ही झाली संध्याकाळ...

Submitted by बागेश्री on 23 June, 2013 - 01:16

ही झाली संध्याकाळ
दिवसाचे कलणे झाले,
अंबरी चांदणे येता
श्वासांना गहिवर आले..

गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..

ना डोळा रुचते काही
जरि पाते हिरवे हिरवे
पाऊस दाटलेला अन
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे

टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्सल जातिवंत कविता शब्दाशब्दात त्यांचं स्वतःच आणि अर्थांचं सौंदर्य ठासून भरलेलं (आणि कवयित्रीचंही ;)..हलके घेणे :))

वाह बागेश्री वाह !!

ग्रेस्फुल्ल!!
पण बरका ग्रेस्फुल्ल असली तरी अनाकलनीय नाहीये कै ही कविता !!! लग्गेच कळेल अशीये

मस्तच!

मधेच थांबल्यासारखी वाटली कविता....पार्ट टू आहे का ह्या कवितेला? नसेल तर विचार करावात.

बागेश्री देशमुख यांचा विजय असो.

गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..

या अशा कडव्यातून भावभावनांचा कोलाज चित्ररूपात उमटलाय. बघणा-याने हवा तसा पहावा, हवा तसा घ्यावा.

अवांतर : मुक्तछंदाची फ्लाइंग क्वीन आता पॅलेस ऑन व्हील किंवा डेक्कन ओडीसी सारख्या ग्रेसने धावू लागलीय. तीच ग्रेस, तसंच प्रतिमांतून कवितेने झरणं , पण त्यात कवयित्रीची ओळख हरवून न जाता एक वेगळं, दमदार आणि आश्वासक पाउल पडलंय असं वाटलं.

मस्तच !!

संपूर्ण कविता सुंदरच, पण...
टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली... >>>> ही जी उंची गाठलीये या कवितेने ती केवळ, केवळ..

व्वा बागेश्री,
वृत्तबद्ध ! ..... हा फॉर्म देखील छान हाताळलास.
कवितेत विमनस्क अवस्था छान व्यक्त झालेय.

Pages