सोन्याचा भाव पुन्हा वाढेल का?

Submitted by पियू on 10 July, 2013 - 09:35

प्रिय गुंतवणुकदार..

गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात जोरदार घसरण चालु आहे.

वेगवेगळ्या गुरुपुष्याच्या निमित्ताने वेळोवेळी सोन्यात केलेली गुंतवणुक वाया जाते की काय असे वाटु लागले आहे.

सोन्याचा भाव पुन्हा वधारेल का? पोर्टफोलिओची पार वाट लागली आहे.

मी खुप कमी रिस्क घेणारी व्यक्ती आहे म्हणुन सरधोपट सोन्यात पैसे गुंतवले. आता वाईट वाटते आहे.

तुम्हाला काय वाटते?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोने ही खरं तर Dead Investment आहे.. एकदा घेतलं की शक्यतो विकलं जात नाही.
असं म्हणताना २८०$ पासून १५००$ पर्यंत बघता बघता गेलं हे ही खरंच.
बरेच लोक 'परत कमी होईल का?' या आशेने बघत बसलेत..
तुम्ही 'परत वाढेल का?' या प्रश्नावर आहात.

आपल्याकडे एकदा वाढलेले दर परत कधीच कमी होत नाहीत.. या न्यायाने 'दर वाढेलही' फक्त गुंतवलेले पैसे , परत मिळतील तेव्हा त्या पैशाच्या किमतीचे काही सांगता येत नाही..

घाबरुन जाऊन विकलं तर अर्थातच नुकसान होईल. देसायनू म्हणतायत त्या प्रमाणे आता पर्यंत वाढतच आलय सोनंं.
भाव वर जाताना काय किंवा खाली जाताना काय, कुठेतरी ती गाडी पकडायची आणि त्यात समाधान मानायचे येवढच आपण करु शकतो.
भाव पडायला सुरवात झाली तेव्हा खरं तर हळू हळू घ्यायला सुरवात करायला पाहिजे, म्हणजे तेवढच कॉस्टचे अ‍ॅवरेजिंग होतं.

दिवाळी नंतर वाढण्याचे चांसेस जास्त आहे..

जागतिक बाजारात सोन्याची किंमत कमी आहे परंतु भारतात सोने खरेदीचा ओघ बघता भारतात इतके कमी होणार नाही ..परंतु गुंतवणुकीच्या दृष्टीने किमान दिवाळी ते पुढच्यावर्षीच्या जानेवारीपर्यंत वाट बघा..

चढ-उतार हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे...त्यामुळे जे चढले ते उतरणार आणि जे उतरले ते चढणार..हेही नैसर्गिक आहे...मात्र नेमके कधी काय होईल...ते सांगणे कठीण..म्हणून योग्य संधीची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती असते.

>>असं म्हणताना २८०$ पासून १५००$ पर्यंत बघता बघता गेलं हे ही खरंच.
बरेच लोक 'परत कमी होईल का?' या आशेने बघत बसलेत..>> +१

>>मी खुप कमी रिस्क घेणारी व्यक्ती आहे म्हणुन सरधोपट सोन्यात पैसे गुंतवले. >>

पियुपरी, सोनं ही कमोडिटी आहे. तेव्हा त्यात गुंतवणूक करताना रिस्क ही असणारच. हेज अगेन्ट इन्फ्लेशन म्हणून ५% सोनं पोर्टफोलिओत ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त सोन्यातील गुंतवणूक करणार असाल तर रिस्क गृहित धरावी.

This might be helpful "GOLD futures chart" - expect 6mths to 1 year or even 2 years for turn around. Think of it like turning a car running down the hill with the speed of 100km and no matter how strong the breaks are applied, it takes significant energy and time to bring it to a full stop.

No one can predict how far Gold will drop from current levels but it appears like any drop below $1000-$1100/oz will be very short lived, hence buying in small quantity when price is between $1000-$1300/oz might be wise.

Hope this helps... Happy

पडला पाहीजे चांगला पाचहजार पर्यंत

लोक भाजीपाला आणल्यासारखे किलो अर्ध किलो असं घेतिल मग . अन ३-४ मिन्टात परत वाढेल भाव.

