पुण्यात घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची उत्तम दुकाने

Submitted by हर्ट on 2 July, 2013 - 00:17

नमस्कार, मला माझ्या नवीन घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची खरेदी करायची आहे. साधारणः

१) सोफा सेट
२) टी पॉय
३) डायनिंग टेबल
४) सिंगल्/डबल बेड आणि त्यावरच्या गाद्या.
५) कपडे ठेवायला कपाट
६) पुस्तक ठेवायला कपाट
७) लॅपटॉप ठेवायला टेबल आणि खुर्ची
८) चप्पल बुट ठेवायचे रॅक
९) किचनमधले कपाट

हे सर्व नीट कुठे मिळेल अथवा चांगल आणि लवकर करुन कोण देईल?

साधस पण छानस लाकडी फर्निचर हव आहे.

एक विचारायच आहे की डायनिंग टेबल काचेचा बरा की पुर्णतः लाकडी बरा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बावधन जवळ हायवे ला लागुन होम्-डोअर (की इन्डोअर) नावाचे प्रशस्थ दुकान आहे. बर्याच व्हरायटीज. बाहेरुन बघितले तर वाटले महाग असेल पण कींमती तेवढ्या नव्हत्या. आम्ही १ डायनींग टेबल घेतले. ३ महीन्यानंतर खुर्चीचा १ पाय हलु लागला, त्यांना फोन केला तर दुसर्या दिवशी खुर्ची रीप्लेस करुन दीली

रेडीमेड फर्निचर एमडीएफ बोर्डच्या स्वरूपातलं असेल तर पुन्हा एकदा विचार करा. काही वर्षांनी ब्रॅकेटस खिळखिळे होतात. जमिनीच्या उताराप्रमाणे फर्निचरची अलाइनमेंट बिघडते. दारं उतरतात असा अनुभव आहे. प्लायवूडचं फर्निचर याबाबतीत चांगलं वाटतं. राजस्थानी सुतारांची वर्कमनशिप सुपर्ब आहे. पण ओळखीचा असलेला बरा, नाहीतर या लोकांचं काही खरं नसतं. आर्किटेक्ट / चांगल्या डिझायनरला रहायला यायच्या आधी एक दोन महीने फ्लॅट ताब्यात दिला तर चांगलं फर्निचर बनतं. एकतर ते लोक आधीच स्केचेस किंवा हल्ली सॉलीड मॉडेल्स तुम्हाला दाखवतात. त्यात तुम्हाला ब-यापैकी कल्पना येऊन जाते. पूर्वी डीटेल आर्किटेक्ट ही सेवा द्यायचे. पण सध्या त्यांच्याकडचा वर्कलोड पाहता आता शंका वाटते. मात्र तुम्हाला चांगला माणूस ते नक्कीच देऊ शकतील. तुमच्या ओळखीतच कुणी असल्यास क्या कहने !

मायबोलीवर उद्योजक बाफवर पुण्यातील दोन-तीन आर्किटेक्ट/ इंटिरियर डेकोरेटरच्या मुलाखती आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे फोटोही तिकडे डकवलेले आहेत.

आर्किटेक्ट / चांगल्या डिझायनरला रहायला यायच्या आधी एक दोन महीने फ्लॅट ताब्यात दिला तर चांगलं फर्निचर बनतं. एकतर ते लोक आधीच स्केचेस किंवा हल्ली सॉलीड मॉडेल्स तुम्हाला दाखवतात. >>> हो हे माहीत आहे आणि तेही करायचेच आहे. मात्र आम्हाला राहत्या घरातच इंटिरियर करायचे आहे. असे वॉल टू वॉल वॉर्डरोब्ज आमच्या ओळखीत अजूनही एकदोघांनी बनवून घेतले. त्यांचा अनुभव चांगला आहे पण त्यातले कुणीच पुण्यातले नाही.

