पुण्यात घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची उत्तम दुकाने

Submitted by हर्ट on 2 July, 2013 - 00:17

नमस्कार, मला माझ्या नवीन घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची खरेदी करायची आहे. साधारणः

१) सोफा सेट
२) टी पॉय
३) डायनिंग टेबल
४) सिंगल्/डबल बेड आणि त्यावरच्या गाद्या.
५) कपडे ठेवायला कपाट
६) पुस्तक ठेवायला कपाट
७) लॅपटॉप ठेवायला टेबल आणि खुर्ची
८) चप्पल बुट ठेवायचे रॅक
९) किचनमधले कपाट

हे सर्व नीट कुठे मिळेल अथवा चांगल आणि लवकर करुन कोण देईल?

साधस पण छानस लाकडी फर्निचर हव आहे.

एक विचारायच आहे की डायनिंग टेबल काचेचा बरा की पुर्णतः लाकडी बरा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,
पुण्यात 'हाऊसफुल' नामक दुकान आहे. सिंहगड रस्ता, औंध इथे त्यांच्या शाखा आहेत. तिथे तुला हे सगळं मिळेल. ते बरेचदा मोठी सूटही देतात.

देव्हारा? टीव्ही कॅबिनेट? का टीव्ही वॉल माउंट करायचा आहे? बीन बॅग? बारकी सारकी टेबलं? जबाँग .कॉम वर मस्त स्टफ आहे. होम डिलिवरी असते. थोडा वेळ लागतो. सॉफ्ट फर्निशिन्ग साठी
फॅब फर्निश्.कॉम. काही फर्निचर केन चे घेता येइल.

आम्ही हाऊसफुलमधे जाऊन आलो. अत्यंत बकवास माल आहे. हात लावल्यावर लगेच समजतं ते किती तकलादू प्रकार आहे ते. स्वस्त आहे म्हणून घ्यायला गेलो तर पैसे बुडण्याची खात्री Sad

नितीन कॉटन इंडस्ट्रीज म्हणून हडपसरला दुकान आहे. त्यांचाच कारखाना आहे. तिथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

पुढील पर्यायांकडेही लक्ष द्यावे.

http://www.stylespafurniture.com

http://www.godrejinterio.com/

http://www.pvcdoorsandwindows.com

http://www.sleekworld.com/

http://www.ekbotefurniture.com/

शिवाय अनेक खाजगी सुतार देखील तुम्हाला मदत करु शकतील.

बी
प्रत्येकाची गरज निराळी. तयार फर्निचर कितीही महाग असलं तरी त्यात प्रॉब्लेम्स येतात. याउलट गरजेप्रमाणे स्वतः बनवून घेतलेलं फर्निचर महाग पडलं तरी केव्हाही चांगलं. साधंच हव असल्यास दोन चार् लोकांना विचारून त्याच भागातला सुतार पहा. नाहीतर आर्किटेक्ट / इंटीरीयर डिझायनरला फर्निचर डिझाइन करायला सांगावे..

हो,आणि त्याआधी परत वास्तूशास्त्र वाचून पहा.
कारण त्यांचे परत बेड कसा असावा,कुठे ठेवावा ,डोक्याची बाजू कुठली असले सतरा नियम असतात.
नाहीतर मग परत विकत घेतलेल्या/बनविलेल्या फर्निचरमध्ये बदल कसा करावा त्याचा धागा काढावा लागेल!

नाहीतर मग परत विकत घेतलेल्या/बनविलेल्या फर्निचरमध्ये बदल कसा करावा त्याचा धागा काढावा लागेल! >>

घरातल्या भिंती पाडणे, लिफ्ट - जिन्याकडे उघडणारा दरवाजा बंद करून तो व्हरांड्यात काढणे - त्याला लोखंडी जिना बसवणे असे अनेक उपाय असताना फर्निचरमधे कशाला बदल करायचा ?