सोनं हे डेड अ‍ॅसेट असंण्याबद्दल सहमत. मा. र्थमंत्र्यांनी विनंती करून देखील लोकं सोनं घे-घेतायत. जो पर्यंत सोन्याची हाव असणारी निर्बुद्ध भारतीय लोकं आहेत तो पर्यंत सोन्याला मरण नाही. त्याचे भाव नक्कीच वाढतील.

परवा सोनं खाली आल्यावर पुण्यातल्या एका बिल्डरने मित्राला २०० रुपये भाव जास्त सांगितला. कारण काय तर म्हणे, सोन्याचं काही खरं नाही. लोकं आता घरात गुंतवणुक करतील. :))

एका फायनान्स वाल्या मित्राने टिप दिली की २५ च्या आसपासच रहाणार अजुन कमी येणार नाही आणि २७च्या वरही जाणार नाही.

मला हौस आहे म्हणून मी घेते.. दागिने करायचा मुहुर्त नाही निघालाय अजुन. लेकीसाठी म्हणूनही घेते. तिलाही भयंकर हौस आहे सध्या तरी. गुंतवणूक म्हणून घेत नाही.

निर्बुद्ध म्हणा नाही तर काहिही म्हणा अजुनतरी भारतात लेकीसुनेला, नातवंडांना सोने, चांदी, दागिने द्यायची पद्धत आहे. ज्यांची तयारी नसते त्यांना ऐन वेळी भारी जड जातं.

त्यामुळे >> भाव वर जाताना काय किंवा खाली जाताना काय, कुठेतरी ती गाडी पकडायची आणि त्यात समाधान मानायचे येवढच आपण करु शकतो.
भाव पडायला सुरवात झाली तेव्हा खरं तर हळू हळू घ्यायला सुरवात करायला पाहिजे, म्हणजे तेवढच कॉस्टचे अ‍ॅवरेजिंग होतं.<< हे खरे.

जाईजुई, अनुमोदन.

पियु परी, सर्व अंडी एका बास्केटात ठेवू नये अशा अर्थाची एक म्हण आहे त्यानुसार तुमचा पोर्ट् फोलिओ मध्ये शेअर्स, म्युचुअल फंड्स, सोने, रिअल इस्टेट, इन्श्युअरन्स, फिक्ष डिपॉझिट्स, बचत पत्रे, बाँड्स हे सर्व हवे. योग्य प्रमाणात. इमर्जन्सी हार्ड कॅश हवी. नोकरी गेल्यास जगण्यासाठी ६ महिने पुरेल इतके तरी पैसे हताशी हवे. पेन्शन प्लान हवा. हे सर्व ऑप्शन्स कृपया एक्स्प्लोअर करावेत. आता परिस्थिती फार वाइट आहे. एका ऑप्शन ने काय होणार?

योगी... नमस्कार , बरेच दिवसा नी दर्शन झाले...... आपले उदा. एकदम पट्या..... लिन्क पण मस्त आहे.... ( अजुन तुम्ही परदेसी भाशेत कसे ? माय मराठित कसे नाही ? Uhoh )

जाईजुई ---हो हो मी पण हेच करते ...फक्त माझ्या मुलीला आवड नाही ...पण मी माझी हौस पुरवते..... मजा करो....... Happy Happy

इब्लिस....तुझ्या तोन्डात साखर, लाडु, इ इ इ इ सगळे पडो.... Happy Happy

सुहास्यः नमस्कार, अधुन मधून फेरी असते, आपण काय म्हणता! त्या वेळी इंग्रजी मधे लिहिणे सोयिचे होते म्हणुन तसे लिहिले, शेवटी कुठल्या भाशेत लिहिले ह्या पेक्षा दिलेली माहिति उपयुक्त आहे का हे जास्त महत्वाचे नाही का! Happy

Gold is good investment for indian people to hedge against depreciating rupees. Next year is election year so current account deficit will be high so rupee will depreciate faster

For peoples staying outside india, gold is commodity which lost it's charm. It was going down for more than 20 years then run for 10 years . Now it may go down for another 10 years. It will not be sharp fall but trend is downward.

लोक सोन्यात का गुंतवणूक करतात? त्यासारखे अन्य पर्याय जर त्यांना उपलब्ध झाले तर लोक तिकडे जातील. सोन्यात काळा पैसा मोठया प्रमाणात आहे.