मंजूडी, वाचते Happy

अगो, पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये लाईफस्टाईल नावाची फर्निचरची फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे बनवून मिळू शकेल. आणि ते तुम्हाला पाहिजे असल्यास रेग्युलर प्लायमध्येही काम करुन देतात. एमडीएफ मध्ये तर देतातच.

शक्यतो एमडीएफ वापरु नका.. किरण्यके नी सांगितल्याप्रमाणे त्याची दारं खिळखिळी होतात..

बाजीराव रोडवरुन बदामी हौदाकडे जाताना बालाजी फर्निचर म्हणून एक दुकान आहे ते ही पाहिजे त्या स्पेसिफिकेशन मध्ये फर्निचर बनवून देतात.

बाकी मॉल टाईप फर्निचरची भरपूर दुकाने आहेत पण ते स्वत:चे काहीच बनवत नाहीत.. फक्त असेंब्ली करुन विकतात. आणि ते बहुतांशी एमडीएफ मध्येच बनवलेले असते. स्वस्त आणि थोडेफार टिकाऊ.. प्लायवूड मधले फर्निचर थोडेसे महाग पडते पण नक्कीच टिकाऊ असते. तुमची अपेक्षा कशी आहे त्यानुसार ठरवा.

पुण्यात फर्निचरची डिलीव्हरी देताना दुकानदाराला नीट विचारुन घ्यावे. होम डिलीव्हरी व डोअर डिलीव्हरी यामध्ये फरक असतो (चार्जेस पण वेगळे लावतात). नव्याने पुण्यात आलेल्यांना फरक लक्शात येत नाही.
होम डिलीव्हरी म्हणजे फक्त बिल्डींगच्या खाली फर्निचर आणुन देतात ... दरवाज्यापर्यंत नाही. स्वानुभव. होम डिलीव्हरी म्हणुन आम्ही बिन्धास्त राहीलो आणी मग वेळेवर दरवाज्यात पोहोचवायचे असल्यास वेगळे चार्जेस दयावे लागतील असे सांगीतले.

होम डिलीव्हरी व डोअर डिलीव्हरी यामध्ये फरक असतो (चार्जेस पण वेगळे लावतात)
<<
लै भारी! याला म्हणतात पुणेरी भामटेगिरी.

prr गंडवलं की हो तुम्हाला.. घरपोच डिलीव्हरी मध्ये घरात वस्तू जागेवर ठेवण्यापर्यंत काम करतात.. आणि हे दुकानातून निघतानाच स्पष्ट करून घ्यायचे असते..

नाय नाय मगरपट्टा मध्ये "मगरपट्टा स्पेशल डोअर डिलिवरी" service "hire" करावी लागते म्हणे .... नो सर्वीस एलेवेटर

मला इतका वेळ नाही आहे की हे सर्व काम सुताराकडून करुन घेईन. माझ्या पुतणीचे २१ जुलै पासून ऐम्बीएचे वर्ग सुरु होतील. तिला सिंहगड बी स्कूलमधे प्रवेश मिळाला. म्हणून रेडीमेड फर्चिचर घेण्याखेरीज माझ्याकडे अन्य पर्याय नाही. मी माझ्या अकोल्याचा घरी तेंव्हा खूप उत्साह शक्ती खर्च केली. सगळ्या लाकडी वस्तू बनवून घेतल्यात. अकोल्यातून पुण्यात इतक्या जड लाकडी वस्तू आणणे मला जरा जास्त मेहनतीचे वाटते. थोड्या किरकोळ वस्तू आणू पण घाऊक वस्तू इथेच विकत घेउ.

म्हणून आयते फर्निचर जे उत्तम असेल, वापरायला चांगले असेल, किमतीला वाजवी असेल, लवकर मिळेल असे दुकान सुचवा.

घरात सिलीम्ग पन्खे आणायचे आहे. ते कुठे मिळतील?

पडदे कुठे मिळतील?

हे सर्व लिहा.
धन्यवाद.

किरण,

धन्यवाद.

