माणुसकी विसरलेली देवभूमी

Submitted by धडाकेबाज on 25 June, 2013 - 04:32

उत्तराखंड भारताची देवभूमी. पण ह्या देवभूमीतील लोकांचे खरे स्वरूप उत्तराखंड पुराच्यावेळी उघड झाले देवभुमीत राहूनही माणूस मनाने कसा क्रूर असू शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तराखंड. अर्थात यात सर्व स्थानिकांचा समावेश नाही अनेक लोक पूरग्रस्त भाविकांना मदत करत आहेत तर दुसरीकडे स्थानिकाकडून त्यांची लुट हि चाललेली आहे.

एका पराठ्याची किंमत २५० रुपये पाण्याची बाटली २०० रुपये, चिप्स १०० रुपये, टैक्सीचे भाडे जेथे पूर्वी जायला १००० रुपये घेत तेथे आता ४००० रुपये. लोकहो हा महागाईचा दर नाही आहे हा आहे देवभूमीतील लोकांनी भाविकांवर लावलेला आपत्ती कर..

केदारनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून काही चोरट्यांनी तर चक्क मृतदेहावरील दागिने आणि पैसे ओरबाडून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे .प्रत्यक्ष देवभूमीतली हि उदाहरणे पाहून मन सुन्न होते.आपत्तीत अडकलेल्यांना मदतीचा हात देणे सोडाच सध्या भाजी पोळीच्या जेवणासाठी हजार रुपये द्यावे लागले ज्यांच्याकडे पैसे होते त्यांचे ठीक पण ज्यांच्याजवळ पैसे नव्हते त्यातील अनेक जन भुकेने मरण पावले.

उत्तराखंडची यात्रा यापुढे आयुष्यात करणार नाही असे अनेकजणांनी टीवीवर सांगितले. कारण आता तिथली माणुसकी हरवली आहे नि पैसा मुख्य झाला आहे.

लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीने तर मन सुन्नच झाले ती बातमी
1)सर्वात भयानक अनुभव रिसोडच्या तोष्णीवाल कुटुंबाला आला. रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम तोष्णीवाल, त्यांची पत्नी सुरेखा आणि मुलगा प्रद्युम्न तसेच काही नातेवाईकांसह एकूण १७ जण चारधामच्या यात्रेवर रवाना झाले होते. त्यांच्या १५ वर्षीय निरागस मुलाचा दरडीत अडकल्याने भुकेने तडफडून मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीत तोष्णीवाल कुटुंबाचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. रामबाडा जवळील दरडीत १६ जूनपासून अडकल्याने भुकेने व्याकुळ झालेल्या प्रद्युम्नला वाचविण्यासाठी तब्बल १ लाख रुपये त्यांनी एका व्यक्तीला दिले. मुलाला वाचविणे तर सोडाच ती व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली. मुलाच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने आईवडिलांच्या संवेदना बधीर कोसळले.
2) गौरीकुंड ते ऋषिकेश असे परत जाण्यासाठी ड्रायव्हरने चक्क ५० हजार रुपयांची मागणी केली.

उत्तराखंडमध्ये हि जी आपत्ती आली आहे ती जणू इथल्या स्थानिकासाठी सुवर्णसंधीच ठरली आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक पहिले कि मानवतेवरचा विश्वास उडून जातो.

काय दोष होता ह्या लोकांचा देवाच्या दर्शनासाठी गेले नि जीव गमावून बसले. जे वाचले त्यांनी भोगल्या फक्त यातना नि घेतले माणुसकी विरहीत देवभूमीचे दर्शन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारनाथ येथील नैसर्गिक आपत्तीला गांधी सरोवर डॅम मधून सोडलेले अतिरिक्त पाणी जबाबदार आहे ,असे टीव्ही वर ऐकले ,त्याची न्यायालयीन चौकशी होवून दोषी अधिकार्‍यांना शिक्षा होईल का? यासंबंधी अधिक डिटेल्स कोणाकडे आहेत का?

ते नव्हतं माहित.धन्यवाद.

पण मला म्हणायचे आहे की जर भाविक तिथे येणे अटळ असतील तर तिथे रुल्स / रेग्युलेशन असायला हवेच. जर ते केले तर अनेक गोष्टी टाळता येतील.