नाही .
आता सोन्याचे भाव वधारणार नाहीत ... घसरत घसरत ...शुन्यावर येणार लवकरच .... अन त्या नंतर निगेटीव्ह ...अर्थात सोने बाळगल्या बद्दल टॅक्स द्यावा लागेल Proud

सोन हे insurance म्हणुन घेतल तर रेट कमी किंवा जास्त झाल्याने काही फरक पडत नाही.

जेव्हा जेव्हा Finacial difficulties येतात तेव्हा सरकार (Any country) नागरीकांना सोन बाळ्गू देत नाही(जप्त करतात). पण प्रतेक सरकारं सोन विकत घेत राहातात आणी सोन विकुन कजे उभी करतात.

http://www.mineweb.com/mineweb/media_stream/mineweb/1/146305/images/jp.jpg (USA)

लंड्नला १८०० शतकात ४० सोन्याचा नाण्याना एक घ्रर मिळायच ते आजुनही त्याच ४० नाण्याना मिळते.

Please think about difference between value and price. Price might go up or down which get calculated in currency but value remains same.

In Zimbabwe government strip 3 zeros from every once account in 1 weeks’ time, same thing happened in Argentina in 2001. (Paper currency is useless it is just a paper which can be devaluated, reprinted or destroyed at any time by any government.)

घाटपांडे साहेब, घर/फ्लॅट मध्ये सुद्धा काळा पैसा आहे. मग आता घर पण घ्यायचे नाही का? Lol तुम्ही आता दुसर्‍यांदा सरधोपट का काय म्हणतात ते विधान केलं आहे.

डीप सी, तुमचं लॉजिक कळलं नाही. सध्या करन्सी ही काही सोन्याचे नाणे नाहीयेत त्यामुळे ग्राहक म्हणून सोन्याचा भाव किती ह्याचा फरक पडतो. कारण आज घेतलेले सोने पुढे जास्त भावात विकता येइल ह्या करताच माणूस सोनं विकत घेतो. आता देशाची वाताहत झाली आणि त्या करन्सीला जरा काही वॅल्युच राहिली नाही तर काय ही खुप लांबची गोष्ट आहे.
सोन्याचा भाव आता पर्यंत वाढतच आला आहे म्हणजे पैशांमध्ये सोन्याचे मोल वाढत आले हे म्हणूनच लोकं अजूनही सोनं विकत घेतात.

DeepSea: >>> difference between value and price

I believe you wanted to say difference between "money and currency" and it is not easy for everyone to understand.

वैद्यबुवा, पियु: Please listen to this if you get time. जमल्यास त्या youtube channel वरिल बाकीचे काही videos सुद्धा जरूर बघा.

सोन्याचा भाव वाढेल ह्यात शंकाच नाहिये...
१. पण केव्हा वाढेल?
२. किति वाढेल?
३. वाढण्या आधी अजुन घसरेल का?
४. किति खाली जाण्याची शक्यता आहे?
अश्या प्रश्णांपेक्षा खालिल गोष्टींवर भर द्यावा...
१. भाव कश्यामूळे वाढू शकतो?
२. साधरण भाव वाढ किति प्रमाणात होउ शकते?
३. कालावधी किति मोठा असू शकतो?
४. मुळात २००१, २००३,२००६, २००९ पासून २०११ पर्यंत जी भाव वाढ झाली त्यात मला सहभागी होता आले का व त्याचा पुरेपुर फायदा करुन घेता आला का?

सोने financial insurance against time of need म्हणुन घेणे आणि २००१ ते २०११ मधे झालेल्या भाववाढीमुळे होणार्‍या फायद्या कडे बघता घेणे ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत व परिणाम सुद्धा भिन्न आहेत...

धन्यवाद योगी. बघेन तो विडियो. तू म्हणत आहेस ते मुद्दे माझ्यामते सोन्याकडे एक कमॉडिटी म्हणून बघणारे लोकं विचारात घेतात. बर्‍याच वेळा ही लोकं अग्रेसिव ट्रेडिंग ही करतात. खरं तर हे मुद्दे विचारात घेऊन सुद्धा कोणाला कितपत ह्याची बरोबर उत्तरं देता येतील?

