वृद्धाश्रमासाठी नाव सुचवा

Submitted by लालशाह on 10 June, 2013 - 02:45

नमस्कार माबोकरानो.
पुण्याच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम काढण्याचा विचार असून सर्व तयारी झाली आहे. हे वृद्धाश्रम नॉन प्रोफिट ऑर्गानायझेशन नसून प्रोफिट ऑर्गानेयझेशन असेल. पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने हे वृद्धाश्रम सुरु करीत आहोत.

ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील उपकार नको आणि प्रवासातील मुक्कामाचे होटेलही नको. तर योग्य किंमत मोजून म्हातारपणी आयुष्यात नवचैतन्य निर्माण होईल असं हे घर असेल. जे वृद्धाना आपलं व हक्काचं वाटेल असं.

एक दोन वर्षात हा उपक्रम विदेशात नेण्याचाही मानस असल्यामुळे मराठी टच असलेलं आंतराष्ट्रीय नाव असायला हवं.
कृपया असं नाव सुचवून माझी मदत करा.

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान उपक्रम! खूप खूप शुभेच्छा! Happy

केश्विनी +१.
१. आमचं घर.
२. कुटुंब.
३. विश्रांती.
४. दिलासा.
५. अमृत.

पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने >> हेतू स्वच्छ आहे. कसलाही आडपडदा नसल्याने मनःपूर्वक अभिनदन आपले.+१
सेकंड इनिंग्स..+१

>>पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने >> हेतू स्वच्छ आहे. कसलाही आडपडदा नसल्याने मनःपूर्वक अभिनदन आपले. जिव्हाळा, वात्सल्य, मातोश्री, निवारा यापेक्षा हटके ठेवा काहीतरी. वृद्धाश्रम वाटलाच नाही पाहीजे.>>
+१
अश्विनी के यांच्या विचारांनाही +१

वृद्धाश्रमासाठी नाव:

मला सगळ्यात समर्पक वाटतं ते नाव म्हणजे Relax.

अन्य नावं - घर, निवांत, खुशी, आराम

<< पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने हे वृद्धाश्रम सुरु करीत आहोत. >>
पैसेवाले वृद्धाश्रमात जातात? नावाजलेल्या (तगड्या) क्लब्सची मेंबरशीप असते त्यांच्याकडे. Happy

लिंबूटिंबू , तुम्ही सुचवलेल्या नावांत सतत मृत्यूची वाट पाहणं सुचवलं जातंय.

लालशाह,

Just out of Curiosity, तुमचे टार्गेट कोण आहेत? श्रीमंत अ‍ॅक्टीव वृद्ध का श्रीमंत डिसेबल्ड/असिस्टेड?

अ‍ॅक्टीव असतील तर ते स्वतःचे घर सोडुन अशा "वृद्धाश्रमात" राहतील का? कि तुम्ही हे "सेकंड होम" सारखे करणार आहात?
आणि जर "डिसेबल्ड" किंवा "असिस्टेड" असतील तर त्याना "लॅविश" गोष्टींचा किती उपयोग (कितीही पैसा असला तरी)?

Baapre, evadhya pratikriya! Aabhari aahe.
-------
Manasmini,
Jyala aarthik samsya nahi pan kautombik samshya ahe ase vruddha. Videshyat rahnarya NRI valyanche palak, mul-bal nasalele vruddh etc.

"माय" Home - आईचे घर
Homage or Home-age
Homage - to show respect or dedication to somebody

>>>वेटींग लिस्ट .
काऊंटडाऊन
द लास्ट नेल
"करुन सवरुन भागला>>>>>> सॉरी. ही नावे फार डिप्रेसिंग वाटली.

सिल्वर एज मस्त आहे. सनसेट व्हिलाज पण छान आहे.

NRI च्या पालकांचा गट विचारात घेतलाय हे फार फार आवडले. काळाची गरज आहे आणि फायद्याचे काम आहे. क्वालीटी जपा. खूप यश मिळेल.

उपक्रमासाठी भरभरून शुभेच्छा!!
अभिनंदन!!

