पुन्हा कधी यायचेच नाही

Submitted by वैवकु on 11 July, 2013 - 11:45

पुन्हा कधी यायचेच नाही अशा प्रवाशी
हवे तिथे हे जहाज नेतोय हा खलाशी

तुला बरे वाटण्यास मी "माफ कर" म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

कधीतरी पालटायलाही रुची हवी ना
म्हणून मागीतली सुखे मी न गोडघाशी

तुला कुठे सोडवायला सांगतोय कोडे
सहज म्हणालो जगायला हिंट दे जराशी

इथेच ..थोडाच वेळ आधी.. बसून होता
खरेच का घेतलीय त्याने घरात फाशी

तुला जसा पाहिजे तसाही नसेन अगदी
कसाच का...भांडतोय ना विठ्ठला तुझ्याशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मासरूळकर

जास्त हसू नका नै तर बिरुटे साहेब रागावतात मग तुमच्या आगामी गझलाना फळ भोगावे लागते ..अनुभवावरून बोलत आहे Sad

Pages