डायनिंग टेबल लाकडीच बरे! काचेचे घेतल्यास कप किंवा ग्लास ठेवताना हमखास अंतराचे अंदाज चुकतात

काचेचे घेतल्यास कप किंवा ग्लास ठेवताना हमखास अंतराचे अंदाज चुकतात
>>>

ते ग्लासात (व ग्लासातले पोटात) किती गेले आहे त्यावर अवलंबून असते - लाकूड किंवा काचेवर नाही ना?

टण्या, Happy

बी, फर्निचर बनवताना लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बघूनच बनवून घे. टोकदार कडा-कोपरा असलेले फर्निचर बनवू नकोस. किचन फर्निचर घरामधली जी व्यक्ती किचनमधे जास्त वेळ काम करेन तिच्या सोयीने आणि मताने बनव (ओट्याची उंची वगैरे साठीदेखील हा मुद्दा विचारात घे) बिल्डर मोड्युलर किचन बनवून देत आहे का? देत असल्यास किचनमधे कपाटाची कशी आणि किती आवश्यकता आहे ते आधी बघून घे.

पुस्तकासाठी कपाट बनवच, पण एकंदरीत तुझे वाचन बघता तुला कपाट पुरेलसे वाटत नाही, त्यामुळे तीन चार ट्रंकापण विकत घे. त्यात पुस्तके नीट राहतात आणि ट्रंका एकमेकांना जोडून त्यावर मऊ गादी घातली तर छान बैठक तयार होते.

बी छान धागा.
मला पण पिल्लुच्या रुम मधे तिच्यासाठी एक कपाट आणि टेबल बनवुन घ्यायचे आहे.

'हाऊसफुल' स्वस्त आहेत, मात्र क्वालिटीबद्दल जरा प्रॉब्लेमच असावा. तू स्वतः बघूनच काय ते ठरवू शकशील.

स्वतः राहत नसल्यास, किंवा फर्निचर बनवून घ्यायला वेळ नसला, तर 'बनवून' घेण्याच्या भानगडीत पडू नये. एकतर मुळात बनवून घेणं महाग जातं, शिवाय मुकादम / आर्किटेक्ट नेमावे लागतात. इतकं करूनही स्वतःच्या मनासारखं होईलच याची खात्री नाही. आणि साधारण १००० स्क्वे.फु. च्या घरासाठी कितीही घाई केली तरी २-३ महिने सहज जातात.

रेडिमेड फर्निचर काही ठिकाणी कस्टमाईज्ड स्वरूपातही मिळतं. शिवाय रेडी फर्निचर हे आकर्षक, शार्प कर्व्ह्ज आणि कॉर्नर्स नसलेलं असतं. ते सहज शिफ्टही करता येतं.

कात्रज-सासवड मार्गावर कोंढव्याच्या पुढे 'ट्रेंड्झ फर्निचर व्हिलेज' आहे. तिथं वर लिहिलेलं सारं काही मिळेल. स्टायलिश आणि साधं, या दोन्ही प्रकारांत, शिवाय आधुनिकही. शिवाय फर्निशिंग, फ्रेम्स, व्हासेस, लँप्स, शेड्स इ. देखील. ऑर्डर आणि पेमेंट केल्यावर दोन दिवसांत सारं घर फर्निश होईल. सारं फर्निचर 'डिसमँटल-कॅरी-इन्स्टॉल' प्रकारातलं आहे. आणि गुणवत्तेबद्दल माझा स्वतःचा अनुभव खूप चांगला आहे.

मी जेंव्हा साळुंके विहार मधे रहायचो तिथल्या मालकिण बाई साझ अगरवाल ह्या कशाच्याही फार फार शौकीन होत्या. त्यांच्याकडे चार पायांच एक सिंगल बेड होत. आणि त्या बेडखाली अजून एक पायनसलेला बेड होता. तो सहज आत बाहेर ओढल्या जायचा. त्या बेडला चेंडुच्या आकाराचे चार स्लेज (चाक) होती. जशी मुव्हींग चेअर्सला असतात. तसे एकाखाली एक बसणारे बेड कुठे मिळतात?

राजसी, घर माझच आहे.

