विंबल्डन - २०१३

Submitted by Adm on 21 June, 2013 - 13:28

२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्‍या अश्या होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.

दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.

महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
क्विटोव्हा वि अझारेंका

ही स्पर्धेची लिंक.. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरे ने काल बराच संयम राखला. २ सेट डाउन असताना जास्त इमोशनल न होता संधी शोधत राहीला. मागच्या वर्षीच्या फायनलच्या मानाने हा बदल महत्वाचा.
ज्योको आणि बर्डिच ची मॅच जरी ३ सेट मधे संपली तरी बरीच क्लोज होती. दुसर्‍या सेट मधे २ सर्विस ब्रेक झालेल्या असताना सेट फिरवला जोक्याने. दोघां मधले फायटीं स्पिरीट बघता हे दोघे फायनलला आले तर जोरदार फायनलची अपेक्षा आहे.

चला लिझिकीबाई जिंकल्या. अग्निशिखाबाईंच्या पायांचं काही खरं नव्हतं. लिझिकीने भरपूर टाळण्याजोग्या चुका (unforced errors) केल्या. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यास फुकटचा बोनस मिळतो. लिझिकीला फटक्यांवर खूप नियंत्रण राखावे लागेल. अंतिम सामन्यात भारतोळीबाईंशी कशी लढत होतेय याची उत्सुकता आहे.
-गा.पै.

पहाताय का कोणी ? ज्योको वि डेल पोट्रो.. तुंबळ युद्ध सुरु आहे..

डेल पोट्रो क्रॉसकोर्ट फोरहॅंड आणि बॅकहँड कसले म हा न !!! मारतोय.. !!!

तुंबळ की नाही माहित नाही .. टाय ब्रेकर च्या आधी डेल पोट्रो मस्त खेळत होता .. पण मग टाय ब्रेकर सोडूनच दिला त्याने .. ज्योको ची पळापळी आणि स्प्लिट्स बघून तुमच्या पुणेरी शब्दांत "भंजाळला" की काय ..

तू पहाते आहेस का इतक्या सकाळी ? Happy
दोघेही थोड्या फार चुका करतायत.. पण रॅलीज फार भारी सुरु आहेत.. डेल पोट्रो एकदम कानाखाली वाजवल्यासारखे क्रॉसकोर्ट शॉट्स मारतोय..
टायब्रेकरमधला तो स्मॅश चुकला आणि डेल पोट्रो एकदम ढेपाळला..
मला नाही वाटत ज्योको भंजाळलाय.. डेल पोट्रो त्याला पळापळ करायला भाग पाडतोय.. रॅली कंट्रोलमध्ये आली की ज्योको विनर मारतो आहे..

ज्योको नव्हे डेल पोट्रो .. तुला टाय ब्रेकर देतो पण तुझी पळापळ आणि स्प्लिट्स आवर असं वाटलं मला ते .. Lol

चौथा सेट कसला ओढलाय डेल पोट्रोने.. ! दोन मॅच पॉईंट वाचवत टायब्रेकर घेतला...
ज्योकोला पाचव्या सेट मधल्या पहिल्या सर्व्हचा फायदा मिळणार..

सशल.. Proud टायब्रेकरच्या शेवटच्या दोन पॉईंट्समध्येही अचाट स्ट्रेचेस केले ज्योकोने.. !!

शेवटचे दोन पॉइंट्स थर्ड सर्व्ह वर!

केवळ मेन्टल आणि फिजिकल स्ट्रेंग्थ वर जिंकला तो .. डेल पोट्रो जास्त चांगलं टेनीस खेळत होता असं मला वाटलं ..

वॉव!
कस्ली मॅच होती!! जबर्दस्त!
प्रचण्ड फिटनेस अन सुपर्ब टेनिस.. नशीबाने पहायला मिळाली पूर्ण!

डेल पोट्रो जास्त चांगलं टेनीस खेळत होता असं मला वाटलं .. >>>> अनुमोदन... मला सगळ्यात आवडले ते डेल पोट्रोचे क्रॉस कोर्ट फटके.. इतके सणसणीत मारलेत की बस.. !
एकंदरीत मजा आली मॅचल.. ही फायनल हवी होती खरतर..

बादवे... ती बार्टोली दुसर्‍यांदा फायनला काय पोचली !! Uhoh असो.. गूड फॉर हर..

तो यानोविक्ज् (?) चांगला पळवतोय मरेला ..

फक्त २२ वर्षांचा असूनही त्याची बॉडी लँग्वेज कसली असर्टिव्ह आहे ..

लेंडल आपला नेहेमीसारखा "बरं मग? मला काय त्याचं?" चेहेरा करून बसलाय .. Lol

पहिला सेट मरे मरत मरत हारलाय.
>>लेंडल आपला नेहेमीसारखा "बरं मग? मला काय त्याचं?" चेहेरा करून बसलाय
मग तुला काय त्याचं ? Proud Proud Lol
तो मरेला प्रोत्साहित करत असेल Proud

मरे दोन गेम जिंकला पण. जॅनो/यानो विक्झला 'विक्स मलिए काम पे चलिए' म्हणाव. जरा आळशीपण सुरू आहे.

यॅनोविझ लैच फायर्ड अप आहे! येकदम सर पे कफन बांधे खेळून राहायलाय. बिनधस्त बॉक्साच्या कोपर्या कोपर्यात मारत आहे. आता ढील दिली मरे नी तर अवघड होऊन बसेल नंतर.

ज्योको वि. डेलपोट्रो मॅच झकास. या विम्बलडन मधली सर्वात मस्त मॅच. डेलपो चे फ्लॅट फोरहँड एवढे जबरद्स्त तो यु.अस. ओपन जिंकला तेंव्हच बघायला मिळाले होते. डेलपो १००% फीट असता तर काय झाल असतं माहीत नाही कदाचित ज्योकोला जास्तच स्ट्रेच कराव लागल असत किंवा निकाल वेगळा लागला असता.
अशीच फायनल व्हावी अशी अपेक्षा पण मरे बराच बेभरवशी आहे.

Pages