पोपटी मिरच्या

Submitted by देवकी on 24 July, 2013 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०० ग्रॅम जाड्या पोपटी मिरच्या,कोथिंबीर,ओले खोबरे, अर्ध्या लिंबाचा रस,मीठ,हिंग,मोहरी,मेथीदाणे २ लहान चमचे.तेल

क्रमवार पाककृती: 

१)मिर्च्यांचे मोठे तुकडे करून मधे चीर द्यायची.ओले खोबरे,कोथिंबीर, मीठ लिंबूरस एकत्र करून त्यात भरायचे. तव्यावर २ चमचे(लहान) तेल घालून झाकण लावून फ्राय करायचे.
२)हिंग ,मोहरी,३-४ मेथीदाणे १ यांची फोडणी करून मिर्च्यांचे मोठे तुकडे त्यात टाकायचे.वर आधण ठेवावे.५ मिनिटांनी त्यात मीठ,ओले खोबरे,कोथिंबीर क्रमाक्रमाने घालावे.गॅस बंद करून लिंबू पिळावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३जण
माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा
मी याआधी फोटो टाकण्याचे अयशस्वी प्रयत्न केले हो! पण जमत नसल्याने आता सोडून दिले.