बी,
तुल हवा तसा पलंग लॉ कॉलेज रस्त्यावरच्या 'निर्मिती'मध्ये आहे. शिवाय इशान्य मॉलातल्या एकदोन दुकानांमध्येही पाहिला होता.

एकबोटे मधेही एकाखाली एक जाणारा बेड मिळेल. आमच्याकडे आहे, त्याला चाकं नाहित, पायच आहेत.

या बी ला कित्ती प्रश्न पडतात नै?>> तरी मी घराच्या बीबी मध्येच लिहिलं होतं ह्याला आताच फर्निचरची माहिती इथेच सांगु म्हणुन. Wink

बी बेस्ट ऑफ लक.

बनवुन घेशील तर मनस्ताप आहे. स्वानुभव आहे.
काम मजबुत होतं पण मटेरिअल मध्ये प्रचंड फसवणुक, कैच्या कै भाव लावतात.
घोळ घालु शकतात. त्यांच्या मागे लागावं लागतं काम वेळेत होण्यासाठी.
चिडचिड होते उगीच//

रेडीमेड बघ. पण क्वालिटी उत्तमच घे.
मोजक्याच वस्तु पण मनासारख्या घे.
हाउसफुल क्वालिटी फारशी चांगली नाहिये.

तसे टेलेस्कोपिक बेड्स किंवा सोफा कम बेड्स सगळीकडे मिळतात.

'निर्मिती' आधी जरा महाग असायचं. आता कल्पना नाही. सिंहगड रस्त्यावरही आहे वाटतं पानमळ्याजवळ.

ईशान्य मॉल (येरवडा-विमाननगर) हा फर्निचर-फर्निशिंग-स्पेशालिटी मॉल आहे. अ‍ॅट होम, हाऊसफुल आणि इतर ब्रँड्सचीही आऊटलेट्स आहेत तिथं.

बी ला कित्ती प्रश्न पडतात >> पडू देत की. सल्ले द्यायची नशा काय कमी आहे?! Proud

बजेट किती आहे? हे सगळं एका लाखच्या आतही होते अन वरची लिमिट ७-८ लाखही असु शकते किंवा अगदी डिझायनर, इंपोर्टेड वगैरे केलं तर त्याहूनही जास्त.
१ लाखाच्या आत हवं असेल तर लोकल फर्निचरची दुकानं आजकाल काय ते रेडिमेड मलेशियन-वुड अन सॉडस्ट वुड, रॉट आयर्न फर्निचर वगैरे विकतात, ते चांगलं दिसतं अन ५-७ वर्षं तरी टिकतंच. त्याहून टिकाऊ अन जरा महाग (२-४ लाख) म्हणजे फर्निचरवाल्यांकडून आपल्याला हव्या त्या लाकडाचं, डिझाइनचं बनवुन घ्यायचं. पण सुतार चांगले नसतील तर त्याचं फिनिशिंग वगैरे धड होत नाही अन ते ओबडधोबड दिसतं. त्याहून टिकाऊ, सुबक अन डिझायनर फर्निचर हवं असेल तर @home, fab furnish (इशान्या मॉल) ला पर्याय नाही.
गाद्यांचंही तेच. साध्या कापसाच्या केल्या तर १२००-१५०० ला डबलबेडची होते, स्लीपवेल १८००० ला येते.
थोडं मिक्स अँड मॅच करायला हरकत नाही.

घर भाड्याने द्याय्चे आहे का स्वतः रहाय्चे आहे का नातलग राहणार आहेत?>>> राजसी, घर माझच आहे. Happy
कोण राहणार ह्यावर फर्निचरची किंमत ठरलेली बरी. होतं काय की नवं घर झाल्याच्या आनंदात, आपण लवकरच राहायला येऊच म्हणून हवं तसं फर्निचर आणि इतर सामान घेतो. घर बंद ठेवणार पण कधी चार दिवसांसाठी आलो तर सुसज्ज असाव अशी हौस म्हणून घेणार असशील तर स्वतः actually रहायला आल्यावरच घेणे बरे, असा आपला व्यावहारिक सल्ला. फर्निचर आजकाल पूर्वीसारख वर्षानुवर्ष कोणी वापरत नाही, परत fashion / style सारखी बदलते म्हणून. Tempoarary living साठी प्लास्टीक फर्निचर बरं ! (आगाऊपणा वाटला असेल तर sorry , मी असे हौसेखातर, लवकरच राहायला येऊच म्ह्णून अक्कलखाती पैसे घातलेत)

