सोन्याचा भाव पुन्हा वाढेल का?

Submitted by पियू on 10 July, 2013 - 09:35

प्रिय गुंतवणुकदार..

गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात जोरदार घसरण चालु आहे.

वेगवेगळ्या गुरुपुष्याच्या निमित्ताने वेळोवेळी सोन्यात केलेली गुंतवणुक वाया जाते की काय असे वाटु लागले आहे.

सोन्याचा भाव पुन्हा वधारेल का? पोर्टफोलिओची पार वाट लागली आहे.

मी खुप कमी रिस्क घेणारी व्यक्ती आहे म्हणुन सरधोपट सोन्यात पैसे गुंतवले. आता वाईट वाटते आहे.

तुम्हाला काय वाटते?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

kahi kalji nasavi sonyacha bhav nakki vadnar...pan apan jar coin ghetle tar nakkich changle guntavnuk ahe pan jar dagine banivale tar matr ...kalantarane tyamadhe ghat honar tyapeksha coin ghetlele khupach changle

पियु परी: नक्कीच लिहायला आवडले असते पण सगळे मराठीत लिहायला बराच वेळ लागतो तेव्हा जमेल तसे लिहायचा प्रयत्न करिन, तसेही माझ्यापेक्षा इथली इतर तज्ञ मंडळी जास्त खोलात व सखोल माहिति देउ शकतिल.

इब्लिस त्या वाढलेल्या हजार रुपयान्चा भाव हजार रुपये आहे का ? ५३ रु/ $ होता तो आता ६२ रु/$ असा आहे, १५-१८ % नी घसरला.

भारतात सोन्याची मागणी वर्षाला ९०० टन अशी प्रचन्ड आहे, केन्द्राच्या योग्य निर्णयामुळे २५-४० % मागणी कमी झाली आहे, थोडी वाट बघितल्यास भाव अजुन पडेल असे वाटते.

जणू भाजी पालाच आहे>>> भाजी घेताना बार्गेन करता येतं.
सोनं घेताना सोनाराचाच नेहमी नाक वर...

६?

ते घेतलं की विकावं वाटत नाही हा सोन्याचा मोट्ठा प्रॉब्लेम आहे.>>>>> प्रॉबलेम नाही, चांगलेच आहे एका दृष्टीनी. लाँग टर्म मध्ये सोनं वाढतच आलय, त्यामुळे जितकं उशीरा विकाल तेवढा भाव चांगला येतो. आपल्या हयातीत नाही विकलं तर मुलांना होईल. इतका मोठा काळ गेल्यावर तर खुपच फायदा होतो. Happy
ज्यांना बाकी इन्वेस्टमेंट्स मध्ये डोकं घालायचं नाहीये त्यांच्या करता उत्तम गुंतवणूक आहे.

१० जुलै १३ ला धागा निघाला, तेव्हा २७००० असलेले सोने सध्या २० ऑगस्ट रोजी ३१००० आहे.
मी २७,१०० ने थोडे घेतले होते, हे आनंदाने जाहीर करतो. Proud
एक महिन्यात इतकी वाढ कोणत्याही गुंतवणूकीत आजपर्यंत झालेली नाही.
गेला बाजार फार पूर्वी १ रुपयाच्या महाराष्ट्र राज्य लॉटरीला ५१ रुपयांचे तिकीट लागले होते. तो मॅक्झिमम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होता Wink

सध्या खुपच उलाढाल सुरु आहे इब्लिस (त्यामुळे वर खाली होत आहे), त्यामुळे हा रिटर्न काही "True Representation" नाहीये. Happy

बुवा,
आय नो. पण तुम्ही म्हणालात तशी बिनडोक इन्वेस्टमेंट ऑप्शन म्हणून सोने नेहेमीच उत्तम होते, आहे व राहील.
कमर्शियल वापर वाढल्याने चांदी देखिल आजकाल भरपूर हलत असते. लिया बेचा करायचं असेल तर चांदी छान आहे. तिच्यातही किलोमागे ४-५ हजारांचा फरक याच कालावधीत पडला आहे.
(रच्याकने. १० ग्रॅम सोन्याच्या भावात, चांदीची 'वीट' मिळते Wink घेऊन पहा. आपण लै श्रीमंत आहोत असं फीलींग येतं. विकली की २-३ हजार रुपये पण असाच नफा होऊन जातो)

यु नो एवरीच्थिंग इब्लिस. मी सहज म्हंटलो. म्हणजे कामी महिन्यात जितका भाव वाढलाय तो रिटर्न कंटिन्यु राहू शकत नाही सारखा पण ओवर अ लाँग होरायजन डील फायद्यातच पडते.

पियू परी - बेच दो बेच दो ....

>> ते घेतलं की विकावं वाटत नाही हा सोन्याचा मोट्ठा प्रॉब्लेम आहे. +१०

जगण्यासाठी नक्की किती सोने आवश्यक/पुरेसे असते?>> कांद्याच्या भाववाढीबद्दल अशी चर्चा चालू असते तेव्हा काही धार्मिक मंडळी असे प्रश्न विचारतात. हौसेच कसल मोल करता हो!

Pages