वेडा मुग्गा, शाना मुग्गा ... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..)

Submitted by पुरंदरे शशांक on 15 July, 2013 - 01:04

वेडा मुग्गा, शाना मुग्गा... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..) Happy

शाळेत जातो तरी अजून
तोंडात बोटं घाल्तात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

हात कित्ती शी शी आहेत
तस्साच खाऊ खातात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

जर्रा थोडं लागता कुठे
आईऽ करुन रडतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

खाऊ देता कुणी कुणी
देनाऽ गजर लावतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

रात्री मात्र माझ्या कुशीत
गाणी ऐकत झोपशील ना
वेडा म्हणू दे कुणीही मग
गळ्यात हात टाकशील ना ??
शाना मुग्गा होशील ना ?? Happy Wink

छोट्यांचे निरागस प्रतिसाद -
नंदिनी | 16 July, 2013 - 10:45
किती गोड कविता आहे. काल लेकीला म्हणून दाखवली. तिलापण फारच आवडली खास करून पहिलं कडवं.

व्वा!... प्रे. यशवंत जोशी (बुध., १७/०७/२०१३ - ०८:२५).
नातवाला वाचून दाखविली... तीन वर्षाचा तो... हंसत हंसत 'नाsssई' चा प्रतिसाद देत गेला... 'अजून वाचा ना... ' त्याची लगट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व रसिकांना पुनः पुन्हा मनापासून धन्यवाद.

एका दुसर्‍या साईटवर आलेली ही प्रतिक्रिया मला देखील हळवी करुन गेली - ती अशी -
व्वा!... प्रे. यशवंत जोशी (बुध., १७/०७/२०१३ - ०८:२५).
नातवाला वाचून दाखविली... तीन वर्षाचा तो... हंसत हंसत 'नाsssई' चा प्रतिसाद देत गेला... 'अजून वाचा ना... ' त्याची लगट

बालकवितेवर छोट्यांची प्रतिक्रिया कशी असेल याची मला अपार उत्सुकता होती ती या प्रतिसादाने पूर्ण केली ....

शशांक, आज सकाळी एक गंमत झाली. काय झालॆ, काल संध्याकाळी निखिलने ( लेक वय वर्ष २०) नखं कापली, एका बोटाचे जरा जास्तच. सकाळी ऊठला तर बोट दुखत होते. म्हणुन त्याने बोट तोंडात घातले.... मला तुझी कविताच आठवली अन हसूच आवरेना. मग निखुला वाचून दाखवली, सगळी कविताभर मिश्किल हसत होता. अन शेवटच्या ओळींना गळ्यात पडला Happy
थँक्यु

<< सगळी कविताभर मिश्किल हसत होता. अन शेवटच्या ओळींना गळ्यात पडला <<
हाहा अवल!! लक्की आहेस खरच! Happy

<<नातवाला वाचून दाखविली... तीन वर्षाचा तो... हंसत हंसत 'नाsssई' चा प्रतिसाद देत गेला... 'अजून वाचा ना... ' त्याची लगट<<
व्वा... शशांकजी! करोडो रसिकांची आवडल्याची पावती हा छोटासा रसिक देउन गेला. Happy

काल संध्याकाळी निखिलने ( लेक वय वर्ष २०) नखं कापली>>> २० वर्ष म्हणजे जरा जास्तच मोठा नाही का? Happy
छान आहे हे बाल गीत. Happy

वा वा खूप मजा आली!!

माझा मुलगा अजून शाळेत जात नाही पण असाच वेडा मुग्गा आहे Happy त्यालाही रात्री माझ्या कुशीत गाणी म्हणत आणि गोष्ट ऐकत झोपायला खूप आवडतं!

मस्त बाल कविता....
त्या वयातलं मुल आणि त्याची आई ह्यांचे भावविश्व अगदी तंतोतंत टिपले आहे...

सुंदर !!!

Pages