पण बर्फ कमी पडणे ह्याल जेट स्ट्रीम कारणीभूत असावी. तो अभ्यास झाला आहे की कसे हे माहित नाही.

केदारनाथ येथील नैसर्गिक आपत्तीला गांधी सरोवर डॅम मधून सोडलेले अतिरिक्त पाणी जबाबदार आहे ,असे टीव्ही वर ऐकले ,त्याची न्यायालयीन चौकशी होवून दोषी अधिकार्‍यांना शिक्षा होईल का? यासंबंधी अधिक डिटेल्स कोणाकडे आहेत का>>>

ढगफुटी झाल्यावर डॅम मधुन पाणी सोडले नसते तर डॅम सुध्दा फुटला असता... त्याची जवाबदारी कोण घेणार होते का ? Uhoh

होय उदयन जी, पण धरण प्रभावित क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना तसा इशारा देण्याचा नियम आहे. तसा इशारा न देता पाणी सोडले गेले आणि त्यामुळे प्रचंड जीवित/वित्त हानी झाली. याला धरणाशी संबंधित अधिकारीच जबाबदार नाहीत काय? इशारा दिला असता तर हजारो प्राण वाचू शकले असते. बेजबाबदार सुस्त प्रशासन आणि DM Authority चा भोंगळ कारभार याला जबाबदार आहे -आजतक / 19.06.2013 -8.00 am

तसा इशारा न देता पाणी सोडले गेले >>> हे कोणी सांगितले..:अओ: .. इशारा दिला देखील असेल... परंतु ढगफुटी अचानक झाल्याने जे लाखो पाणी डोंगरावरुन आले आणि डॅम च्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जर पाणी जमा होत गेले तर ..संबधित अधिकारी ने काय करावे ? Uhoh ... तुम्हीच सांगा

इशारा दिला असता तर हजारो प्राण वाचू शकले असते. बेजबाबदार सुस्त प्रशासन आणि DM Authority चा भोंगळ कारभार याला जबाबदार आहे -आजतक / 19.06.2013 -8.00 am

ढगफुटी काय असते बहुदा तुम्ही कधी अनुभवली नसेल... पण मी स्वतः २६ जुलै ला अनुभवली आहे.... उल्हासनगर च्या जकात नाक्यावर आम्ही ४ जणांची टीम कामाला होती...मागे छोटा नाला होता जो रात्रभराच्या पावसामुळे दुथडी भरुन वाहत होता..कंम्पुटर चा सिपीयु नाईटवाल्याने वर ४ फुट उंच टेबलावर ठेवलेला त्याच्या बरोबर मोनिटर आणि प्रिंटर आणि किबोर्ड होता... आम्ही डे शिफ्ट ला गेल्यावर सकाळी ८ वाजताचे हाल होते ..अचानक ९ ला प्रचंड पाउस सुरु झाला आणि अवघ्या ३० मिनिटांमधे जे पाणी तळव्याजवळ होते ते गुढघ्या जवळ आले..
आम्ही लगेच सगळे बंद करुन सामन हलवायला सुरुवात केली..२५ मिनिटात सगळे सामान बाहेर काढले त्या वेळेला प्रिंटर बुडालेला पाणि छातीला लागत होते... ही अवस्था असते अचानक ढगफुटीची...
.
.
कारभार भोंगाळ असेल ही .... परंतु त्यावेळेला जी परिस्थिती उदभवते...त्याचे उत्तर त्याक्षणी नसते..

काही चुका झाल्याही असतील. पण फक्त मिडीया मधे जे काय सांगितलेले असते ते सगळॅच खरे नसते ...

पण फक्त मिडीया मधे जे काय सांगितलेले असते ते सगळॅच खरे नसते ...

या वाक्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

SASE, Manali या संस्थेने हिमालयात कोसळणा-या दरडींबद्दल संशोधन केलेले आहे. माउंटेनियर्स इन्स्टीट्यूट , दार्जिलिंग, किंवा आयटीबीपी, औली इथं ते वाचायला मिळतं. डोंगर फोडून रस्ता काढल्याने हिमालयासारख्या ठिसूळ पर्वताला हानी पोहोचते. बद्रीनाथ इथे या संस्थेने मंदीराचं संरक्षण करण्यासाठी केलेलं काम मार्गदर्शक आहे. रस्ते सुरक्षित राहण्यासाठी दरड वाहून जाण्यासाठी भराव आवश्यक आहेत. पण रस्त्याच्या खालची जमीनही ठिसूळ असल्याने रस्ता खचण्याचे प्रकार घडतात. अर्थात ही कारण उघड आहेत. यांना मानवनिर्मित म्हणायचं नाही तर काय म्हणणार ?

