुलाने मैत्रीणीचा खुन करुन स्वतहा आत्महत्या केली ....

किती कठिण परिस्थिती आहे ही ......कुठे आणी कशी मुल सुरक्षीत रहातिल कळतच नाही ...
माथेफिरु होता म्हणे ...अरे काय हे ........ Sad Sad

१६३ मधे दिल्लीत ३२, मुंबईत १३, आणि काश्मिरात १६३ जेवणं मिळाली असती प्रत्येकाला.. (राजकर्त्यांच्या मताने).
धर्माचा प्रश्न नाही, पण पोरांच्या मूर्खपणाचा आणि आईबापांच्या महामूर्खपणाचा प्रश्न आहेच...

@सुहास्य -- अस का बरं केलं असेल? हे ही एकदा तपासुन बघायला हवं ... प्रत्येक वेळेस मुलाची चुक असेल अस नाही. केलेला अपराध जरूर मुलाचाच आहे. आणी हा अपराध कस्ली तरी प्रतिक्रिया आहे.

भास्कर, नुकसानभरपाईबद्दल मला माहिती नाही. आणि तुमच्या प्रश्नाचा खरेतर रोख कशावर आहे ते पण कळले नाही.
अझरच्या मुलाचा अपघात दिल्लीत झाला नव्हता व तो 'पावर बाईक' भयंकर वेगात चालवत असताना control गेल्यामुळे झाला होता. अझरने त्यानंतर असे करु नका म्हणुन लोकांत प्रचार पण केला होता असे वाचले होते.

मी_भास्कर तुमचा कॉन्ग्रेस द्वेष आता विकृतीच्या पातळीला पोचला आहे असे दिसते.दिल्ली पोलीस म्हनजे कॉन्ग्रेस हेच समीकरण तुमच्या डोक्यात आहे म्हणूनच तुम्ही पोलीसावर टीका करताय . एकदा दिल्लीला जा पायी फिरून धडपणे परत या म्हनजे मिळवली. या पोरांवर मशिन गन चालवल्या पाहिजेत खरे तर तरच लोक धडपणे चालू शकतील. काही केले नाहीतर तर (काँग्रेसचे) पोलीस कसे हात बांधून बसलेत हे पुन्हा बोम्बलणार.

Pages