वेडा मुग्गा, शाना मुग्गा ... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..)

Submitted by पुरंदरे शशांक on 15 July, 2013 - 01:04

वेडा मुग्गा, शाना मुग्गा... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..) Happy

शाळेत जातो तरी अजून
तोंडात बोटं घाल्तात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

हात कित्ती शी शी आहेत
तस्साच खाऊ खातात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

जर्रा थोडं लागता कुठे
आईऽ करुन रडतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

खाऊ देता कुणी कुणी
देनाऽ गजर लावतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!

रात्री मात्र माझ्या कुशीत
गाणी ऐकत झोपशील ना
वेडा म्हणू दे कुणीही मग
गळ्यात हात टाकशील ना ??
शाना मुग्गा होशील ना ?? Happy Wink

छोट्यांचे निरागस प्रतिसाद -
नंदिनी | 16 July, 2013 - 10:45
किती गोड कविता आहे. काल लेकीला म्हणून दाखवली. तिलापण फारच आवडली खास करून पहिलं कडवं.

व्वा!... प्रे. यशवंत जोशी (बुध., १७/०७/२०१३ - ०८:२५).
नातवाला वाचून दाखविली... तीन वर्षाचा तो... हंसत हंसत 'नाsssई' चा प्रतिसाद देत गेला... 'अजून वाचा ना... ' त्याची लगट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व रसिकांचे मनापासून आभार्स .....

दिनेशदा - अग्दी करेक्ट - मुग्गीलाही लागू होणारच हे ..... Happy
त्याप्रमाणे शीर्षकातच बदल केलाय आता ...

मस्त !

किती गोड कविता आहे. काल लेकीला म्हणून दाखवली. तिलापण फारच आवडली खास करून पहिलं कडवं. Happy

Pages