पुन्हा कधी यायचेच नाही

Submitted by वैवकु on 11 July, 2013 - 11:45

पुन्हा कधी यायचेच नाही अशा प्रवाशी
हवे तिथे हे जहाज नेतोय हा खलाशी

तुला बरे वाटण्यास मी "माफ कर" म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

कधीतरी पालटायलाही रुची हवी ना
म्हणून मागीतली सुखे मी न गोडघाशी

तुला कुठे सोडवायला सांगतोय कोडे
सहज म्हणालो जगायला हिंट दे जराशी

इथेच ..थोडाच वेळ आधी.. बसून होता
खरेच का घेतलीय त्याने घरात फाशी

तुला जसा पाहिजे तसाही नसेन अगदी
कसाच का...भांडतोय ना विठ्ठला तुझ्याशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला बरे वाटण्यास मी "माफ कर"
म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

इथेच ..थोडाच वेळ आधी.. बसून होता
खरेच का घेतलीय त्याने घरात फाशी >>
मस्त झालेत शेर ...आवडेश!! Happy

फक्त एक प्रॉब्लेम....
या वृत्ताची वाचनाची लय मला सापडली नाही (माझाच दोष असावा ) बायदवे , वृत्त कोणते आहे?

छान

गझल एकंदरीत छान.

मतल्याबद्दल शामशी सहमत, परंतू प्रवाशी - हे प्रवासाला ह्या अर्थाने आलेले आहे असे दिसत आहे. सूट नव्हेच तरीही अलगद बसणारा शब्द निवडण्यातली मजा औरच असते!

सुरुवात एकदम दर्यावर्दी विशाल वातावरणातली. 'प्रवाशी' ही सूट छानच.

तुला बरे वाटण्यास मी "माफ कर" म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

अनेक द्विपदी सुंदर.
शेवट होम पिच वर, तेव्हा आवडणारच.

पुन्हा कधी यायचेच नाही अशा प्रवाशी
हवे तिथे हे जहाज नेतोय हा खलाशी
.
तुला बरे वाटण्यास मी "माफ कर" म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

सुरेख शेर.

वैभव,
छान आहे गझल. आवडली..

तुला कुठे सोडवायला सांगतोय कोडे
सहज म्हणालो जगायला हिंट दे जराशी

हिन्ट शब्द चपखल .. मजा आली..

आभिनन्दन Happy

पुन्हा कधी यायचेच नाही अशा प्रवाशी
हवे तिथे हे जहाज नेतोय हा खलाशी

का कुणास ठाउक मला 'प्रवाशी' हे पटलं नाही. माझ्या मते मतल्यात सूट किंवा विवादास्पद असं काही नसावं. कारण तो पुनरुक्त होणार असतो. जर त्यात अन्युज्वल असं काही असेल तर ते खटकू शकतं.

तुला बरे वाटण्यास मी "माफ कर" म्हणालो
अता समजले असेल ..चुकलीस तू मघाशी

आवडला !

कधीतरी पालटायलाही रुची हवी ना
म्हणून मागीतली सुखे मी न गोडघाशी

'गोडघाशी सुखे मागितली नाहीत' असंच आहे ना ? तो 'न' जरी अनावश्यक, भरीचा अजिबात नसला तरी लुडबुड केल्यासारखा वाटला.

तुला कुठे सोडवायला सांगतोय कोडे
सहज म्हणालो जगायला हिंट दे जराशी

Happy

इथेच ..थोडाच वेळ आधी.. बसून होता
खरेच का घेतलीय त्याने घरात फाशी

सुंदर !

तुला जसा पाहिजे तसाही नसेन अगदी
कसाच का...भांडतोय ना विठ्ठला तुझ्याशी

विशेष वाटला नाही.

ह्या गझलेत मला खालील सुटी, अनयुज्वल शब्द आढळले -
प्रवाशी, नेतोय, अता, सांगतोय, हिंट, घेतलीय, भांडतोय.
'य'अन्ती शब्द बोली भाषेतले आहेत. ह्या गझलेच्या भाषेचा लहेजा बोलीचाच असल्याने ते चालूनही जातील. की उलट आहे ? म्हणजे हे शब्द आहेत म्हणून ही भाषा बोलीकडे जाते आहे ?
एकाच गझलेत इतक्या ठिकाणी सुटी किंवा अनयुज्वल शब्द वापरावेत का ? हे टाळणे इतके कठीण असते का ? टाळल्यास अधिक सफाई येईल का ? 'गोटीबंदता' म्हणजे नेमके काय मला माहित नाही, पण अश्या तऱ्हेने छोटे छोटे विवादास्पद मुद्दे (मी 'दोष', 'त्रुटी' म्हणत नाहीये) दूर केल्यास 'गोटीबंदता' साधता येते का ?

