विंबल्डन - २०१३

Submitted by Adm on 21 June, 2013 - 13:28

२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्‍या अश्या होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.

दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.

महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
क्विटोव्हा वि अझारेंका

ही स्पर्धेची लिंक.. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यानोने तिसरा सेट घ्यायला हवा होता. चौथ्यात मरेची सेवा खंडित करूनही पुढे सरकत आलं नाही. चांगलाच धडा मिळाला बेट्याला. तो आजून खूप पुढे जाईलसं दिसतंय. तूर्तास मरे आणि ज्योकोव्हिच सामन्याची लज्जत लुटूया.
-गा.पै.

आ़जची फायनल फारच फुसका बार ठरली.. बार्टोली चांगली खेळली पण काय फार ग्रेट वगैरे नव्हतं.. तिला लिसिकीने ढिसाळ खेळ करून खूपच साथ दिली. वर कोणीतरी लिहिलं तसं आक्रमक खेळण्याच्या नादात खूपच चुका केल्या... शेवटी तिला लय सापडते आहे असं वाटत असताना बार्टोलीने शेवटचा गेम लव्हने जिंकून सामना संपवला. बार्टोली फायनल सकट सगळे सामने तिच्यापेक्षा कमी सिडेड खेळाडूंशी खेळली.. त्यामुळे बाकी सगळे आपापसात लढून मेले नी फायदा हिला झाला असेही म्हणता येईल. अर्थात नेहमी सारखं सिडेड खेळाडूंना हरवून स्वतः पुढच्या फेरीत हरायचं असं न करता ह्यावेळी तिने विजेतेपद मिळवले हे महत्त्वाचं ! त्यामुळे तिचं अभिनंदन !!

आता उद्या ज्योको वि मरे !

इथे कोणी नाही का?

जोरात होणार दिसतय मॅच.

काय जबरी रिटर्न आहेत जोकोचे! येवढी जबरी सर्व असताना तेवढ्याच ताकदीनी रिटर्न करतो (फोर्हँडला एस्पेशियली). बॅखँडलाच द्यायला पाहिजे सर्व त्याला.

जोरदार रॅलीज सुरु झाल्यात.. पण टाईप ऑफ रॅलीज पहाता रोलँ गॅरोज आहे की विंबल्डन हा प्रश्न पडतोय.. Happy
मरेचं शॉट सिलेक्शन आत्तातरी बेटर आहे...
कॅमेरून साहेब आलेत.. !

जोको मस्त अख्खा कोर्ट वर्क करायला लावत होता पण मरे पण स्मार्ट गेम खेळतोय. मजा येणार असं दिस्तय.

पण टाईप ऑफ रॅलीज पहाता रोलँ गॅरोज आहे की विंबल्डन हा प्रश्न पडतोय..>> +१
मला जरा जरा बोर व्हायला लागलं आहे Sad

पहिल्या सेटवरून तरी हा सामना 'मॅरॅथॉन रेस' होणारसं दिसतंय ! अर्थात, पुढच्या सेट्समधे कदाचित इतक्या मोठ्या रॅलीज व्हायच्याही नाहीत.

चला, पहिला तर घेतला.

माय ब्वाय मरेच्या तंगड्या आणि शॉटांमध्ये नव चैतन्य जाणवत आहे!

एकंदरीतच मरेची 'अँग्युलर' सर्व्हीस व रॅलीज करतानाही मधेच अनपेक्षित खेळ करण्याची खुबी त्याला वरचढ ठरवतेय असं वाटतं. १- ४ वरून ४-४ !!

Djoko is losing his temper too often ! मरेला त्याचाही फायदा मिळतोय .

मरे जिंकला. जोक्या लै नक्षीकाम करत होता ड्रॉप शॉटचं. त्यामुळे मार खाल्लाय..

उपविजेता म्हणून पदक स्विकारताना जोको हरण्यातही चँपियनसारखाच चमकला; मरेवर अपेक्षांचा प्रचंड दबाव असूनही तो जिंकला असं त्याने मरेचं कौतुक केलं !
मरेने अप्रतिम खेळ केला. अभिनंदन !

वरदा हो.. सेमी फायनल्स बेटर होत्या दोन्हीही ! आजची क्वालिटी ऑफ टेनीस ठिकठिक होती..
मरे कडे ज्योकोच्या प्रत्येक चालीवर उत्तर होतं.. त्याचं कोर्ट कव्हरेजही भारी होतं आज..
एकदाचा ब्रिटीश जिंकला विंबल्डन..

एकदाचा ब्रिटीश जिंकला विंबल्डन..>> हो, आणि एकदा तरी लेंडल नाही तर त्याचा शिष्य Proud
पण या पल्याड खरंच मॅचमधे फारसं काही नव्हतं. या वेळी माझ्या दोन्ही सेमीज हुकल्या होत्या, रादर कुठलीच मॅच पहाता आली नव्हती

मागच्या वर्षीच्या फायनल मधला मरे आणि कालचा मरे यात कमालिचा फरक होता. वरडॅस्को च्या मॅच पासुन हा फरक दिसुन आला. मरे खेळला चांगला पण दोघांमधे टेंपरामेंट ही गोष्ट निर्णायक ठरली अस मला वाटत.

>> लेंडल नाही तर त्याचा शिष्य::फिदीफिदी:

म्हणूनच लेंडलचंही अभिनंदन!

असो.

मरे बराच थकलेला दिसत होता. जर चौथ्यापाचव्या सेटात गेला असता तर निकाल वेगळा लागला असता की काय!

-गा.पै.

Pages