उत्तराखंड भारताची देवभूमी. पण ह्या देवभूमीतील लोकांचे खरे स्वरूप उत्तराखंड पुराच्यावेळी उघड झाले देवभुमीत राहूनही माणूस मनाने कसा क्रूर असू शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तराखंड. अर्थात यात सर्व स्थानिकांचा समावेश नाही अनेक लोक पूरग्रस्त भाविकांना मदत करत आहेत तर दुसरीकडे स्थानिकाकडून त्यांची लुट हि चाललेली आहे.
एका पराठ्याची किंमत २५० रुपये पाण्याची बाटली २०० रुपये, चिप्स १०० रुपये, टैक्सीचे भाडे जेथे पूर्वी जायला १००० रुपये घेत तेथे आता ४००० रुपये. लोकहो हा महागाईचा दर नाही आहे हा आहे देवभूमीतील लोकांनी भाविकांवर लावलेला आपत्ती कर..
केदारनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून काही चोरट्यांनी तर चक्क मृतदेहावरील दागिने आणि पैसे ओरबाडून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे .प्रत्यक्ष देवभूमीतली हि उदाहरणे पाहून मन सुन्न होते.आपत्तीत अडकलेल्यांना मदतीचा हात देणे सोडाच सध्या भाजी पोळीच्या जेवणासाठी हजार रुपये द्यावे लागले ज्यांच्याकडे पैसे होते त्यांचे ठीक पण ज्यांच्याजवळ पैसे नव्हते त्यातील अनेक जन भुकेने मरण पावले.
उत्तराखंडची यात्रा यापुढे आयुष्यात करणार नाही असे अनेकजणांनी टीवीवर सांगितले. कारण आता तिथली माणुसकी हरवली आहे नि पैसा मुख्य झाला आहे.
लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीने तर मन सुन्नच झाले ती बातमी
1)सर्वात भयानक अनुभव रिसोडच्या तोष्णीवाल कुटुंबाला आला. रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम तोष्णीवाल, त्यांची पत्नी सुरेखा आणि मुलगा प्रद्युम्न तसेच काही नातेवाईकांसह एकूण १७ जण चारधामच्या यात्रेवर रवाना झाले होते. त्यांच्या १५ वर्षीय निरागस मुलाचा दरडीत अडकल्याने भुकेने तडफडून मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीत तोष्णीवाल कुटुंबाचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. रामबाडा जवळील दरडीत १६ जूनपासून अडकल्याने भुकेने व्याकुळ झालेल्या प्रद्युम्नला वाचविण्यासाठी तब्बल १ लाख रुपये त्यांनी एका व्यक्तीला दिले. मुलाला वाचविणे तर सोडाच ती व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली. मुलाच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने आईवडिलांच्या संवेदना बधीर कोसळले.
2) गौरीकुंड ते ऋषिकेश असे परत जाण्यासाठी ड्रायव्हरने चक्क ५० हजार रुपयांची मागणी केली.
उत्तराखंडमध्ये हि जी आपत्ती आली आहे ती जणू इथल्या स्थानिकासाठी सुवर्णसंधीच ठरली आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक पहिले कि मानवतेवरचा विश्वास उडून जातो.
काय दोष होता ह्या लोकांचा देवाच्या दर्शनासाठी गेले नि जीव गमावून बसले. जे वाचले त्यांनी भोगल्या फक्त यातना नि घेतले माणुसकी विरहीत देवभूमीचे दर्शन.
घाटपांडे सर, >>प्रत्येक जण
घाटपांडे सर,
>>प्रत्येक जण विचार करतो कि आपण प्रामाणीक राहिलो तरी इतर लोक लबाड आहेत. ते माल दागिने पळवून नेणारच मग आपणच का सोडा?<<
नशीब माझं की अजून या उत्तराखंड आपत्तीला 'फॉरेन'ची मदत आलेली नाहिये.
गुजरात अन किल्लारी भूकंपांना गेलेल्या रेस्क्यू टीम मेंब्रांनी "इम्पोर्टेड" कपडे अन ब्ल्यांकेटं घरी आणलेली ठाऊक आहेत मला.
****
इन्या, मी तेच म्हणतो आहे, की कुणीही याचं भांडवल करू नये. ना बीजेपी ना काँग्रेस ना अजून कुणी. पक्ष कोणताही असो. राज्य कोणतेही असो. देश एक आहे. किमान आपल्यावर दैवी आपत्ती आली तेव्हा तरी एक व्हा! हे का विसरतोय आपण?
http://www.ndtv.com/article/i
http://www.ndtv.com/article/india/blog-at-harsil-relief-camp-in-uttarakh...