तुला वेगळे सांगायची आवश्यकता नाही, पण तरी.... टीका करण्याचा हेतू नाही. ह्यावर तुझे व इतरांचे विचार जाणून घेताना काही नवीन शिकण्यास मिळेल का ? हे पाहायचं आहे.

Happy

....रसप....

धन्यवाद जितू , तुला कोणते शेर आवडले /नाहीत आवडले / कमी आवडले याबद्दल अगदी मनमोकळेपणाने सांगीतल्याबद्दल धन्यवाद
मला प्रतिसादास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व
१) प्रवाशी हे अनेकाना पटणार नाही याची खात्री होती Happy एकतर हा शब्द अगदी सहज फ्लोमध्ये सुचला खालची ओळ तयार होती . कणखरजी म्हणाले तसे.अलगद बसणारा शब्द निवडण्यातली मजा मला या शब्दात घेता आली या शब्दाला अर्थ ..प्रवासाला /प्रवासास ..असा आहे
सूट वगैरे नसावी ही कारण या वृत्तात याला पर्याय म्हणून प्रवासी हा शब्द वापरावा लागला असता मुद्दलात फरक काहीच पडला नसता 'अशा प्रवासी' काय नि 'अशा प्रवाशी' काय एकच ...हा शब्द तूलनेने जरा कमी वापरतात हे मात्र मान्य "तो प्रवाशी" अशा अँगलने जास्त वापरतात प्रवासाला या एंगलने कमी वापरतात इतकेच ...सूट नाही वाटतय मलातरी ही
पुन्हा कधी यायचेच नाही अशा प्रवासाला असे करता वृत्त बदलले असते

२) तू म्हणतोय्स ते अनयूज्युअल शब्द पुस्तकी भाषेत ("प्रमाण" असे म्हणणे टाळत आहे ) सहसा वापरतात की हल्ली !! गद्य लेखनात ..बोलताना आपणदेखील वापरतोच . प्राकृत -संस्कृत भेद इथे गैरलागू ...मराठी ही मुळातच प्राकृत भाषा आहे ...पुस्तकी प्रमाण भाषा आज लोक आवर्जून वापरतातच असे नाही ..आपण मात्र त्यातही खासकरून काव्य रचताना ..त्यातही खासकरून वृत्तातून ....जराशी जुनी भाषाच वापरतो काळाच्या जरा मागे असल्यासारखे वाटते (मला नै वाटत ..अनेक लोकाना हल्लीच्या ..वाटते )
तसेतर प्रमाण मराठी भाषा म्हणजे फक्त "प्रगत शहरी" (पुणे मुंबई ) भाषा असे एक समीकरण आहे ..पुस्तकी भाषा म्हणशील तर पुस्तकात गद्य आजकाल भाषा झपाट्याने बदलली आहे अवघ्या महाराष्ट्रभरातले गावोगावचे शब्द लोकाना माहीती होवू लागलेत ..काव्यही आपली भाषा बदलते आहेच तद्वतच गझलेत जरा कमी स्पीड ने बदलत असेल पण बदलतेच आहे ...बदलायला हरकत घेता येणारच कशी ????
मग वर्‍हाडी व आगरी अश्या भाषेत गझल आलीच नसती की नै ! अहीराणी कोकणीतही लिहीत असतील लोक आपल्याला सवय नसली की अन्यूज्युअल वाटते जितू !!

