झट्पट केशर-पिस्ता आईस्क्रिम

Submitted by माधवी. on 18 July, 2013 - 09:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुध(फुल क्रीम किंवा म्हशीचे दूध) १ कप
हेवी क्रीम २ कप
साखर पाऊण कप
पिस्ते पाऊण कप
केशर ८-१० काड्या

क्रमवार पाककृती: 

दुधामध्ये केशराच्या ५-६ काड्या आणि साखर घालून साखर विरघळेपर्यन्त उकळून घ्यावे.

५-६ पिस्ते बाजूला काढून उरलेले पिस्ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावेत.

आता दुध जरा थंड झाले की ते पिस्ते असणाऱ्या मिक्सरच्या भांड्यात घालून मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये हेवी क्रीम मिसळावे. बऱ्यापैकी घट्ट मिश्रण तयार होईल.

उरलेल्या पिस्त्यांचे काप करून ते वरून घालावेत. तसेच उरलेल्या केशराच्या काड्या घालाव्या.

फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ४-५ तास ठेवावे आणि नंतर आरामात आनंद घ्यावा. फार सुरेख चव लागते. का नाही लागणार म्हणा! Happy

फुल क्रीम दुध आणि हेवी क्रीम वापरल्यामुळे आईस्क्रिममध्ये अजिबात बर्फ लागत नाही. एकसारख्या consistency चे सुरेख आईस्क्रिम लागते.

20130712_214735.jpg20130712_215132.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कॅलरिजचा विचार न करता खावे. खालील माहितीकडे दुर्लक्ष करावे. Happy

गुगलमध्ये 1 cup heavy cream calories अशाप्रकारे सर्च केले असता खालील माहिती सापडली.
Calories in:
1 cup heavy cream = 315
1 cup full cream milk = 150
1 cup pistachios = 691
1 cup sugar = 773
म्हणजे ह्या पदार्थात जवळजवळ २२४४ कॅलारीज आहेत आणि १ कप आईस्क्रीम खाल्ले तर ७४८ केलारीज पोटात गेल्या की काय!
जाऊदे पण , एखादेवेळी चालते! Happy

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल व माझा ट्रायल्-एरर प्रयोग!
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रिम आणून पाहिले पण एकही आवडले नाही. मग एकदम ऑथेंटिक केशर्-पिस्ता आईस्क्रिम खावेसे वाटले आणि थोडे प्रयोग केले.
दुध आटवा मग थोडा वेळ फ्रिजमधे ठेवा मग पुन्हा एकदा ब्लेंडरमधून फिरवा, असे complicated प्रकार करायचे नव्हते. तसेच लागणारे साहित्यही मिळायला फार अवघड नाही. करायला आणि खायला मजा आली. Happy

धन्यवाद स्वाती, येळेकर,जाई
केल्यावर जरूर इथे लिहा.मी दुध फक्त साखर विरघळण्याइतके आणि पिस्त्यांची पूड नीट मिक्स होण्याइतपत घेतले. क्रिमचे प्रमाण थोडेसे वाढवले तर अजून छान लागेल असे वाटतेय. मी २ कप सुद्धा जरा घाबरत्-घाबरतच घातले. Happy

केकसाठीचे व्हिप केलेले क्रीम उरले आहे. ते वापरले तर चलेल का? आणि हेवी क्रिम म्हणजे नक्की काय आणि पुण्यात कुठे मिळते Uhoh

सारीका
अमुलचे क्रिम चालू शकेल असे वाटतेय.

वर्षा_म
केकसाठी कसे क्रिम लागते ह्याची मला कल्पना नाही. Happy त्यामुळे नक्की सांगू शकत नाही.

गीता, घरातली साय चालू शकेल कदाचित, पण क्रिमची consistency सायीला नसणार ना..

प्रतिसादास उशिर झाल्याबद्दल सॉरी आणि सगळ्यांचे आभार Happy

वीकेन्डला केलं हे आइस्क्रीम. पिस्त्यांऐवजी घरात होते म्हणून बदाम वापरले. जहबहरीही होतो हा प्रकार!! Happy
कुल्फीच म्हणता येईल आइस्क्रीमपेक्षा.
'कित्ती लोडेड आहे!' असं म्हणत 'बरं आता अजून एकच चमचा' असं करत संपवलं. Happy

रेसिपीसाठी धन्यवाद. Happy

वॉव! धन्यवाद स्वाती आणि मैत्रेयी!

कुल्फी स्टँड्मधे लावल्यानंतर कुल्फी बाहेर काढू तेव्हा फार टेम्टींग दिसेल असा विचार मनात आला. Happy
मलापण बरेच वेरीएशन करून बघायचे आहेत पण... Happy