थांबलो येथे परी हा अंत नाही

Submitted by रोहितकुलकर्णी on 21 July, 2013 - 02:24

थांबलो येथे परी हा अंत नाही
धावलो नाही, तरीही खंत नाही

ही नव्हे मंजूर सीमा मांडलेली
मी अजूनी बांधलेली भिंत नाही

पांथिका माझ्या किनारी ना विसावा
लाटही अद्याप येथे शांत नाही

नित्य येऊ दे चिता येथे स्मशानी
लाकडांना कोणताही पंथ नाही

हे रुढीच्या पालकांनो, चालते व्हा
त्रास सारे भोगण्या मी संत नाही

तू तुझी नाती नको सांधू नव्याने
मी कधीही मांडला आकांत नाही

- रोहित कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खयाल छान आहेत मस्तच आहेत नेकही अहेत पण काफिया -अलामत हा तांत्रिक मुद्दा अजून कच्चा दिसतो तुमचा अजून अभ्यास करा त्या मुद्द्याचा

खूप खूप शुभेच्छा