अमृर्त संगीत.

Submitted by राहुल नरवणे. on 24 July, 2013 - 07:31

संगीत …. राग, आलाप, चढ उतार, ताल, सूर, मात्रा, वेळा, वाद्य, या सगळ्या सोबत प्रचंड साधना, प्रचंड
रियाज, स्व:तचं भान विसरून सात स्वरामध्ये विलीन व्हायचं. स्वत: चा आवाज स्वत: मधून काढायचा. समोरच्याला जाणवला पाहिजे. त्याच्या मनाशी गुंज घातली पाहिजे. त्यात भ्रमारच गुंजारव आलं. फुलपाखराच नाजूक प्रेम आलं. नदीचं शांत घनदाट वनातलं अल्लड खळखळणं ही आलं, खोल दरी आली. प्रचंड पर्वताची विशालता आली. समुद्राचा प्रचंड आक्रोश आला.एका गळयातून ऐवढे आवाज.
कित्येक ताकतीच्या लेखण्या थकल्या पण आवाजाची लय अक्षरांना कुठे ? सात स्वरांना पकडायला अक्षरे अपुरी पडतात. एखादा तर बेज गवया ज्यावेळी गातो. तेव्हा गाण्यातील चढ उतार कानामधून ह्रद्यापर्यंत पोहचत असतात. श्रोत्याला गायकाच्या ह्रद्याजवळ कान लावून सगळ्या गोष्टी शांतपणे एकव्याशा वाटतात. त्याच्या गळ्यातून निघणाऱ्या त्या आवाजरुपी हवेवर आपण मालकी गाजवावी. ती हवा कोणत्या हवेपासून बनली असेल, किती ठिकाणहून तिनं भावनेची पोती वाहून आणल्या आहेत. प्रत्येक पोत्यावर न मिटणाऱ्या शाईने आपली नावे गोंदवावित. ह्रद्याच्या गोदामात बंद करावं. मनाला वाटेल तेव्हा त्या हवेच्या बाष्पांनी भिजून घ्यावं, न्हाऊन जावं, मंत्रमुग्ध व्हावं. मग कोणत्याही गवयाच्या मस्का मारणं नको. पण पुन्हा वाटतं गाणं म्हणताना त्या आवजाबरोबर हालणारा हात पहिला की वाटतं या हाताच्या प्रत्येक मुद्रेचा किराया दयावा. प्रत्येक सेंकदाच ऋण फेडावं. त्याचा हात जेव्हा लईमधून फिरतो तेव्हा हिमालयाच्या अतिउच्च शिखरावरून हाताबरोबर खाली वितळ्यासारखं वाटतं. हात समान लईमध्ये शरीरापासून दूरपर्यंत लांब लांब होत जातो. तेव्हा कित्येक भूमंडलाच्या बदलत्या वातावरणानुसार प्रवास केल्याचं जाणवतं.
साधना किवा तपश्च्रर्या कश्याला म्हणायाचं. शरिरातील प्रत्येक पेशी त्या गायकाच्या गळयातील स्वरांशी साथ देत असते. साधना फ़क़्त गाण्याची किंवा आवाजाची नसते. श्वास गरम झाला कि, अंगातील रक़्त उष्ण व्हायला लागते. आवाजातील उताराबरोबर रक़्त गोठल्याचा भास होतो. रक़्तातलं ऑक्सिजन चं प्रमाण आपल्याला जाणवायला लागतं. एक स्वर कित्येक वेळा त्या श्वसननलिकेतून बाहेर आलेला असतो. 'आवाज श्वासांची पूजा करतो'. ह्रद्याचे ठोके श्वासांच्या आधीन होतात. इथे आत्मा श्वासांना मालकी हक्क देऊन मोकळा होतो. तिथे बाकी अवयवाचं काय ?
संगीत शब्दांत मांडण, पकडणं कठीण तिथे हे प्रयत्न माझ्यासारख्या पामराने करणे म्हणजे उपेक्षाच.
संगीत अव्यक्त आहे. गाण्याऱ्याबरोबर ऐकण्याऱ्यानेही अमृर्त व्हायला हवं.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार चांगले आहेत, राहुल. पण इतके वेगाने लेखणीतून उतरलेत बहुदा की, बर्‍याच ठिकाणी गडबड झालीये.
माझा स्वतःचा अमृर्त ह्या शब्दाच्या अर्थापासून गोंधळ आहे.

यावरुन एक कळलं की मला अजुअन्ही बर्‍याच गोष्टी कळत नाही. देशमुख जागे व्हा.... वाचा वाचा वाचा.....