पनीर कटलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2013 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२०० ग्रॅम पनिर कुस्करून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन
१ गाजर किसून
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
२ बटाटे उकडून कुस्करून.
१ चमचा आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
२ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
गरजे नुसार मिठ
पाव ते अर्धा वाटी तेल
चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

१) भांड्यात तेल गरम करुन त्यावर चिरलेला कांदा घाला.
२) कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजला की त्यावर आल-लसुण पेस्ट व मिरची कोथिंबीर पेस्ट घालून ढवळा.
३) वरील मिश्रणावर कोबी, गाजर घालून २-३ मिनिटेच परतवत शिजवा. चायनीज पदार्थांसारखेच जास्त शि़जू देऊ नका.

४) आता कुस्करलेले बटाटे, मिठ घालून पुन्हा चांगले ढवळून लगेच गॅस बंद करा.

५) हे मिश्रण एका ताटात पसरवा व जरा थंड होऊ द्या.

६) मिश्रण थंड झाले की त्यात पनिर व कॉर्नफ्लॉवर टाकून मिश्रण एकजीव करा.

७) आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट करा. व नॉनस्टीक पॅनवर जरासेच तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्या. दोन्ही बाजू मध्यम आचेवर साधारण ५-६ मिनीटे शिजवा.

८) कटलेट तयार झाले की गरम असतानाच त्यावर चाट मसाला भुरभुरवा नुसते किंवा सॉस किंवा पुदीना चटणी बरोबर ह्याचा आस्वाद घ्या. Happy

वाढणी/प्रमाण: 
४-५ लोकांसाठी
अधिक टिपा: 

*ह्या कटलेटमध्ये इतर कोणतेही मसाले न वापरल्याने पनिर व भाज्यांचा अस्सल स्वाद येतो.
*लहान मुलांना तर खुपच आवडतात. शिवाय कोबी सारखी भाजी खाल्ली जाते.
*ह्यात अजुन कांद्याची पात, किंवा आपल्या आवडीच्या भाज्या थोड्या प्रमाणावर घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शलो फ्रायऐवजी मायक्रोवेव्हमध्ये ग्रिल कसे करतात? मी ट्रायल अँड एरर केले आहे पण नीट माहिती हवी आहे.
जागू, मस्त आहे रेसिपी.

मस्तच गं. ट्राय करते. एक शंका, शॅलो फ्राय करतांना पनीर जळत नाही का? की लवकर काढावे? बेक केले तर?

चिन्नु पनीर जळत नाही कारण बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर आहे.

टुनटुन टाकु शकतो ना बीट. Happy

शर्मिला टिप बद्दल धन्स.

गमभन तरी मी मासे नाही टाकले. Lol

मंजू, झकासराव, जाई, अन्जु धन्यवाद.

आशुडी खर तर पुस्तकात ही रेसिपी सिंक कबाबची होती. त्यात लिहीले होते माव्हेमध्ये करायचे पण किती डिग्री, मिनिटे ते काही नव्हते. मग मी त्याचे कटलेट केले. Lol पण छान झाले अगदी. सगळ्यांना खुप आवडले.

जागू, मस्त दिसताहेत कटलेट. तुझी चटणी नेहमी मस्त हिरवीगाऽर एकदम ताजी ताजी दिसते.

शर्मिला, सोया ग्रॅन्युल्स कसे घालायचे? शिजवून की कसे??

मस्त जागु Happy पण आज उपवास आहे.
मी मागे कटलेट केले तेव्हा ते जास्त तेलकट वाटत होते.हे पण साधारण तसेच वाटताहेत. Sad

मस्त. आज उपास आहे तरी वाचण्याचा मोह झाला. ह्यात मटार, भिजवलेली कडधान्ये घातली तरी छान लागेल असे वाटते.

मिळुन येण्यासाठी बटाटा आहेच तर कॉर्नफ्लोरची आवश्यकता आहे का ?
बाकी मस्त रेसिपी.
सोया ग्रॅन्यूल्स टाकले तर कॉर्नफ्लोरची गरज लागत नाही. >> हे आवडले, करुन बघणार. Happy

मी करून पाहीले कटलेट्स. मी घरचं पनीर वापरल्याने की काय पण खूपच मौ झाले होते. इतके की पॅनमध्ये उलटायलाही जमत नव्हते Happy चव छान आली. मी पुदिन्याची पाने पण तोडून घातली होती. कदाचित पनीर जास्तही झाले असावे. मलाई कबाबची चव लागत होती. एकूण मज्जा आली. पुढच्या वेळेस मिरच्या जास्त घालून करते.
आणखी एक म्हणजे शॅलो फ्राय करतांना तेलाची गरजच पडली नाही. पनीरमुळे फॅट सुटून येत होतं, त्यातच फ्राय झालेत. थँक्स Happy

शांकली धन्स.

चिन्नु हो ग अगदी कमी म्हणजे थेंबभर तेलही पुरेसे होते. मी पण घरचेच पनिर वापरले आहे वरच्या कबाब मध्ये. पण अगदी कुस्करून पिळून घेतले होते. थोडा बटाटा जास्त वापरायला हवा होतास का?

Pages