अकोल्यात मला एकशे बढकर एक दुकाने माहिती आहेत ह्या सगळ्यांसाठी. नवख्या मराठमोळी शहरात केवढा वेळ जातो आहे हे सगळ करायला. धन्यवाद मायबोलीचे पटकन चौकशी करुन होते.

आज तर पुण्याच्या बॅक ऑफ ईंडियानी हद्द केली. आईच्या खात्यातून पैसे काढायचे होते. मग त्यांना चेक दिला. चेकवर आईचा अंगठा चालत नाही म्हणाले. मग चेकबुक दिलेच कशाला? बर स्लिप भरुन पैसे काढायचे म्हटले तर म्हणाले जर चेकबुक जवळ असेल तर स्लिप भरता येत नाही. मग ??? आता चेक पण चालत नाही. स्लिप पण घेत नाही. तर पैसे कसे काढायचे? तर म्हणाले अकोल्याला जा. जिथे चेकबुक मिळाले तिथेच पैसे काढा.

धन्य!!!!!!

Normally For Thumb print account holders, home branch withdrawal rule is followed by all the banks. It's a security measure in place for the benefit of illeterate account holder. Usually, in-person presence of a/c holder with id n address proof can be demanded.

मी माझ्या घरातले हॉलचे फर्निचर निर्मितीमधून मेड टू ऑर्डर बनवून घेतलेय, किचनचे फर्निचर राजस्थानी सुताराकडून करुन घेतलय आणि बेडरुमचे बिबवेवाडीतल्या "योगेश फर्निचर" कडून मेड टू ऑर्डर बनवून घेतलय!
आज ५ वर्षानंतरही सगळेच फर्निचर अगदी नव्यासारखे आहे... किचनच्या ट्रॉलीजचे काही हॅन्डल्स निघालेत पण तेव्ह्ढेच.... बाकी सगळे अगदी उत्तम आहे
हॉलमध्ये २ सेटी, २ मोडे, आणि एक सेंटर आणि एक कॉर्नर टेबल डिझाइन/पॉलिश वगैरे सिलेक्ट करुन बनवून घेतले निर्मितीमधून पण नंतर त्याला मॅच होईल/शोभून दिसेल असे टीव्ही कॅबिनेट्च मिळेना कुठेच... मग परत निर्मितीवाल्याला डिझाइन काढून देउन सेम मटेरिअल आणि पॉलिशमध्ये बनवून घेतले... निर्मिती जरा महाग आहे पण दर्जा अतिउत्तम आहे Happy
त्याच्याकडचा बेडरुमचा सेट जरा आउट ऑफ बजेट जात होता म्हणून एका मित्राने सुचवलेल्या बिबवेवाडीतल्या योगेश फर्निचरकडे चौकशी केली तर त्याने अगदी रास्त भावात कस्टमाइझ वॉर्डरोब्ज बनवून दिले आणि त्याच्याकडून घेतलेला हाय्ड्रोलिक बेडपण खुपच सोयीचा आहे... अगदी दोन बोटाच्या जोरावर पण वरचा फ्लॅप उचलू शकतो आणि आत पुरेश्या गाद्या/उश्या/पांघरुणे मावूनसुद्धा सटरफटर गोष्टींसाठी बरीच जागा मिळालीय
एकंदरीत माझा विकतच्या फर्निचरबाबत अनुभव चांगला आहे पण अर्थात इंच इंच जागा लढवायची असेल आणि कल्पक डिझायनर दिमतीला असेल तर बनवुन घ्यायचा पण विचार करु शकता

हाउसफुल्ल मात्र क्वालिटी फारशी चांगली नाहीये म्हणे.... थोड्या दिवसाने पावडर पडायला लागती म्हणे!

सातार्‍याला VR म्हणून एक मस्त शोरुम आहे... पुण्यापेक्षा खुप स्वस्त आहे फर्निचर आणि प्रचंड व्हरायटी आहे... ते पुण्यात पण डिलीव्हरी देतात पण ऑक्ट्रॉय वगैरे भरावा लागतो म्हणे!