इब्लिस तुमच्या पोस्ट्स
इब्लिस
तुमच्या पोस्ट्स आवडल्या.
माझेही आई-वडील चार धाम यात्रेला किंवा आत्ता काश्मिरात गेले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांचा चांगला अनुभव आला होता. थोडेफार पैसे जास्त घेतात पण प्रामाणिकपणे काम करणारे लोक त्यांना भेटले.
खाण्यापिण्याच्या वस्तु मुळातच तिथे फारसे पिकत नसल्याने महाग असतात शिवाय एवढ्या उंचीवर अन्न शिजवायचे म्हणजे इंधनही जास्त लागत असणार.
पण एखादा माणूस सद्वर्तनी असला तरी आजूबाजुचे सगळेच आपला स्वार्थ साधत आहेत म्हटल्यावर तो सुद्धा विचार करणारच.
बाकी राजकारण चालू द्या! आपल्याकडे माणसाच्या जीवाची किंमत नाही हेच खरे.
उलट असे म्हणतील देवाच्या दारी मृत्यु आला, मुक्ती मिळाली. कोण्या राजकारण्याने हे विधान अजून केले नाही हेच आपले नशिब!
किमान आपल्यावर दैवी आपत्ती
किमान आपल्यावर दैवी आपत्ती आली तेव्हा तरी एक व्हा! हे का विसरतोय आपण?>> बहुदा पुढील वर्षी निवडणूक आहे हे असले धंदे केल्याशिवाय लोक आपल्याला ओळखणार कसे ना. आणि टी.व्ही वाल्यांचा टी. आर. पी वाढणार कसा हो
इतरत्र मांडलेली मते
इतरत्र मांडलेली मते
इब्लीसांनी दिलेली लिंक
इब्लीसांनी दिलेली लिंक पाहिली. बराचसा सहमत आहे. मात्र आपतीग्रस्तांनी सरकारी मदत हा हक्क मानावा का याबद्दलचं मत वादग्रस्त होऊ शकतं. एकतर केदारनाथ, बद्रीनाथ, फुलोंकि घाटी, देवप्रयाग, जोशीमठ, औली, गंगोत्री, यमुनोत्री अशी सर्व धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे या राज्यात आहेत. हे राज्य पूर्वी उत्तर प्रदेशात येत होतं. तेव्हापासून पर्यटक येत आहेत. आजच्या इतके नाही तरी दुर्घटनांमधे किरकोळ संख्येत पर्यटक जखमी किंवा मृत होतच आलेले आहेत. रस्ता खचणे हे अधूनमधून घडतेच आहे. त्याच्या जागाही ठरलेल्या आहेत. तसेच दरड कोसळणे अजिबात नवीन नाही. मग जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर काय होईल याचा विचार कुणी करायचा ? एका नदीच्या खो-यात एकच एक लांबलचक रस्ता निघू शकतो ही काही सरकारची चूक नाही हे मान्य. पण इतक्या लांबीच्या रस्त्यावर वैद्यकीय सुविधा एखाद्याच ठिकाणी (आणि ती ही तुटपुंजी) असावी का ? पर्यटक आणि गिर्यारोहक यातला फरक लक्षात घेतला तर गिर्यारोहक आपल्याबरोबर तंबूपासून सर्व सामान घेऊ शकतात. आजच्या काळातला (पैसे देऊन हवं ते घेणारा) पर्यटक तीन चार दिवसांचं सामान कसा काय जवळ बाळगेल ? त्याबद्दल उत्तराखंड पर्यटन विभाग, पर्यटक कंपन्या यामधून काहीच माहिती दिली जात नाही.
जी बांधकामे ढासळली त्यांना मंजुरी देण्यामागची बेफिकीरी ही कुणाची जबाबदारी असेल ? त्यातून जे पर्यटक वाहून गेले ती कुणाची चूक असेल ? जो उद्योग राज्याला मुख्यकरून महसूल मिळवून देतो तो ज्यांच्या जिवावर चालतो, त्यांच्या सुरक्षेबाबत इतका उदासीन दृष्टीकोण कसा काय समर्थनीय आहे ? त्यामुळे सरकारने केलेली मदत ही त्यांची प्राधान्यक्रमाने जबाबदारी नाही असा सुचवण्याचा सूर योग्य नाही असं वाटतं. अशा अनेक घटनांमधून जाताना त्या वेळी प्रतिकूल मत बनते आणि आपण इथे सुरक्षित नाही अशी भावना निर्माण होते.