सनातन प्रभातची लिंक वाचली . आणि इतरर्ही त्यांचे वाड्.मय वाचले. लई मजा आली. आता नियमितपणे वाचणार. भलतेच विंट्रेस्टिंग हाये सगळे Proud

काही चुका झाल्याही असतील. पण फक्त मिडीया मधे जे काय सांगितलेले असते ते सगळॅच खरे नसते ...
<<
उदयनजी, या वाक्यासाठी अभिनंदन व अनुमोदन.

भारतातल्या कुठल्याही शहरात

जगातल्या लिहा, कमी अधिक प्रमाणात.

चिनूक्स यांनी लिहील्याप्रमाणे सगळे वाईट लोक 'स्थानिक' नसतील, कित्येक लोक संधीचा फायदा घ्यायला बाहेरूनहि आले असतील.

मिडीयात सगळे कडे उचलले जात आहे की तिथे जे बांधकाम झाले वगैरे त्याच्या मुळे हे घडले..

एकदम बरोबर ..इथे इतकी अनधिकृत बांधकाम आहे मग तिथे किती असेल..? सगळ्यांचीच चुक आहे...
तिथे काँग्रेस चे शासन आहे म्हणुन सगळे काँग्रेस ला दोष देत आहे...गेली १ वर्षापासुन बहुतेक आहे .. हे देखील आहे की पैसे खाल्ले गेले असेल .. नक्कीच..त्याशिवाय असले अक्षम्य चुका घडत नाही...
परंतु काँग्रेस ला बोलताना काही जण हे विसरतात की त्या आधी ५ वर्षे इतर पक्षाचे सरकार होते... आता जे बांधकाम अथवा चुका झाल्यात त्या फक्त १ वर्षातच झाल्या त्या आधी ५ वर्ष राज्यात "रामराज्य स्वराज्य " होते. त्या काळात काहीच चुका वगैरे झाल्या नाहीत...??? Uhoh
ती उमा कोणी ती साध्वी आता ओरडात आहे...त्या डोंगरावरची देवी काढली म्हणुन हे घडले...काहीही ? देशाच्या लोकांच्या भावना कश्या भडकवायच्या हे या बाई कडुन शिकले पाहिजे...क्लासच लावयला हवा... कुणाचे काय तर या बाईचे काय...?

ते मंदीर काढले त्याच्याजागी पावर प्लांट लावुन राज्यात वीज निर्माण केली... म्हणजे राज्याला वीजेची नाही मंदीराची गरज होती का ? उद्या वीज नाही आणि भारनियमन जास्त केले तर रस्त्यावर त्याचा विरोध करणारे कोण ? हेच असणार आहे....

उगाच मिडीया बोंबलत आहे म्हणुन काहीही गैरसमज करुन घ्यायचा आणि आपले मत बनवायचे ?

तिथे आपले जवान स्वयंसेवक आणि संघाची माणसे आपला जीव धोक्यात घालुन माणसांना कसे वाचवायचे याचा विचार करत आहेत ...आणि इतर पक्षांची लोक त्यावर आपली राजनिती कशी भाजता येईल हे बघत आहे...:राग: आणि आपली मिडीया पण अमुक नेत्याला उतरु दिले नाही अमुक नेत्याला उतरु दिले वगैरे वायफळ चर्चा करत आहे... अरे तिथे चालले काय आहे... रस्ता नाही आहे कुठे ही ठिकाणी जाण्यासाठी.. झाडांच्या खोडांचे पुल करुन एका दोरीवरुन लोकांना बाहेर काढत आहे... त्याचे वर्णन करायचे सोडुन हे बाकीचे काय झगाडपट्टी लावली आहे ?????????

वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सतत 'पन्नास रुपयांना पाण्याची बाटली विकली', 'अडीचशे रुपयांना पराठा' अशा बातम्या येत आहेत. पर्यटकांच्या तक्रारीही ऐकल्या. यात्राकंपन्यांबरोबर जाणार्‍या पर्यटकांना कदाचित या किमती माहीत नसतील, कारण पैसे खर्च करण्याची वेळच येत नसणार. एरवीही इतक्या उंचावर अन्नपाण्याची व्यवस्था करणं कठीण असतं. गढवालात राजमा, थोडा तांदूळ, बटाटे इतकंच पिकतं. हर्सिल, हनुमानचट्टी किंवा केदारनाथाच्या, गंगोत्रीच्या वाटेवर पन्नास रुपयांना पाण्याची बाटली एरवीही मिळते. भोजबासाकडे जाताना, केदारतालाच्या मार्गावर शंभर रुपयांना मॅगी मिळते फक्त. परवडत नाही म्हणून दोन आलूपराठे पाचजणांत वाटून खाणारं उत्तर प्रदेशातून आलेलं कुटुंब मी पाहिलं आहे. इतकं नुकसान होऊनही शेकडो यात्रेकरूंना दोन वेळचं जेवण एक पैसाही न घेता देणारे असंख्य आश्रम आहेत. गंगोत्रीत झालेल्या नुकसानाच्या बातम्या अजूनही वर्तमानपत्रांमध्ये नाही, पण तिथेही परिस्थिती वाईट आहे, उत्तरकाशीपर्यंतचा रस्ता बंद आहे, हजारो यात्रेकरू अडकलेले आहेत, आणि त्यांतले बहुतेक सर्व यात्रेकरू हे तिथल्या आश्रमांमध्ये फुकट राहत आहेत. अनेक गावकर्‍यांनीही यात्रेकरूंना जेवण दिलं. या बातम्या दुर्दैवानं कुठेच बाहेर आल्या नाहीत.

देशाच्या लोकांच्या भावना कश्या भडकवायच्या

भडकल्या भावना तर काय झाले?
भारतातलेच तर लोक - भावना भडकल्या तर स्वतःच्याच गावात आगी लावून, दंगल करून निरपराध लोकांना मारतील.

लूटमार, भ्रष्टाचार करणारे, पोलीस, राजकारणी यांना काय त्याचे? असे होतेच म्हणून ते निवांतपणे स्वतःची कामे करत बसतील. त्याचा जनतेशी काय संबंध? बरे असेहि कुणी नाही की जे पोलिसांना, राजकारण्यांना जाब विचारतील. हिंमतच नाही. चार लोकांनी एकत्र येऊन काही करायचे ठरवले तर त्यातलाच एकजण फितूर होऊन त्यांचे प्रयत्न हाणून पाडतील.

हे असेच चालायचे. देवावर भरवसा ठेवा. त्याला काय करायचे ते तो करतो, तिथे कुणाचे काय चालणार?

हटकेश्वर, हटकेश्वर.

वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सतत 'पन्नास रुपयांना पाण्याची बाटली विकली', 'अडीचशे रुपयांना पराठा' अशा बातम्या येत आहेत. पर्यटकांच्या तक्रारीही ऐकल्या. यात्राकंपन्यांबरोबर जाणार्‍या पर्यटकांना कदाचित या किमती माहीत नसतील, कारण पैसे खर्च करण्याची वेळच येत नसणार. एरवीही इतक्या उंचावर अन्नपाण्याची व्यवस्था करणं कठीण असतं.

>> कसा, पटलं. पण मिडीयाला अक्कल आहे का? बातमी देण्या आधी त्याची थोडी खात्री करून घेणे हल्ली शिकवताच नाहीत.

काही चुका झाल्याही असतील. पण फक्त मिडीया मधे जे काय सांगितलेले असते ते सगळॅच खरे नसते ...>>> या वाक्याला टाळया

एखादी गोष्टं अती प्रमाणात झाली की त्याची किंमत रहात नाही. आपल्याकडे लोकसंख्या अती प्रमाणात आहे, त्यामुळे माणसाच्या जीवाची किंमत नाही. बाकी वर मांडलेल्या बर्याच मुद्द्यांशी सहमत. (अनागोंदी, बेजवाबदारपणा, भ्रष्टाचार ई.)

