विंबल्डन - २०१३

Submitted by Adm on 21 June, 2013 - 13:28

२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्‍या अश्या होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.

दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.

महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
क्विटोव्हा वि अझारेंका

ही स्पर्धेची लिंक.. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@लोला
मी आणि माझे काकाच जाणार होतो , राफा आणि त्याच्या टोनी काका ना भेटायला;पण आमच्या काकांची मॅच नंतरची कॉमेंट ऐकून तो बेत रहित केला.

बाकी फेडेक्स म्हणतो त्याला फार कमी कव्ह्ररेज मीळत आहे धग्यावर. ! ज्योकोला यंदा चांगलाच सोपा ड्रॉ आलेला आहे असे अ‍ॅन्डी मरे लारा रॉबसनला म्हणताना सेरेना विल्यम्स ने ऐकल्याचे समजले.

मी फेड्याचा फॅन आहे म्हण्जे रफाचा राग केला पाहीजे अस नाही. राफा टुर्नामेंट मधे असावा त्याची आणि फेड्याची जबरद्स्त मॅच व्हावी (आठवा २००९ ची फायनल) आणि ती फेड्याने जिंकावी हे फेड्याचा फॅन म्हणून वाटात पण राफाने दुखापत होऊन बाहेर जाणे हे टेनीस फॅन म्हणून पटत नाही.

चमन साहेबंना मिस करतो आहे.

राफा टुर्नामेंट मधे असावा त्याची आणि फेड्याची जबरद्स्त मॅच व्हावी (आठवा २००९ ची फायनल) >>>> तुम्हांला २००८ किंवा २०१० म्हणायचं आहे का ? कारण २००९ ला फेडरर वि रॉडीक फायनल झाली होती.. राफा खेळलाच नव्हता त्यावर्षी
तो जोक असेल आणि मला कळला नसेल तर सॉरी.. Happy

>> तरीसुद्धा जिंकलीच होती ना!
ती मॅच अत्युत्कृष्ट झाली आणि कुणीही शेवट पर्यंत नक्की कोण जिंकणार ते सांगता येत नव्हतं.

>> लॉरा रॉबसन म्हणजे नेक्स्ट नवरातिलोव्हा किंवा ग्राफ किंवा व्हिनस अश्या बोंबा ब्रिटीश मिडीया मारणार आता..

आरे खुद्द नवरातिलोव्हाच तसं म्हणतेय..
http://www.bbc.co.uk/sport/0/tennis/23056126

राफाचा राग करतात म्हणून तुम्हाला कोणाच्या काकाने सांगितले? राफाच्या?

इथे निष्कारण फेडीचा राग राग करणारे लोक आहेत Proud हे टेनिस फॅन म्हणे!

@ पराग my bad . २००९ चुकीच आहे ते २००८ असल पाहीजे पण फेड्या २००९ मधे जिंकला होता आणि २००८ मधे हरला होता.फायनल मात्र दोन्ही जबरदस्त झाल्या होत्या.

@ लोला

मी पण फेडरर फॅन आहे. त्याचा खेळ बघताना आनंद होतो पण हल्ली तो कोर्ट बाहेर जशी समाज सेवा करतो त्यापेक्षा बरीच जास्त समाज सेवा तो कोर्टवर करतो. असंख्य अनफोर्स्ड एरर करुन समोरच्याचे भले कसे होइल हे बघत असतो. त्सोंगाचा इंटरव्ह्यु बघीतलात का? फ्रेंच ओपन सेमी नंतर.

त्सोंगा म्हणतो फेरर ने फेडी एवढ्या एरर केल्या नाहीत म्हणून मी हरलो.

फेडररला फक्त फेडररच हरवू शकतो हे माझ पहिल्यापासूनच मत आहे. एरर फ्री फेडररला इतर कुठलाही खेळाडू हरवू शकत नाही, जरी तो दुसरा खेळाडू स्वतः एरर फ्री असला तरीही. (अपवाद फ्रेंच ओपन व तत्सम सर्फेसेस). सॅम्प्रास व फेडरर समकालीन असते तर विम्बल्डन बघायला फारच मस्त मजा आली असती.

सध्या डेल पोत्रो सुद्धा असाच आहे. विशेषतः विम्बल्डनला तो चुका न करता खेळला तर त्याला हरवण कठीण आहे.

नदालचा फ्रेंच ओपन पद्धतीचा खेळच त्याच्या दुखापतींना कारणीभूत ठरला आहे. तरीपण येवढ्या मोठ्या दुखपतीतून सावरून फ्रेंच ओपन जिंकली हे भारीच.

आजचा दिवस फारच वाईट दिसतोय खेळाडूंना... पाच जण दुखापतीने स्पर्धा सोडून बाहेर... डार्सिस, सिलिच, इश्नर, स्टेपानेक आणि व्हिक्टोरिया अझारेन्का..

साईटवरच एक कॉमेंट वाचली.. मॅकॅन्रोच्या मते खेळाडूंनी पेन किलर्स वगैरे घेऊन खेळलेच पाहिजे.. जसे एन एफ एल चे खेळाडू खेळतात.

सुमंगल पॅनिक होऊ नका हो.
वाईल्ड वेन्सडे.