होम डिलीव्हरी व डोअर डिलीव्हरी यामध्ये फरक असतो (चार्जेस पण वेगळे लावतात)
<<
लै भारी! याला म्हणतात पुणेरी भामटेगिरी.

>>> खरयं!

आम्हाला असा अनुभव आला आहे. बाजीराव रोडवर एका दुकानात चौकशी केली तेव्हा मालकांनी सांगितले आम्ही होम डिलिव्हरी म्हणजे बिल्डिंगच्या इथे आणून देऊ. वरच्या मजल्यावर घर असतील तर आधीच सांगा, वेगळे चार्जेस पडतील!

बी, एक सांगावेसे वाटते. कुठूनही घे फर्निचर पण बाजीराव रोडवरच्या टिपिकल पुणेरी दुकांनांमधून घेऊ नको. ऑप्शन्स फार कमी असतात पण जे आहे ते कसे अत्त्युच्य दर्जाचे वगैरे ऐकवतात. शिवाय घरी येण्याची २५०-३०० रु फी आधीच घेतात. मग तुम्ही त्यांना ऑर्डर दिली नाही की गेले पैसे वाया!

Hatti Ganpati javal Metal Art navache dukan ahe. Tithe sarv furniture powder coated iron che milate. Best quality, superb service, affofdable prices. Hydrolic bed an dining table tithunach ghetale.
Housefull an bajirao road chya nadala lagu naka.

prr गंडवलं की हो तुम्हाला.. घरपोच घरात मध्ये घरात वस्तू जागेवर ठेवण्यापर्यंत काम करतात.. आणि हे दुकानातून निघतानाच स्पष्ट करून घ्यायचे असते.>>>
हिम्सकूल असेल हं....नवखा आहे अस दिसल्यास लोक गंडवतातच.
दुकानातून निघताना होम डिलीव्हरी एवढेच सांगितले होते. बाकी काही बोलला नाही दुकानदार.
मुंबईत होम डिलीव्हरी म्हणजे घरपोच डिलीव्हरी. डोअर डिलीव्हरी हा नविन प्रकार पुण्यातच कळला.

घरी येण्याची २५०-३०० रु फी आधीच घेतात. मग तुम्ही त्यांना ऑर्डर दिली नाही की गेले पैसे वाया! >>>
माधवी +१

बी ही लिंक बघ. आमचा चांगलाच अनूभव आहे. लाकडी असले तरी फर्निचर उत्तम व टिकाऊ आहे. दोन्ही पावसाळ्यात काही प्रॉब्लेम नाही, लाकुड फुगणे वगैरे पण काही नाही.

http://www.damroindia.com/

पुण्यात शाखा आहेतच. गोदरेजचे पण छान आहेत, पण अव्वाच्या सव्वा भाव काढतात. गोदरेज नाम काफी आहे.

निर्मिती जरा महाग आहे पण दर्जा अतिउत्तम आहे +११
Book rack, side tables वैगरे mdf च्या चालतील
पण जिथे कुठे पाणी आहे तिथे solid wood च वापरा किंवा steel, rot iron, artificial leather वापरा mdf अजिबात नको .

<आज तर पुण्याच्या बॅक ऑफ ईंडियानी हद्द केली. आईच्या खात्यातून पैसे काढायचे होते. मग त्यांना चेक दिला. चेकवर आईचा अंगठा चालत नाही म्हणाले. मग चेकबुक दिलेच कशाला? बर स्लिप भरुन पैसे काढायचे म्हटले तर म्हणाले जर चेकबुक जवळ असेल तर स्लिप भरता येत नाही. मग ??? आता चेक पण चालत नाही. स्लिप पण घेत नाही. तर पैसे कसे काढायचे? तर म्हणाले अकोल्याला जा. जिथे चेकबुक मिळाले तिथेच पैसे काढ>

सही पडताळून पाहता येते तसंच आंगठ्याचा ठसा पडताळून पाहायचं तंत्र बँकांकडे नसावं. अंगठा उमटवणार्‍या खातेधारकाला पैसे काढायला बँकेत हजर रहावं लागतं. बँकेचे अधिकारी त्या/तिची ओळख पटवून पैसे देतात. नहीतर अशा अंगठेबहाद्दर खातेधारकाचे पैसे कोणीही काढून घेणार नाही का?