पियुपरी म्हणतायत तशी लोकं म्हणजे आम जनता जी जमेल तसं सोनं खरेदी ठेवतात, पुढे गरज पडली की मोडायला. ती लोकं येवढं अनॅलिसिस करत नाहीत. आता सध्या भाव कमी झाल्यामुळे घाबरगुंडी उडणे सहाजिक आहे आणि त्या मुळे आताच संयम दाखवून, हिंमत ठेवून फक्त गप्प बसायची गरज आहे.
मार्केटच्या वर खाली हालचालींमध्ये गुंतून पडलं तर रात्रीची झोप उडेल (आम जनता पार्टीची).

भारतात काही स्वतंत्र अर्थव्यवस्था आहेत. सोने जमा करणे हा भारतीयांचा आवडता उद्योग. सरकार हा उद्योग करत नाही म्हणुन रुपया सारखा घसरतो.

मायबोलीवरील अर्थ तज्ञांनो. असा काही उपाय करता येईल का ? वैयक्तीक मालकीचे सोने सरकारकडे डिक्ल्यर करायचे आणि ते वैयक्तीक मालकीचेच राहील. अश्या डिक्ल्यर्ड सोन्यामुळे रुपया वधारेल का ?

नितिनचंद्र, रुपया हा "फियाट मनी" (Fiat Money) आहे. थोडक्यात त्याची वॅल्यू सरकारकडे/देशाकडे असलेल्या सोन्यावरुन ठरत नाही. पुर्वी गोल्ड स्टँडर्ड असताना सरकारला रुपया बॅक करायला तितकं सोनं ठेवावं लागायचं.
सध्याच्या रुपयाचा भाव बर्याच गोष्टींवर अवलंबून आहे. इंपोर्ट डिमाण्ड, इंट्रेस्ट दरांमध्ये वाढ वगैरे. उदाहरण द्यायचे झाले तर एक मार्ग म्हणजे भारतातल्या वस्तूंना भारताबाहेर जर मागणी वाढली तर त्या गोष्टी खरेदी करण्याकरता बाहेरच्या देशांना रुपयाची गरज पडेल. (भारतातली वस्तू खरेदी करायची तर भारतात चालते त्या करन्सी मध्ये पैसे चुकते करावे लागतील) जितकी ही गरज वाढेल तसा रुपयाचा भाव वाढेल. साध्या शब्दात इंपोर्टच्या तुलनेत एक्स्पोर्ट वाढले तर रुपया वधारेल.

इथे अनेक अर्थतज्ञ आहेत त्यांनी सोप्या सुटसुटीत भाषेत दहावीच्या मुलाची शिकवणी घ्यावी तसे काही गोष्टी समजावून सांगेल का?
१. किती रुपये छापायचे हे देश कसे ठरवतो.
२. डॉ च्या तुलनेत रुपया घसरतो म्हणजे नेमके काय होते?
३. सोने आणि रुपयाचे नाते.

नितीनचंद्रः आपल्याला वेळ मिळाला तर US financial history वाचावी. मी काही अर्थतज्ञ वगैरे नाहिये पण मझ्या माहितिनुसार until 1930 and later extended till 1970 (when gold standard was still in use) every $1 was backed by "x" amount of gold. तुम्ही म्हणता तसा पण थोड्या वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे व उत्तर हेच आहे की man-made currency has never lasted more than couple decades. Gold & Silver has always served as commodity which retains value over time and centuries and hence it is considered as "money".

In short, if government has a need to raise money then they will nationalize the commodity and force citizens to hand over their commodity reserves in exchange of paper money. Unfortunately, citizens cannot do anything and this has been proven in history over and over. Hence it is wise to diversify and take advantages of business cycles/economic cycles to increase your "wealth". BUT HOW CAN AN AVERAGE PERSON DO THIS!!! Rather can an average person do this? Ofcourse everyone cannot do this but it is NOT impossible. We can change financial future of our generations to come by making right choices at right time.

Do go through the link provided in one of the above post and you shall understand what I am referring to...

BTW, no reason to worry or be panic, you will have plenty of time to come up with a plan. As suggested, making right decisions at right time can make a BIG difference in financial future of your family. Investing in right assets can be one solution...

Good Luck! Happy

BTW, someone is going to pop a question:
1. if I am advocating buying tons of gold and silver and put it in a locker
2. Can we afford to have such a locker and what about safety
3. what about tax man or government, etc
4. blah blah blah
Please don't waste time in asking STUPID questions and will request you to stay focused to the TOPIC.

Pages