अडम, ती वरची लिस्ट बदला की.

१. ज्योको वि गॅस्के (बर्डिच नको, कंटाळ येतो.)
२. फेर्रु वि. डेल पोट्रो
३. इथे एकदम जनता आली आहे Proud
४. व्हर्दास्को वि मरे.

१. सेरेना वि. कर्बर
२. राडावान्स्का वि. ना ली
३. स्लोन स्टीफन्स वि. बर्तोली Proud
४. फ्लाविया वि. कविता

फेडीची मॅच पहायालाच मिळाली नाही अजिबात. Sad त्या येड्या स्टार स्पोर्टसवाल्यांनी सेंटर कोर्टवरची फेडीची मॅच दाखवण्याऐवजी कोर्ट नं. १ वरची येलेना यांकोविकची पूर्ण मॅच दाखवली.. आणि ती संपल्यावर टेनीस बंद करून क्रिकेटची कुठलीतरी मॅच दाखवत बसले.

या विंबल्डनमध्ये लईच उलथापालथ झालीये पण पहिल्या दोन फेर्‍यांमध्येच. फायनल येईपर्यंत अजुन काय काय घडेल ते पहायचं आता.

लोला, कशाला पाहिले लिस्ट बिस्ट. मी सरळ विनरच जाहीर करू टाकतो ना... Proud

महिलांमध्ये वन अँड द ओन्ली सेरेना...
पुरुषांमध्ये ज्योको किंवा मरे... (फेडी नसल्यामुळे अभी आपुनका चॉईस ज्योको... Happy )

मयूरेश, मी काल विम्बल्डन पाहिलेले नाही.त्यामुळे फेडररच्या मॅचबद्दल सांगता येणार नाही. पण स्टार स्पोर्ट्स(१ किंवा २) आणि इएसपीएन दोन्हीवर एकावेळी प्रक्षेपण सुरू असते. एकावर पुरुषांच्या तर एकावर महिलांच्या मॅचेस. स्टारने अलीकडेच स्टार स्पोर्ट्स २ हेही एक चॅनेल सुरू केले आहे. (टाटा स्कायवर तरी अलीकडेच दिसू लागले आहे.)

शारापोव्हा पण हारली ना ?
त्सोंगा पण हरला .
पहिल्या २ आठवड्यात एवढ्या उलथापालथी झालेल हे पहिल विंबल्डन असेल .
पण त्यामुळे शेवटच्या फेर्या एकतर्फी हो नयेत एवढीच इच्छा !

जोकर व मरे यांच्यातच फायनल होईल. अंतिम सामन्यापर्यंत बाकीचे सामने एकतर्फीच होतील वाटतं!
पोट्रो सरप्राइज पॅकेज ठरू शकेल.

फेडरर हरला यात विषेश काही वाटल नाही. पहिला सेट झाल्यानंतर मी मॅच बंद केली जरी फेडी जिंकला तरी. फेडी जिंकण्या साठी खेळतो आहे असे कुठेही वाटले नाही. फक्त रीक्टीव गेम होता. फेडरर चा मॅच नंतरचा इंटरव्ह्यु जास्त अर्थपूर्ण आहे त्यात सगळ्या मॅचची समरी आहे.

बरेच सीडेड खेळाडु पहिल्या दोन राउंड मघे बाहेर पडले हे थोड वीचित्र आहे तरी म्हणतात तस सगळ्याची सवय होते.

मरे आणि लु ची मॅच जोरदार झाली. मरे ३ सरळ सेट मधे जिंकला तरी लु ने चांगलच झुंजवल.

>>डेल पोर्तो पण गेला जखमी हो<< अरेरे Sad काय चाललयं? माझा मित्र म्हणाला की कोर्ट गंडलय यावेळचं, भरपूरदा घसरतायत खेळाडू.

अरे ....काय चालले काय आहे........??????????????????????????????????????????

नदाल गेला ..........ठिक आहे

फेडरर गेला..........हे ही ठिक आहे

मारिया शारापोव्हा गेली.................आता आम्ही टेनिस कुणासाठी बघायचे..? Uhoh

आता आम्ही टेनिस कुणासाठी बघायचे..? >>> उदयन, आता तुम्ही टेनिस पाहा सिर्फ 'निर्मल आनंद के लिए' Wink ('खूबसूरत'स्टाईल)

स्टॅकोव्हस्की (ज्यानं फेडीला मारलं) फारच भारी खेळला. त्याचं टेंपरामेंट उत्तम होतं. प्रेशर खाली चुका कमी केल्या. दणदणीत सर्व्हिस आणि व्हॉली. खूपच वर्षांनी असा बेकर स्टाईल सर्व्ह व्हॉली गेम बघायला मिळाला. डस्टिन ब्राऊन पण अशाच प्रकारे खेळतो, ज्यानं काल ह्युईटला मारलं. पण तो चुका जास्त करतो असं दिसलं. त्यामुळे मला वाटतंय स्टॅकोव्हस्की असाच खेळला तर तो विंबल्डन पण जिंकू शकेल.

<<मारिया शारापोव्हा गेली.................आता आम्ही टेनिस कुणासाठी बघायचे..? >>
उद्या सरेना आणि विनस ला बघ की!!!!Dolo.gif

Pages