काही ठिकाणी काही करणांनी शक्य नाही म्हणून आणी काही ठिकाणी शक्य असुनही, आवश्यक सुविधांचा अभाव आणी मुलभूत सुविधा नसण्याशी तडजोड करून त्या तथाकथित 'थ्रिल' चं कौतूक करण्यात (हे असंच असतं किंवा ह्यातच खरी मजा आहे वगैरे) आम्ही दंग. असल्या तुटवड्यातून मिळणार्या 'आत्मिक', 'मानसिक' समाधानाची और लज्जत असते असंही म्हणतात.

कितीही बोचरं, उपरोधिक लिहिलं तरी त्याखाली काहितरी जळतं, आतून काहितरी तुटतं. आणि ज्यांना हे भोगायला लागतं, त्यांच्याविषयी भडभडून येतं.

एखादी गोष्टं अती प्रमाणात झाली की त्याची किंमत रहात नाही. आपल्याकडे लोकसंख्या अती प्रमाणात आहे>> कालपासून हेच लिहीन म्हणत होतो पण कंटाळा केला. खरा प्रश्न तिथे आहे. कितीही उत्तम व्यवस्था ठेवली तरी इतक्या प्रचंड जनसमुदायाला सांभाळणे कठीण आहे. पण पुन्हा इथे प्रश्न राजकीयच आहे. शिकलेले लोक आता स्वताहून आपली लोकसंख्या मर्यादित करत आहेत पण बाकी आनंद आहे. ठोस भूमिका घेणे आपल्याला जमत नाही. ३१ डिसेंबरला रात्री लंडन मध्ये रोषणाई बघायला एका पुलावर गेलो होतो. तेंव्हा पोलीस तिथे मोजत होते किती लोक पुलावर आहेत. एका मर्यादेनंतर पुलावर जायला बंदी झाली. आपल्याकडे हे असले होणे शक्य नाही. लोकांना लगेच राग येईल. आमच्या भावना दुखावल्या वगैरे. म्हणजे प्रशासनाने काही केले तरी बोम्ब मारायची आणि काहीच करत नाही म्हणून पण बोम्ब मारायची पण आपण स्वतःहून भार कमी करू असे काही लोक म्हणत नाहीत. मग हे असेच होत राहणार. शिवाय इतक्या प्रचंड आपत्तीपुढे कागदी योजना सगळ्या धुळीत जातात. अमेरिकेत गेल्या काही वर्षात हे दोन वेळा दिसून आले आहे. त्यामुळे उगाचच सरकारच्या नावाने गळे कशाला काढायचे.

माणुसकीवरचा विश्वास उडावा अशा इतर ही अनेक घटना घडत असतात. जगभरात घडतात. आपल्या कडे घाटात रस्त्यात मालवाहू ट्रक अपघात होउन पडला कि जवळपासचे अनेक लोक येउन माल पळवून नेतात. प्रत्येक जण विचार करतो कि आपण प्रामाणीक राहिलो तरी इतर लोक लबाड आहेत. ते माल दागिने पळवून नेणारच मग आपणच का सोडा?

एक एअरफोर्सचं हेलिकॉप्टर कोसळलं - कुणीही वाचू शकलं नाही
http://www.ndtv.com/article/india/uttarakhand-air-force-helicopter-crash...

केदारनाथ मधून निघणार्‍या यात्रेकरूंनीही समोर दिसलेल्या पैशावर डल्ला मारला (तात्पर्य - स्थानिक काय आणि बाहेरचे काय. सगळ्या प्रकारची माणसं सगळीकडेच असणार)
http://www.indianexpress.com/news/religious-men-held-with-rs-1-cr-in-sto...

भडकल्या भावना तर काय झाले?
भारतातलेच तर लोक - भावना भडकल्या तर स्वतःच्याच गावात आगी लावून, दंगल करून निरपराध लोकांना मारतील. >> +१ @ झक्की काका.

*
चिनुक्स, पटले.
*
सेनेच्या जवानांनी कष्टाने बाहेर काढलेल्या लोकांना कॅमेर्‍यासमोर येताच 'आम्हाला दोरीवरून ओढून आणलं. हेलिकॉप्टर का नाही पाठवलं?' 'खायला फक्त बिस्किटे दिली' इत्यादी तारे तोडताना पाहिलं तेव्हा कीव आली.

अरे! ते काय तुमच्या टूरिझम प्याकेजमधे होतं का? की अडकले तर हेलिकॉप्टर पाठवू?? रेस्क्यूच्या पाकिटात अमुक मेन्यू असेल. असं?? बिस्किट टिकाऊ पदार्थ आहे. तिथे पोहोचवणं शक्य होतं ते अन्न पोहोचवून जीव वाचवला ते विसरता कसे तुम्ही?