मात्र, दुर्गम अशा भागात जाताना शारीरिक क्षमतेचा मुद्दा ( जो आधी या बाफवर येउन गेला आहे) हा पर्यटकांना लागू होतो.
वरच्या लिंक मधील लेख छान आहे,
वरच्या लिंक मधील लेख छान आहे, चैतन्य ईन्या.
चिन्नुक्सला अनुमोदन ! तिथे
चिन्नुक्सला अनुमोदन !
तिथे अजुनही एवढे पर्यटक येऊनही शासनाने शौचालयाची व्यवस्था केली नाही बाहेरच निभावे लागत आहे.
इब्लीस व चिन्नुक्स यांना
इब्लीस व चिन्नुक्स यांना अनुमोदन !
राजकारण कुठल्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही मग बीजेपी असो की काँग्रेस ,
आपल्याकडे सणवार उत्सव आदी दिवशी मंदीरात भलीमोठी गर्दी असते इतर दिवशी फिरकणारे फारच कमी असतात. जसे श्रावणात वा महाशिवरात्रीला महादेवाचे दर्शनाला अमाप गर्दी लोक आदल्या दिवशी जाणार नाहीत. किंवा नंतर ही. हेच इतरही देवांचेबाबतीत म्हणता येईल. बाकी दिवशी दर्शन घेतल्याने देव पावणार नाही काय? त्याच दिवशी दर्शन घेतल्याने समाधान मिळते पण पुजारीही साधा माथा टेकऊ देत नाहीत त्या दिवशी मग दुसर्या दिवशी कमी गर्दीत दर्शन घेतले तर काय वाईट.
काल बातम्यांमधे एका जवळच्याच
काल बातम्यांमधे एका जवळच्याच गावाबद्द्ल (बहुतेक भागोरी )माहीती दिली. त्या गावातील गरीब लोकांनी अनेक पर्यट्कांना आसरा दिला आहे. ज्यांच्या जवळ स्वतःसाठीच पुरेसे अन्न नाही अश्या लोकांनी आपल्या घरातील सगळे कपडे , वस्तू, जेवणाचे सामान त्यांनी एकत्र केले आणि ज्याला हवे तसे वापरण्यास देत आहेत. एकत्र जेवण शिजवून गेले काही दिवस सगळे एकत्र रहात आहेत तेही काही मोबदला न घेता. पर्यटकांमधे अनेक गुजराथी, मराठी बायका आणि लहान मुले ही आहेत. अजुनही माणूसकी आहे शिल्लक. बघून खूप कौतूक वाटले.
The "Dhari Devi" Goddess
The "Dhari Devi" Goddess temple, at the banks of river Alaknanda, is
known to protect the pilgrimage sites of north Himalayas from flooding
rivers.
Recently, GVK company had planned to shift the temple in view of
construction of a 330MW hydro-project on Alaknanda which was opposed
by saints and locals.
The SC on 17th may 2013, nodded for re-location of the temple. Finally,
the temple was destroyed 3 days back and is yet to be re-located.
Less than 104 hrs after the destruction of the temple, the Uttarakhand is
witnessing its worst floods ever....
How does one see it ???
A natural disaster or man-made ??
देवी पुरापासून रक्षण करते..
देवी पुरापासून रक्षण करते.. बांग्लादेशात दरवर्शी आपल्या पवित्र गंगा नदीमुळे पूर येतो... अख्ख्या भारतात गंगेवर इतकी देवळे आहेत, तर हे पूर थांबत का नाहीत?
Recently, GVK company had
Recently, GVK company had planned to shift the temple in view of
construction of a 330MW hydro-project on Alaknanda which was opposed
by saints and locals.
The SC on 17th may 2013, nodded for re-location of the temple. Finally,
the temple was destroyed 3 days back and is yet to be re-located.
Less than 104 hrs after the destruction of the temple, the Uttarakhand is
witnessing its worst floods ever....
How does one see it ???
>>>
बरोबर आहे.
मंदीर का काढले? पावर प्लँट नाही लागला असता तर काही वाईट झाले नसते परंतु
मंदीर हटवल्या मुळे इतके नुकसान झाले ते कोण भरुन देणार? वर देवाचा कोप झाला त्याचा परिणाम कोण सहन करणार ?