Book rack ला mdf वापरत नाहीत. ते थोडे दिवसातच वजनाने वाकडे होतात.
जिथे कुठे पाणी आहे तिथे solid wood >> नाही. मरिन प्लाय वापरा. लाकुडही फुगते पाण्यात. मरिनप्लायला काही होत नाही. मरिनप्लाय वापरताना बहुतेक बनवुनच घ्यावे लागेल ( जसे किचनचे खालचे कॅबिनेट्स, बाथरुममधले कॅबिनेट्स, भिंती गळतात की नाही हे नक्की माहित नसल्यास भिंतीत फिक्स केलेले वॉल युनिट्स पण )
सुताराने प्लाय आणल्यावर त्यावर मरिन प्लाय असे स्पष्ट लिहीलेले असते ते बघुन घ्यावे.

बंद कपाटांचे मॉड्युलर किचन दिसायला व्यवस्थित दिसते पण हे डिझाइन अमेरिका युरोप साठी बरोबर आहे. आपल्या इथल्या दमट ह्वामानात ह्या बंद कपाटात लगेच झुरळे होतात. तरी बी तू काही ओपन कपाटे किचन मध्ये ठेव. स्वयंपाकाच्या ओट्यावर काही कॅबिनेट्स लागतील. व अगदी हाताशी रोजच्या वस्तू ठेवण्याची सोय लागेल.

तसेच फर्निचर बरोबरच घरात कुठे काय अडकवायचे आहे ते आपल्या सवयी प्रमाणॅ ठरवून सुताराकडून खिळे हुक्स इत्यादी मारून घ्यावेत. ते नंतर ( कलरिन्ग झाले कि) होत नाही. व भिंत खराब होते.

बंद कपाटांचे मॉड्युलर किचन दिसायला व्यवस्थित दिसते पण हे डिझाइन अमेरिका युरोप साठी बरोबर आहे. आपल्या इथल्या दमट ह्वामानात ह्या बंद कपाटात लगेच झुरळे होतात. तरी बी तू काही ओपन कपाटे किचन मध्ये ठेव. स्वयंपाकाच्या ओट्यावर काही कॅबिनेट्स लागतील. व अगदी हाताशी रोजच्या वस्तू ठेवण्याची सोय लागेल. <<<
येस्स... दिसायला गोंडस दिसतं ते मॉड्युलर पण दृष्टीआड जी काय सृष्टी अवतरत असते ते भयंकर...

कपड्यांची कपाटे, वॉर्डरोब्जसाठी मी अजूनही लोखंडी कपाटेच प्रीफर करेन. लुकचा वगैरे प्रश्न असेल तर गोदरेज इंटिरिओचे एकदम मस्त दिसणारे वॉर्डरोब्ज पण आहेत. आणि गोदरेजची कपाटे म्हणजे क्वालिटीचा प्रश्न नाहीच.

किंवा दुसरा उपाय म्हणजे भिंतीला आतून टाइल्स/ फरश्या लावून घ्यायच्या. कडाप्पा किंवा ग्रॅनाइटच्या फळ्या आपल्याला जसे कप्पे हवेत तश्या प्रकारे भिंतीत बसवून घ्यायच्या. कडाप्पा किंवा ग्रॅनाइटचीच फ्रेम बसवून घ्यायची फरशी ते माळा/ सीलिंग अशी. आणि वरून फायबरची स्लायडिंग किंवा फोल्डींग डोअर्स बसवायची. एकदम बेस्ट. त्यात हवंतर लोखंडी तिजोरी फिट करून घ्यायची दिसणार नाही अशी.
स्वच्छतेसाठी उत्तम. किडे वगैरे व्हायला वाव कमी.
माझे स्वतःचे घर होईल तेव्हा वॉर्डरोब असाच करायचा विचार आहे.

Pages