राजकारण तर आहेच. राजकारण म्हणे! अरे नैसर्गिक आपत्ती आहे. भारतीय नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न भारताने केले इतके पुरे! त्यात मोदींनी अमुक केले अन कॉंग्रेसने तमुक केले कशासाठी हवंय? धार्मिकतेच्या गप्पा मारणार्‍या विपुल बाबा बुवा असलेल्या आपल्या समाजाला 'आपत्तीत आम्ही १०५' हे समजत कसं नाही??

मुळात हे देवदर्शनाच्या नावाखाली झुंडीने फिरणारेच डोक्यात जातात माझ्या. सप्तशृंगी/शिर्डीला पायी जाणार्‍या दिवट्यांचे तर विचारूच नका. आम्ही पायी चालतो व देवाला जातो आहोत याचा अर्थ तुमची अँब्युलन्स देखील गेली खड्ड्यात. तुमचा पेशंट मरेना का तिकडे? आम्ही भेसूर डीजे लावून रस्त्यात नाचत हायवे बंद करणारच, असे वागणार्‍या झुंडी. हेच प्रकरण उत्तरेत ते कावडवाले करतात.

देवाला जायचं म्हणून गाडी केली जाते. एक ट्रॅक्स भाड्याने केली, की त्यात कमीत कमी २०-२२ लोक बसले नाहीत तर यांचे पैसे वसूल होतच नाहीत. मालवाहू ४०७ गाड्यांत कोंबून साठ सत्तर लोक तर नॉर्मल किस्सा आहे. आणि वर मला वाटतं लिंबाजीरावांनीच म्हटलंय, तसं रस्त्यात थांबून चिकन मटन नसलं तरी धकेल एकवेळ, पण दारू तंबाकू तर हवीच! हे आमचे 'भाविक' अन 'यात्रेकरू'. स्वतःच्या सुरक्षिततेला खड्ड्यात घालून चार पैसे वाचवायचे, अन ते वाचवून असले प्रकार करायचे.. 29.gif

वर यांना समजूतीचा शब्दही सांगायची सोय नाही. 'आमच्या देवा धर्माला बोलू नका!' हा रग्गेल कांगावा असतोच..

सनातन प्रभातवाले म्हणतात ना? तीर्थस्थळी जाऊन केलेले पाप महापाप आहे, ते बरोबर असेल बहुतेक Wink

<<वर यांना समजूतीचा शब्दही सांगायची सोय नाही. 'आमच्या देवा धर्माला बोलू नका!' हा रग्गेल कांगावा असतोच.>>
अगदी पटले. रग्गेल कांगाव्या साठी टाळ्या झाल्या पाहिजेत.

चैतन्य ईन्या | 25 June, 2013 - 20:22 नवीन
<<
संपूर्ण पोस्ट आवडली.

तुमची अन माझी थीम तीच आहे. नागरीक म्हणून माझी जबाबदारी व कर्तव्ये मी पार पाडणे गरजेचे हे मला अन प्रत्येकालाच समजले पाहिजे.

त्यात मोदींनी अमुक केले अन कॉंग्रेसने तमुक केले कशासाठी हवंय>> खरा प्रश्न तिथेच आहे. गुजरातेत भूकंप झाला तेंव्हा शरद पवारांचा अनुभव वाजपेयींनी वापरला. गुजरात प्रशासनाला युनोने उत्तम काम केल्या बद्दल प्रशस्तीपत्रक दिले होते. मोदी त्यांची टीम घेवून गेले पण त्या माणसाबद्दल अशी काही घृणा आहे की त्याची मदत घेतली तर मते जातील ह्याच कारणाने सगळी मदत बाजूला ठेवली गेली. आता सगळी बातम्या तर अश्या आहेत की मोदी स्वतःचीच लाल करता आहेत. पण त्याच्यापलीकडे पाहण्याची सवय नसल्यावर काय करणार.

हे सगळे खालील लिंक वर बेतलेले मत आहे ते जर का चुकीचे असेल तर मग माझ्या विधानाला अर्थ नाही.

http://bhautorsekar.blogspot.co.uk/2013/06/blog-post_24.html

Pages