तुल हवा तसा पलंग लॉ कॉलेज रस्त्यावरच्या 'निर्मिती'मध्ये आहे>> माझ्या दिराने इथून घेतलय, सोफा, बेड आणि डायनिंग टेबल सगळ छान आहे.

बी फर्निचर बरोबरच घराला पडदे लागतात त्याची फिटिन्ग्स करून घे. मस्त पडदे मिळतात आजकाल. पडद्याशिवाय शोभा नाही घराला.

बी इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा बाफ उघडतो आहे, ते उत्तम आहे, कारण माहिती शोधणं सोपं होतं. नवीन घर घेताना असे लहानसहान प्रश्न पडतातच, त्यातच शहर नवखं असेल तर त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी असे बाफ उपयोगात येतात. Happy

तसं अजून खूप काही लागेल. अ‍ॅप्लायन्सेस, फिटिन्ग्स, इन्फ्रा जसे टाटा स्काय, नेट कनेक्षन्स, वाय फाय सेटिंग्ज . एक घर पूर्ण फर्निश करणे आणि मेंटेन करणे इज अ जॉब बाय इट्सेल्फ. त्यात ह्या सर्व डोमेस्टिक सर्विसेस २४ बाय ७ चालू असाव्या लागतात. त्यासाठी सर्व सर्विस प्रोव्हायडर्स चे नंबर स्पीड डायल वर हवे. वॉटर हीटर अचानक जळून जाऊ शकतो. कधी एखाद्या खोलीत वायफाय येत नाही.

जमत असल्यास दोन लहान साइजचे टीव्ही घे एक मोठा घेण्यापेक्षा. फार उपयोग होतो. आणि एक अलार्म कम एफ एम रेडिओ. म्युझिक सिस्टिम/ होम थिएटर किंवा आय पॉड डॉक जरूरी आहे.

गार्बेज डिस्पोजलची, पाणी साठवायची व्यवस्था बघून घे. ह्या चीजांचा बाफ काढलास की ही पोस्ट तिथे चिकटव. तोपरेन्त इथेच ग्यान. Happy

रेडिमेड फर्निचर काही ठिकाणी कस्टमाईज्ड स्वरूपातही मिळतं. >>> हे कधीपासून विचारायचं होतं. वॉल टू वॉल वॉर्डरोब्ज आणि किचनमधल्या ट्रॉलीज आणि कपाटं अशाप्रकारे बनवून मिळतात हे माहीत आहे पण पुण्यात कुठे मिळतील ते माहीत नाही. आपल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे कपाटं बनवायची आणि घरी येऊन फिट करायची. कुणाला माहीत असल्यास सांगाल का ? घरात राहून इंटीरियर करायचे झाल्यास हा ऑप्शन फार बरा पडेल.

मागे मुंबईला सोसायटीतल्या एकांकडे असं वॉल टू वॉल युनिट पाहिलं होतं. सुरेख आणि मजबूत होतं. त्याला खूप वर्षं झाली पण. शिवाय ते ही दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाले.

ह्या माहितीसाठी हा धागा योग्य नसेल तर प्लीज सांगा. दुसर्‍या ठिकाणी प्रश्न हलवते Happy

बी, चांगल्या क्वालिटीचे रॉट आयर्नचे फर्निचर बघ. दिसायला नाजूक पण मजबूत आणि हलवाहलवी करायला सोपे. पुण्यातल्या हवेत गंजण्याचा पण प्रश्न नाही. अजिबात बोजड दिसत नाही. घरात भरपूर मोकळी जागा असल्यासारखे वाटते.

Pages