उपवासाच्या इडल्या

Submitted by smi rocks on 19 July, 2013 - 05:17

लागणारा वेळ : १५-२० मिनीटे

साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.

क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.

टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.
एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.

फोटो :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्वाच्या इडल्या पण मस्त दिसताहेत.

मी करून बघेन नक्की. आमची पोरगी 'डब्यात काय देऊ?' असं विचारलं की हमखास 'इडली' सांगते, अगदीच आयत्यावेळी करण्यासाठी हा पर्याय मस्त आहे.

धन्यवाद लोक्स... Happy

direct वरईचं पीठ वापरलं तर पाण्यात कालवून?...>>> प्रयोग करुन बघायला हरकत नाहि...

योग्या, स्मि कधी यायचं ?? ..>>>> कधिहि..

हा खरा उपवासाचा पदार्थ वाटतोय.

सौम्य, सात्विक आणि तेलातूपाचा , अनावश्यक कर्बोदकांचा भडिमार नसलेला.
आवडला.

डाएट रेसिपी म्हणूनही खाऊ शकतो,फक्त खोबरे वगळून चटणीत भरपूर पुदीना, कोथिंबीर घालावी लागेल.

वॉव! काय सुरेख दिसतायत. वरीच्या इडल्या करता येतात हेच माहित नव्हते. या पाकृ बद्दल धन्यवाद.

Pages