३) मी असे अन्यूज्युअल शब्द इतकेच काय नवखे शब्दही अनेकदा गझलेत रचले आहेत ! ..मला आजची ही रचना रचताना जरा असे शब्द वापरायची मागची कुठलीतरी सूप्त इच्छा उफाळून आली एक दोन शेर तश्या ढंगाचे झालेही मग त्यामुळे जी शब्दयोजनातील अवेअर्नेस आली होती त्यापातळीवर मला असे शब्द गझलभर सुचत गेले शेर होत गेले ..मुद्दाम असे केले नाही पण जरा सजगता बाळगली हे खरे आहे (या आधी मकस च्या भाषांतर उपक्रमात केलेली रचना कशी जुनट वळनाची होती शब्द जुनेरे होते मज, तुज ,तव असे !
मला गझल दर गझल असे काहीतरी वेगळे करायला आवडते काहीतरी बदलत ठेवायचे तोच तो पणा नको म्हणून ... तेही स्वांतसुखाय बाकी असे करणे फार भारी असते वगैरेतलाही भाग नाही ...पण जरा फ्लेवर चेंज Happy

४) म्हणून मागीतली सुखे मी न गोडघाशी <<<<<< म्हणून मी गोडघाशी सुखे मागीतली नाहीत !!! <<< तू काढलेला अर्थ पटत नाही आहे पण शब्दयोजना अशी बनली आहे की हा देखील अर्थ निघू पाहतोय पण तसा तो नाही आहे .....म्हणून सुखे मागीतली ;तसा मी गोडघाशी नाही .. असा अर्थ अपेक्षित आहे
गोडघाशी = खूप गोड खाणारी व्यक्ती /हावर्‍यासारखे गोड खाणारी !! हे विषेषण की काय ते आहे व ते 'मी' या व्यक्तीला लागू पड्ते सुखाना नाही

असो,
जितू तुझ्या प्रतिसादातून >>>की उलट आहे ? म्हणजे हे शब्द आहेत म्हणून ही भाषा बोलीकडे जाते आहे ?<<< इतका भाग अजिबातच समजला नाही त्यामुळे त्यावर काय बोलावे हा प्रश्न पडला ..पण जे सुचेल ते जमेल तसे बोललो बघ
चू भू दे घे

~वैवकु

जितू एक शेर ऐकवतो जाता जाता ..........

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा !! Wink _
______ ~वैवकु

मला गझलेत किंवा तिच्या भाषेत त्रुटी आहेत हे वाटत नव्हते, म्हणून तसा शब्द न वापरता 'अनयुज्वल' हा शब्द वापरला होता.
जो मुद्दा तुला कळला नाही, तो पुन्हा मांडतो. मला हे म्हणायचं होतं की - 'य-अंती' शब्द (नेतोय, सांगतोय, ई.) हे शब्द ह्या गझलेत फिट्ट होतात कारण ह्या गझलेतील भाषेचा बाज 'बोली'चा आहे ?
की
हे शब्द आहेत म्हणून ह्या गझलेचा बाज बोलीचा झाला आहे ?

मला अजूनही एक समजत नाही की
शब्दाचा बाज व गझलेचा बाज हे वेगळे प्रकार असतात का ?
शब्दांमुळे जो बाज येईल तो गझलेच्या भाषेचा बाज

गझलेला मूड असतो हे मी ऐकले होते बाज हा शब्द शब्द्शैली भाषाशैली तिची व्याकरण्निहाय मांडणी याच्याशी निगडीत असावा बहुधा !! ढब वगैरे की काय असेही म्हणतात ते तेच असावे ..बाज !!

हिथंच थोडाच येळ आदी बसून व्होता
खरंच का घेतलीय त्यानं घरात फाशी

असे केले की ग्रामीण बाज येणार शेर तोच आहे कंटेंट मूड सेमच आहे बाज ग्रामीण आहे तो शब्दामुळे

आता असलेल्या "य "कारांत शब्दांमुळे गझलेच्या भाषेचा बाज /डौल /लेहेजा /ढब सांप्रत शहरी बोलाचालीच्या भाषेची अहे इतकेच

गझलेचा मूड क्याज्युअल (माझे इंग्लिश कच्चे आहे ..तुला माहीतीच्चय )प्रकारातला आहे सहजासहजी बोलल्यासारखा ....विषयही तसे साजेसे आहेत त्याला सहजासहजी मूड !!!

तुला जसा पाहिजे तसाही नसेन अगदी
कसाच का...भांडतोय ना विठ्ठला तुझ्याशी

या ओळी वाचल्यावर ,वरच्या ओळी विसरून गेलो.

च्यायला, आपली लेखनशैली परिचित होत चाललेली असल्यामुळे एखाद्या तरी शेराला दाद द्यावी असा प्रसंग जालीय आयुष्यात येतो की नाही अशी शंका यायला लागली आहे.