आम्हाला एकवेळ वीज नको पन मंदीर हवेच.
जय श्रीराम
जी बांधकामे ढासळली त्यांना
जी बांधकामे ढासळली त्यांना मंजुरी देण्यामागची बेफिकीरी ही कुणाची जबाबदारी असेल ? त्यातून जे पर्यटक वाहून गेले ती कुणाची चूक असेल ?
यात चूक कुणाचीच नाही. आपत्तीच इतकी जोरदार होती . अॅक्ट ऑफ गॉड या श्रेणीत येणारी. अशा वेळी काही मोडले/ वाहून गेले तर इंजिनियरवर / सरकारवर जबाबदारी येत नाही.
परेश रावल ला बोलवा रे कोणी
परेश रावल ला बोलवा रे कोणी तरी .
अॅक्ट ऑफ गॉड वर बोलायला
^^^^^^ दुर्गम आणि आपत्तीप्रवण
^^^^^^
दुर्गम आणि आपत्तीप्रवण प्रदेशात धोकादायक ठिकाणी धोकादायक पद्धतीने केलेले बांधकाम ही कुणाचीच चूक असू शकत नाही ही नवी माहिती मिळाली.
बांधकाम निर्धोक असले तरी
बांधकाम निर्धोक असले तरी अॅक्ट ऑफ गॉड झाले की पडतेच.
मंत्रालयाला लागलेली आग
मंत्रालयाला लागलेली आग
इथे वाईट बरेच लिहिण्यात आले
इथे वाईट बरेच लिहिण्यात आले आहे. फक्त चिनूक्स यांनीच चांगले काय ते लिहीले आहे.
मी पण तुमचे लक्ष इकडे वेधू इच्छितो.
http://www.akshardhool.com/2013/06/a-look-at-himalayan-disaster-relief.html
चंद्रशेखरांच्या ब्लॉगची लिंक
चंद्रशेखरांच्या ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद हो झक्की काका. ओसाड गावात काय सुरू आहे ते कित्येक दिवसांत पाहिले नाही. बघतो आता.
इब्लिस, >> सनातन प्रभातवाले
इब्लिस,
>> सनातन प्रभातवाले म्हणतात ना? तीर्थस्थळी जाऊन केलेले पाप महापाप आहे, ते बरोबर असेल बहुतेक
तीर्थस्थानी केलेले पाप महापाप असते या अर्थाचे एक प्राचीन सुभाषित आहे. नक्की स्रोत माहीत नाही. http://susanskrit.org/sanskrit-subhashit-religion/1352-2010-07-14-13-26-...
आ.न.,
-गा.पै.
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Army-medical-team-help...
http://www.hindustantimes.com/India-news/NorthIndiaRainFury2013/Of-winge...
भगोरी बद्दल वर दिलेल्या
भगोरी बद्दल वर दिलेल्या बातमीच्या संदर्भात लिन्क
http://www.hindustantimes.com/India-news/NorthIndiaRainFury2013/Uttarakh...
ही मटावरील ब्लॉगची लिंक बघा.
ही मटावरील ब्लॉगची लिंक बघा. काय भयानक आहे! उत्तराखंडमध्ये यापेक्षा भयानक झालेच आहे.:अरेरे:
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/aheteaseahe/entry/death-tol...
एका भागात पूर येतो, दुसर्या
एका भागात पूर येतो, दुसर्या भागात कोरडा दुष्काळ पडतो. . . .
उत्तर सोपे आहे पण सर्वांना पटवून, संमती सर्वांची एक करुन, कार्य आरंभ करुन यशस्वीपणे संपन्न करायचे म्हणजे आपल्या देशात एक अग्नीपरीक्षाच असते.
पण दुसर्या देशांमध्ये आपल्यासारखीच माणसे जर ( सुवेझ कालव्यासारखे=जमीनीत पाणी / दुबई = पाण्यात जमीन ), प्रचंड प्रकल्प यशस्वीपणे करु शकतात, तर ईथे का नाही ?
( ह्याचे ऊत्तर सुद्धा मीच देईन . . . . थोडे थांबुन पहा काही ट. पो. येतील, त्यातच ह्याचे ऊत्तर असेल ).
पण मी हे स्पष्ट पाहू शकतो कि, असे जर केले गेले तर पूर आणी दुष्काळ पुन्हा कधीच होणार नाहीत.
How does one see it ??? A
How does one see it ???
A natural disaster or man-made ?? > > > >
Natural disaster invited by human kind.
Pages