बापरे लिंबुटिंबूजी काय हो हे!!
>>>
नाईट वॉचमन!
लास्ट होम / लास्टिंग वे / फायनल होम
फायनल इनिन्ग
हेवन बॉर्डर (बॉर्डर ऑफ हेवन)
कैलाश!
>>>

मी अजुन म्हातारी नाही झाल्येय पण म्हातारपण इतकं वाईट नसेल हो. Wink

Light 1

उदय, धनश्री, बरोबर आहे तुमचे म्हणणे, पण त्यावेळेस जे तत्काळ सुचले (बहुधा बुडत्या अ‍ॅप्रेझेलच्या मुडमधेही तसे सुचले असू शकेल Proud ) ते लिहीले.

बर "उत्तरायण" कसे वाटते?
जौद्या बोवा, उदय म्हणतो तसे मला बहुधा "मृत्युची सतत वाट बघणे वा त्याच्या सदासानिध्य अस्तित्वाखेरीज" दुसरे काही सूचतच नसावे Sad

स्पेअरहोम किन्वा शेअरहोम ????? कमिटेड होम????
जॉईण्टव्हेन्चर सारखे जॉईण्टहोम ???
ब्रॉड रूफ??? किन्वा सिल्वर/गोल्डन रूफ??
छत्रछाया?

उपक्रमाबद्दल अभिनंदन!
सिल्व्हर एज नाव आवडले.
Golden stay.
Golden stay India
Golden stay Singapore etc.
लोगो मधे old ही अक्षरे हायलाईट असावी.

अरे वा!!! मस्त उपक्रम...

हल्ली ही समस्या आहेच सगळी कडे. आमच्याच घरात सध्या हा विषय चालु आहे. माझी आजी ( आईची आई) वय ८६ ला मना पासून वृध्दाश्रमात जायचे आहे. कारण तिला सगळ्या मुलीच. आणि तिच्या मुली तिच्या पेक्षा जास्त आजारी आहेत. माझी आई क्रॉनिक डायबेटिक आहे आत ६६ वर्षांची आहे. ती एकटीच रहाते. आजीने तिच्या कडे रहाव असं आम्हाला वाटतं, पण घरात इतर कोणीच नसल्याने आजी बोअर होते. आणि तिचं सगळं करायला लागतं म्हणुन आई आजारी पडते. दुसरा हेल्पिंग हँड कोणीच नाही. आजी एकटी रहात नाही. त्या मुळे आईला बाहेर जाताना , अगदी भाजी, औषधे, वाण्सामान इ. साठी जातानाही तिच्या साठी सोबत बघावी लागते. कामवाल्या बाईला ठेवुन पाहिलं, पण तिचाही फारसा इतर उपयोग नसल्याने ती काम सोड्न गेली.

इतर मावश्यांकडे अती गर्दी होते. आणि त्यांच्या कडेही कोणीना कोणी आजारी व्यक्ति आहेच. त्या पर्श्वभुमी वर आम्ही चांगला वृध्दाश्रम शोधत होतो. आजी खुप बोलकी आणि सतत माणसात वावरलेली असल्याने तिला वृध्दाश्रमात जायची तिच्या वयाच्या बायकांत मिसळायची खुप ओढ आहे. पण सध्या ठाणे मुंबई परिसरात असलेल्या वृध्दाश्रमांची अवस्था अतिषय बीकट आहे. तिकडची गैरसोय आणि अस्वच्छता बघुन आम्ही मात्र तिच्या निर्णयच्या विरुद्ध आहोत.

अशा पार्श्वभुमीवर तुम्ही काढत असलेल्या वृध्दाश्रमाची अत्यंत गरज आहे. आजी सारखी व्यक्ति जिच्याकडे पैसा ही आहे, आणि इच्छाही ती आनंदाने ह्या उपक्रमात सहभागी होइल. तुमचा वृध्दाश्रम सुरु झाला की नक्की सांगा.

बाकी वरची नावे एकदम झकास. मला सेकंड इनींग्ज हे नाव आवडले.

Pages