विंबल्डन - २०१३

Submitted by Adm on 21 June, 2013 - 13:28

२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्‍या अश्या होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.

दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.

महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
क्विटोव्हा वि अझारेंका

ही स्पर्धेची लिंक.. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टॅकोव्हस्की आणि फेडररच्या मॅचचे हायलाईट्स पाहिले.. स्टॅकोव्हस्की मस्तच खेळला.. अगदी ट्रेडिशनल सर्व्ह वॉली गेम..
बाकी काल खूपच पडझड आणि धक्के झाले की ... यंदा नवे विजेते पहायला मिळणार का ?

लालू, ती लिस्ट अपडेट करेपर्यंत परत बदलली का? Happy

चिमण, नवरातिलोवाला लॉरा रॉबसनमध्ये स्पार्क दिसतोय.. मी ब्रिटीश मिडीया जसं हेन्मनला सॅम्प्रस अगासीशी किंवा ग्रॅमी हिकला सचिन आणि लारा बरोबर कंपेअर करायचे त्याबद्दल बोलतोय मी,..

बादवे.. डेल पोट्रो आहे की अजून.. त्याची मॅच सुरु आहे.. मला वाटलं त्याने सोडली मॅच काल..

त्रिविक्रम.. काय झालं लंडनला भेटायचं ? Wink

सॉरी माझ्या कडून चूक झाली. डेल पोत्रो आहे अजून. कालच्या मटा मध्ये त्याला जखमी निवृत्त केल होत.
पराग, हो ना, आम्ही असे पर्यंत तुम्ही निघून गेला होता. आता यापुढे स्लॅमला तरी भेट अवघड दिसतीय.

>> चिमण, नवरातिलोवाला लॉरा रॉबसनमध्ये स्पार्क दिसतोय.. मी ब्रिटीश मिडीया जसं हेन्मनला सॅम्प्रस अगासीशी किंवा ग्रॅमी हिकला सचिन आणि लारा बरोबर कंपेअर करायचे त्याबद्दल बोलतोय मी,..

अरे नवरातिलोवाने सुरुवात करून दिली आहे. आज लॉरा जिंकल्यामुळे त्यांना ऊत येईल.

कर्बर गेली. मॅच घालवण्यात एक्स्पर्ट आहे ती. रॉबसन कानेपीकडूनच हरेल बहुतेक. Proud
कवितापण जायच्या मार्गावर आहे. वाचते का बघू उद्या.

उद्या चांगल्या मॅचेस आहेत.
लिसिकी-स्टोसर
गॅस्के- टॉमिक
लोपेझ-हास
फेर्रु- डोल्गॉपोलॉव्ह

मॅच घालवण्यात एक्स्पर्ट आहे ती. >>> अगदी अगदी. !

फेर्रु- डोल्गॉपोलॉव्ह चांगली झाली असं ऐकलं..

क्विटोव्हा जिंकली शेवटी..

सेरेनाने सहाशेवा विजय मिळाला.. किमिको बरोबरची डेट अगदीच फुसकी ठरली.. Happy

आणि सेरेनाही बाहेर...

लॉरा पण बाहेर गेली... आता लेडिजमध्ये कोणीही विनर होऊ शकेल.. ली ना ला चांगले चान्सेस आहेत.

ली ना चांगली खेळत नाही आहे. तिसर्‍या राऊंडमध्ये कशीबशी जिंकली. पुढच्या दोन मॅचेस कठीण आहेत.

तिकडे पोलिश लोकांचा काहीतरी जादूटोणा होता वाटतं.. Proud
Janowicz जिंकणार आहे आणि मरेला फाईट देणार आहे (म्हणे).

ढिंचांक ढिचांग.............सेरेना बाहेर.........:)
.
.

उदयन..,

>> तु सरळ सरळ सेरेनाला घोडी म्हणतोय्स.

तुम्हाला घोडा म्हणायचंय का? Wink कोणाची हरकत असेल असं वाटत नाही!

आ.न.,
-गा.पै.

>> चिमन तु सरळ सरळ सेरेनाला घोडी म्हणतोय्स.....
तू सरळ सरळ वाकड्यात शिरू नकोस हां! Proud

तिकडे पेस, सानिया व भूपती त्यांच्या त्यांच्या डबल्स जिंकताहेत त्यांना काहीच किंमत नाही इथे?

थोडी आहे, जास्त नाही. बाकी काही लोकही डबल्स जिंकताहेत, ब्रायन बदर्स इ. त्यांनाही जास्त किंमत नाही इथे. Proud

गेली होय !
पहिला सेट जिंकली तेव्हा मला वाटलं जिंकेल आता पुढे..
वा वा नविन विजेती ह्यावेळी..

आजच्या क्वा.फा. पण चांगल्या आहेत.. फेरर वि डेल पोट्रो, मरे वि वर्डास्को, ज्योको वि बर्डिच आणि चौथी पोलिश लोकांची..

बादवे काल ना ली आणि राडाव्हान्स्का ची मॅच पाहिली का कोणी ?
राडाव्हान्स्का काही काही शॉट्स मारायचा प्रयत्नच करत नव्हती.. ली ने भारी विनर्स मारले काही काही.. पण स्वत:च्या चुकांनीच हरली !!

मरे अखेर तिसर्‍या सेटला जिवंत झाला.. Happy
पहिले दोन सेट व्हर्डास्को भारी खेळला.. मस्त सर्व्ह केली..

डेल पोट्रोही पडला होता मध्ये.. म्हणूनच नंतर फार पळत नव्हता.. जोरदार विनर्स मारून जिंकला..
फेर्रु फारच किरकोळीत हरला पण..
ज्योको सहज जिंकला..

बायांमध्ये कोण जिंकणार सांगा बरं ? बार्टोलीताई पोचल्या सेमीपर्यंत..

Pages