एका पेक्षा एक (अप्सरा आली)- पर्व ७ वे.

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 07:01

एका पेक्षा एक (अप्सरा आली)-पर्व ७ वे...

सचिन-महागुरु
पुष्कर श्रोत्री-सूत्रसंचालक
आणि सहभागी- श्रुती मराठे, मानसी नाईक....इत्यादी.

चर्चा करायची????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पहिला भाग पाहिला. सचिनचं बोलण गर्विष्ठ वाटत......तो जज आहे कि, सूत्रसंचालक आहे तेच कळत नाही मला. कित्ती बोलतो तो.....पुष्करपेक्षा जास्त!

'सचिन' सोडला तर बाकी सगळे बघणेबल असते असे एक मत!>>>>>>>>+१ आणि सचिनचं आणि पुष्करच बोलणं सोडलं तर सगळं ऐकणेबल Happy

मानसी नाईक खरंच अप्सरा आहे. प्रोमोज मधे एक लावण्य कि सौंदर्यवती मानेच्या ज्या काही हालचाली करते ते पाहून करमणूक होते. सचिन महागुरू, न्यायाधिश, सूत्रसंचालक, निर्माता, दिग्दर्शक आणि हितचिंतक या सर्व भूमिका एकाच वेळी आर पाडत असल्याने आणि टाळ्याखाऊ वाक्यं टाकून पॉज घेत असल्याने सौंदर्य / लावण्याचा आस्वाद घेता नाही येणार. आमरसात कुणीतरी बदाबद मीठ ओतल्यासारखं वाटेल..

बाप रे सहज म्हणून बघण्याचा प्रयत्न केला. पण महागुरू एकत नाहीत. केवढे बोलतात तेही छापील.
अक्षरशः असह्य दळण. चॅनल बदललं. मग टीव्हीच बन्द केला.

विदिपा Lol झी मराठी वाले सुधारणार नाहीत. सर्व टीकाकारांच्या नाकावर टिच्चून महागुरु प्रकरण दर सिझनला आणतातच!! कालचे पुष्कर आणि महागुरुचे संवाद, मसाह फेम अभिलाषा- दिप्ती केतकरचे आठवत आठवत संवाद म्हणणे, मधेच भावनिक होऊन रडणे... सगळा खोटारडेपणा- नाटकीपणा.. सचिनपण मुद्दाम जास्तच मोठेपणाचा आव आणायला लागलाय. 'मला पहा अन फुले वहा' असला प्रकार आहे सगळा!

मानसी नाईक आणि मिताली जगताप चा प्रोमो पाहिला. बास. आता अजुन त्यांचे नाच, म्हागुरु, बावळट पुष्कर आणि इतर अप्सरा का लावण्या बघायची इच्छा नाही. त्यात साबा पण इथे नाहीत म्हणजे मजबुरीने बघणं पण नाही. हुश्श. Happy

एकापेक्षा एक लावणीचे बहारदार नृत्य बघायला मिळेल अशी अपेक्षा पहिल्या भागात होती. कालचा भाग असह्य असाच होता. पहिलं नृत्य कोणत्या गृपने करायचं म्हणून सौंदर्यवती आणि लावण्यवतीचं ते नाटकी (स्क्रीप्टप्रमाणे) भांडन. सचिन तर जसा काही जगद्विख्यात अभिनेत्याप्रमाणे वावरत होता की जगभर सर्व वाहिन्या एवढा एकच कार्यक्रम दाखवत आहे, काय त्याचे बोलणे, काय तो सुत्रसंचलन करणारा. अरारा...पार वाट लागली कार्यक्रमाची.
नृत्य करणा-या लावण्यवतीचं पहिलं नृत्य पाहुन मी पटकन चायनल बदललं...दुसरं नृत्य पाहिलं आणि कार्यक्रम पाहणं सोडून दिलं. Sad

-दिलीप बिरुटे

सचिनला टीका ऐकून चेव आलाय बहुतेक... पठ्ठ्या शांत होण्यापेक्षा आधीपेक्षा जास्त आगाऊ झालाय.. हा सिझन सहन होण्यापलिकडचा आहे. पाहिला जाईल असे वाटत नाही.

धन्यवाद आबासाहेब. मानसी नाईक च्या आडनावामुळे गोंधळ व्हायचा. तेच म्हटलं इतका आमूलाग्र बदल कसा झाला ? टिपरेकन्या आपल्याच घरातली वाटायची

शि-याच्या बहीणीचं खरं नाव काय आहे >> बहुतेक रेश्मा नाईक , सिरिअल चालु असतानाच बहुदा लग्न जाह्ले आणि परदेशी गेली.

गंगाधर टिपरे मधल्या शि-याच्या बहीणीचं खरं नाव काय आहे ? >> रेश्मा नाईक

सचिनचं बोलण गर्विष्ठ वाटत......तो जज आहे कि, सूत्रसंचालक आहे तेच कळत नाही मला. कित्ती बोलतो तो>>+१ डोक्यात जातो तो!
काही नाच(झटके) तर अजिबात बघवत नाही.....तसेच ती गाणी पण कधी ऐकलेली नसतात.

त्यामुळेच मी तो कार्यक्रम पाहत नाही. सचिन स्वतःला अमिताभ बच्चन पेक्षा सिनिअर समजतो. मागे एकदा आयडियाची कल्पना या सिनेमाच्या वेळी मुलाखत घेतली होती. फारच फुशारकी मारत होता. तसेही त्याचे ते अप्सरा आली मधले मग्रुरीचे बोलणे आणि मुद्दामहून अहो जाहो करणे डोक्यात जाते. सचिनचा मग्रूरपणा कुणी ऐकायला तयार नसेल म्हणून त्यांनी पुष्कर श्रोत्री सारख्या चम्पूला घेतले असावे. पहिलीच्या मुलालाही कळेल अशी नाटकीय भांडणे पाहून वैताग आला. Angry

मधुरा, हा धागा उघडतांना तो नवीन लेखनाचा धागा म्हणून उघडलास की नवीन गप्पांचं पान म्हणून? गप्पांचं पान म्हणून उघडला असशील, तर पुन्हा राधा ही बावरी सारखेच हे वाहते पान असेल जे तुला अ‍ॅडमीनकरवी पुन्हा वाहायचे बंद करुन घ्यावे लागेल. (अर्थात तुला तसे करायचे असल्यास.)

त्यात साबा पण इथे नाहीत म्हणजे मजबुरीने बघणं पण नाही. हुश्श.>>>>>'साबा' म्हणजे काय?

बाकी , सर्वांनाच अनुमोदन..... सचिन फारच आरेरावीत बोलतो राव!

@सानी, हा धागा या वेळी काळजीपूर्वक लेखनाचा धागा म्हणूनच उघडला आहे, चिंता नसावी.

सचिन हा स्वताच स्वताचे, पुष्करचे आणि सर्व स्पर्धक्/कोरीओग्राफरचे स्क्रीप्ट लिहतो अशी माझी ठाम खात्री आहे... नाहीतर इतके अजीर्ण कौतुक कोण कोणाचे करील?

मिताली जगताप??? ह्या शो मधे? काय कारण?
(अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे ना तिला?)

बाकी इतर जज कोण आहेत? फुलवा वगैरे का?

Pages