बाकी, ’गोडघाशा’ म्हणजे गोड खाण्याची आवड असलेला आणि ’गोडघाशी’ म्हणजे गोड खाण्याची आवड असलेली असा अर्थ घेऊन माझीच हहपुवा झाली. असो, बाकी मराठी भाषेत ’गोडघाशी’ या शब्दाची भर घातल्याबद्दल आभारी आहे.

पुलेशु....!

-दिलीप बिरुटे

बिरुटे आधी मराठी भाषा शिका मग बोलू गझल बद्दल
प्रतिसादाकरिता अजिबात आभार बीभार कै नैत चला फुटा आता !!!!!

अवांतर : बिरुटे तुम्ही होमियोपॅथिक डॉ . आहात काय त्यांचे आजकाल खूप वाईट हाल चाललेत असे ऐकून आहे
आपणास बेस्ट लक गुड विशेस् Wink

अर्रर्र... आपला प्रतिसाद वाचलाच नव्हता. (विचारपुसात लिंक डकवित चला. अधुन मधुन प्रतिसादाला, आपल्या रटाळ गझलांना आणि तुमच्या त्या स्टँडींग ओव्हेशन वाल्या गुरुला दाद देत जाईन)

>>>>> बिरुटे आधी मराठी भाषा शिका मग बोलू गझल बद्दल
मराठी भाषा शिकतोच आहे, मराठी भाषा शिकायला खरं पाहिलं तर खुप कष्ट घ्यावे लागतील. किती त्या बोली किती ते शब्द, आणि किती तिचे ते अर्थ...तेव्हा मराठी भाषा शिकली पाहिजे, याच्याशी सहमतच. बाकी, आपल्या गझलेवर बोलण्यासारखं आणि आपल्याशी गझलेवर बोलण्याचं माझ्याकडे तरी काही शिल्लक नाही.

>>>> प्रतिसादाकरिता अजिबात आभार बीभार कै नैत चला फुटा आता !!!!!

वोक्के. नका आभार आणि बिभार मानु. (बिभार शब्दाची मराठी भाषेत भर घातल्याबद्दल मी आभार मानतो)

>>>>बिरुटे तुम्ही होमियोपॅथिक डॉ . आहात काय त्यांचे आजकाल खूप वाईट हाल चाललेत असे ऐकून आहे

आता आपल्याला काय समजायचा ते समजा पण ज्यांच्या डोक्याचा पार (विचारांसहित) चमनगोटा झाला आहे किंवा घसरगुंडी झाली आहे, अशांना आम्ही एक झाडपाल्याचे औषध विकतो आपणास हवे असल्यास कळवावे, काही सोय नक्की करता येईल. Wink

-दिलीप बिरुटे

झाडपाल्याचे औषध <<<< अच्छा आयुर्वेदिक डॉ. आहात होय !!!!

बिभार शब्दाची मराठी भाषेत भर घातल्याबद्दल मी आभार मानतो<<<< अहो नको नको कशाला उगीच ..असूद्या असूद्या !!! तुम्हाला जुनाच का असेना पण एक शब्द नव्याने कळला हाच काय तो माझा आनंद Happy

बिभार शब्दाची मराठी भाषेत भर घातल्याबद्दल मी आभार मानतो<<<

बिभार म्हणजे बहुधा 'बिरुटेंचे आभार' असे असावे.

अवांतर - मला वाटत होते की सर्वच प्राध्यापकांना एक दिवशी मायबोली प्रशासन अर्धचंद्र देते. पण एक प्राध्यापक राहिलाय टिच्चून सहा सात वर्षे! Proud

पण एक प्राध्यापक राहिलाय टिच्चून सहा सात वर्षे! <<<एक अत्यावश्यक निरीक्षण !!!

बिभार म्हणजे बहुधा 'बिरुटेंचे आभार' असे असावे.<<< वाह ही सोय चांगली आहे !!!!!
.पण मग बिकट = बिरुटेंचा कट.....बिस्तर =बिरुटेंचा स्तर ......बिमोड =बिरुटेंची मोड (-तोड) असे म्हणावे लागेल काय ???-एक गंभीर प्रश्न !!! Uhoh

मोडतोड होताना दिसतेय इथे सगळी !
Lol

असो.
गझल आवडली.
फाशीचा शेर त्यातल्या 'ठहरावां'सोबत फार आवडला.

Pages